पनवेल : उरण विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते रविवार दिनांक 18 ऑक्टोबरला भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. दुपारी 12 वाजता पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार …
Read More »देवेंद्र फडणवीस उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौर्यावर
शेतकर्यांच्या नुकसानीची करणार पाहणी मुंबई : प्रतिनिधीराज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या दौर्यावर आहेत. सोमवार (दि. 19)पासून त्यांच्या दौर्याला प्रारंभ होईल.देवेंद्र फडणवीस …
Read More »घराबाहेर पडल्याने एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का? : रावसाहेब दानवे
पैठण : प्रतिनिधीघराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का, असा सवाल भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विचारला आहे. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे, असेही त्यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले की, अशी अनेक संकट येत राहतात. आम्ही …
Read More »प्रजा संकटात, राजा मात्र घरात!
वाढत्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार दौरा मुंबई : प्रतिनिधीगेल्या चार-पाच दिवसांत परतीच्या पावसाने राज्याला तडाखा दिला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही. दुसरीकडे काही नेते विविध भागांचे दौरे करून परिस्थितीचा …
Read More »रायगड जिल्ह्यात 230 नवे पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम असून, शुक्रवारी (दि. 16) नव्या 230 रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 310 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 131 व ग्रामीण 21) तालुक्यातील 152, उरण 19, अलिबाग 15, पेण 11, खालापूर 10, रोहा …
Read More »आजपासून देवीचा जागर
कोरोनामुळे नवरात्रोत्सवही होणार साधेपणाने पनवेल : रामप्रहर वृत्तआदिशक्ती, आदिमाया यांसारख्या विविध रूपांनी व नावांनी ओळखल्या जाणार्या देवीच्या नवरात्रोत्सवाला शनिवार (दि. 17)पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने सार्वजनिक स्वरूपात देवीची प्रतिष्ठापना होणार असून, घरगुती घटही बसतील. त्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.गणेशोत्सवानंतर भाविकांना आता नवरात्रोत्सवाची उत्सुकता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत देवीची …
Read More »खराब हवामानामुळे मच्छीमारही हतबल
मुरूड : प्रतिनिधीवादळी पावसामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल झाला असताना या खराब हवामानाचा फटका मच्छीमारांनाही बसला असून, मिळकत तुटपूंजी आणि खर्चाचा वाढता बोजा यामुळे बोटी किनार्यावर शाकारण्यावाचून कोळी बांधवांना दुसरा पर्याय राहिलेला नाही. कोकणातील रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. जिल्ह्यात सुमारे 25 हजार छोट्या-मोठ्या मच्छीमार बोटी असून, जवळपास अडीच …
Read More »रायगडात भातशेतीचे नुकसान
परतीच्या पावसाच्या तडाख्याने बळीराजा हवालदिल नागोठणे : प्रतिनिधीसमुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भातशेती भिजून शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भातपिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार …
Read More »रायगड जिल्ह्यात 10 रुग्णांचा मृत्यू ; 207 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 10 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 207 नव्या रुग्णांची नोंद सोमवारी (दि. 12) झाली, तर दिवसभरात 308 रुग्ण बरे झाले आहेत. मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सात व ग्रामीण 1) तालुक्यातील आठ आणि उरण व कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल …
Read More »तांबडी बलात्कार व हत्या प्रकरण ; विशेष पोक्सो न्यायालयात पोलिसांकडून दोषारोपपत्र सादर
अलिबाग, रोहा : प्रतिनिधीरोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यासाठी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सोमवारी (दि. 12) अलिबाग जिल्हा न्यायालयात हजेरी लावली. त्यांनी तांबडी येथे जाऊन गुन्हा घडला त्या ठिकाणची स्थळ पाहणीही केली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper