पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे भाजप तसेच विविध संघटनांच्या मागणीनंतर दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखेर खुली करण्यात आली. याचा आनंदोत्सव म्हणून सोमवारी (दि. 16) सायंकाळी पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिरात महाआरती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.राज्यात …
Read More »साखरपुड्याच्या पार्टीसाठी बोलवून तरुणीवर मित्रांचा सामूहिक बलात्कार
मुंबई : प्रतिनिधीमैत्रिणीला साखरपुड्याच्या पार्टीसाठी म्हणून बोलवून तिच्यावर मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलमध्ये मागच्या आठवड्यात हा संतापजनक प्रकार घडला.पीडित तरुणीने 15 नोव्हेंबरला तीन आरोपींविरोधात तक्रार नोंदवली आहे. आरोपींनी मला व अन्य दोन महिलांना पार्टीसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर आरोपींनी माझ्यावर बलात्कार केला, …
Read More »सत्तेसाठी नेते इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर कुठे बिघडले?
भाजप नेते अतुल भातखळकर यांचा टोला मुंबई : प्रतिनिधीलोकांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय बिघडले? पोलीसही हप्ते घेतातच ना असे वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर अवैध दारूविक्री केल्याने कारवाई केली असून, त्यांची पाठराखण …
Read More »वाढीव वीज बिलाबाबत राज्य सरकारचा यू-टर्न
ग्राहकांना सवलत मिळणार नाही : ऊर्जामंत्री मुंबई : प्रतिनिधीराज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून दिलासा मिळणार नाही. मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिले ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते. त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे वीज बिल …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पनवेलकरांचा अभिमान पुरस्काराने सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरीब असो व श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सर्व समाज आपले कुटुंब आहे हे मानून नेहमी मदतीचा हात देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेलकरांचा अभिमान या पुरस्काराने मंगळवारी (दि. 17) सन्मानित करण्यात आले.कोरोना या वैश्विक …
Read More »दहशतवादाचा एकत्रितपणे विरोध व्हावा : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करीत पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. दहशतवादाला पोसणार्या, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या देशांचा एकत्रितपणे विरोध व्हायला हवा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बदलांची गरज असल्याचा पुनरूच्चार त्यांनी या वेळी केला. जागतिक कारभाराच्या …
Read More »ऑनलाइन दिवाळी पहाटला उत्स्फूर्त प्रतिसाद
कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाचे संक्रमण पाहता अनेक सण साजरे करताना आनंदाला कात्री लावावी लागली. या सर्व सणांत दीपावली विविध फराळ, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी, किल्ले बांधणी, शुभेच्छा आदींचा आगळावेगळा व उत्साहाचा सण आहे. या सणानिमित्त उल्हासमय वातावरण असते. दरवर्षी दिवाळी पहाट म्हणजे मैदाने हाऊसफुल्ल करणारी असायची, …
Read More »वेगवेगळ्या अपघातांमध्ये आठ ठार, 16 गंभीर जखमी
सोलापूर, उंब्रज ः प्रतिनिधीसर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग व आशियाई महामार्गावर उंब्रज ता. कराड येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत आठ जणांचा मृत्यू, तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या अपघातांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ एका रुग्णवाहिकेला शनिवारी (दि. …
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वाचनालयाचे लोकार्पण
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा आणि रॉयल टायगर असोसिएशनच्या वतीने आदई सर्कल येथे सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयाचे लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते …
Read More »पंतप्रधानांनी साजरी केली जवानांसोबत दिवाळी
जैसलमेर(राजस्थान) ः वृत्तसंस्थासंपूर्ण जग विस्तारवादी ताकदींमुळे वैतागले आहे. विस्तारवादी वृत्ती एक मानसिक विकृती असून ती 18व्या शतकातील विचार दर्शवते. भारत या विचारांविरोधात प्रखर आवाज बनलाय. भारत आज समजण्यात व समजावण्याच्या नीतीवर विश्वास ठेवतो, पण कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तरही सडेतोड मिळेल, अशा शब्दांत भारतीय जवानांनी पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper