Breaking News

Ramprahar Reporters

मराठा समाजाला शिक्षण व रोजगारासाठी सवलती द्या

चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी मुंबई : प्रतिनिधीराज्यातील मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत   राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले की, संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू …

Read More »

रायगड जिल्ह्यात पाहणी दौरा

चक्रीवादळात झालेल्या नुकसान व कार्यवाहीचा केंद्रीय पथकाकडून आढावा अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा गुरुवारी (दि. 10) केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून आढावा घेतला. पाहणी दौर्‍यानंतर अलिबाग सोगाव येथील आऊट पोस्ट हॉटेल येथे आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. रायगड व …

Read More »

रायगडात 531 नवे पॉझिटिव्ह; सहा रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचे नवे उच्चांक प्रस्थापित झाल्यानंतर सोमवारी (दि. 7) काहीसा दिलासा मिळून 531 नव्या कोरोना रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे दिवसभरात 408 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 279, अलिबाग 101, पेण 47, खालापूर 25, रोहा 18, …

Read More »

तांबडी बुद्रूकच्या पीडित कुटुंबीयांना न्याय द्या!

पंचक्रोशीतील लोक एकटवले रोहा : प्रतिनिधी तांबडी बुद्रुक येथे 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी मराठा क्रांती मोर्चा तसेच भालगाव, घोसाळा, वाली, विरझोली, तांबडी पंचक्रोशीतील सर्व समाजबांधव सोमवारी (दि. 7) तांबडी बुद्रुक येथे एकवटले. या वेळी प्रांताधिकारी यशवंत माने व पोलीस …

Read More »

हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची ‘डीआरडीओ’कडून यशस्वी चाचणी

बालासोर : वृत्तसंस्थाओडिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी (दि. 7) भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळेहवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत …

Read More »

भारत ‘नॉलेज इकॉनॉमी’च्या दिशेने : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था21व्या शतकातील भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने होते आहे. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांतील युवक कसे पुढे येतील यावर भर दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भातील परिषदेत ते बोलत होते. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकर्‍या, कामाचे …

Read More »

नवभारतीय शिववाहतूक संघटना चालकांच्या खंबीरपणे पाठीशी -लोकनेते रामशेठ ठाकूर

रिक्षाचालकांना अन्नधान्य आणि सुरक्षित पडदा अंतर किटचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोड परिसरातील रिक्षाचालकांना अन्नधान्य वाटपाबरोबरच त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित पडदा अंतर किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष निर्गुण कवळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाभावीपणाने केले आहे. अशा संघटनेचा आम्हाला निश्चित अभिमान असून, यापुढेही येथील रिक्षाचालक तसेच इतर …

Read More »

वाढीव वीज बिलांची भाजपकडून होळी

अलिबागसह रायगडात ठिकठिकाणी आंदोलने अलिबाग : प्रतिनिधीमहावितरण कंपनीने दिलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात सोमवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षाकडून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या वेळी वीज बिलांची होळी करून महावितरणसह राज्य सरकारचा निषेध केला गेला. अलिबाग विभागीय कार्यालयासमोर बोलताना भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी वीज बिले …

Read More »

पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात

ग्रामपंचायत विधेयकावरून विरोधकांचा सभात्याग मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या राज्य विधिमंडळाचे कामकाज सोमवारी (दि. 7) सुरू झाले, पण पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. ग्रामपंचायत सुधारणा विधेयकावरून विधानसभेत एकच गोंधळ पाहण्यास मिळाला. विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत सभात्याग केला.विधिमंडळाच्या दोनदिवसीय पावसाळी अधिवेशाला सोमवारी …

Read More »

रायगडात कहर! सर्वाधिक 769 रुग्णांची नोंद

पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 5) आतापर्यंतच्या सर्वाधिक तब्बल 769 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दिवसभरात 451 जण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 334, अलिबाग 109, महाड 90, पेण 53, माणगाव 42, कर्जत 34, …

Read More »