Breaking News

Ramprahar Reporters

मराठा आरक्षणाबाबत केंद्राकडे बोट दाखवणे चूक : देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही पटला नाही, पण न्यायालयाने त्यांचा निर्णय दिला आहे. आपण या निर्णयावर आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. काही लोक राजकीय हेतूने कसे केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहत आहेत, मात्र केंद्राकडं बोट दाखवणे ही पळवाट आहे. हा राज्याचा कायदा …

Read More »

राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गार

मानवाधिकार उल्लंघनप्रकरणी आयोगाकडे तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकंगना रानौत प्रकरण व माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपने राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. याबाबत भाजप शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या …

Read More »

सहकारी बँकांवर आरबीआयचा अंकुश

लोकसभेत विधेयक मंजूर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्याचे विधेयक नुकतेच लोकसभेत मंजूर झाले आहे. त्यामुळे सहकारी बँका आता आरबीआयच्या नियंत्रणाखाली आल्या असून त्यांच्या व्यवहारांवर आरबीआयचा अंकुश असणार आहे. सहकारी बँकांना आरबीअययायच्या चौकटीत आणण्यासाठी बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करणार्‍या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन …

Read More »

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्त व प्लाझ्मादान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांचेही रक्तदान पनवेल ः प्रतिनिधीदेशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी (दि. 17) खारघर व मोहोपाडा येथे झालेल्या रक्त व प्लाझ्मादान शिबिराला संबंधित दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स …

Read More »

कोविड योद्ध्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून गुरव परिवाराला ‘लाख’मोलाची मदत पनवेल : रामप्रहर वृत्तकोविड योद्धा म्हणून जबाबदारी बजावताना सुरेश गुरव यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वतः वैयक्तिक एक लाख रुपयांची आर्थिक मदत गुरव कुटुंबाला केली आहे. मदतीचा धनादेश …

Read More »

रायगड जिल्ह्यात 653 नवे पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 653 नव्या कोरोना रुग्णांची आणि 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 16) झाली, तर दिवसभरात 844 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 307, अलिबाग 111, पेण 62, माणगाव 43, कर्जत 38, रोहा 28, उरण 19, खालापूर 17, तळा 10, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी …

Read More »

रशिया भारताला देणार कोरोना लस

मॉस्को : वृत्तसंस्थाकोरोनावरील पहिली लस रशियाने तयार केली असून, या ’स्पुटनिक व्ही’ नामक लसीचे 10 कोटी डोस रशिया  जुना व चांगला मित्र भारताला देणार आहे. या संदर्भात भारतातील मोठ्या औषधी कंपन्यांसोबत चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read More »

चक्रीवादळग्रस्त अद्यापही नुकसानभरपाईपासून वंचित

सुधागडातील नाडसुर ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन; आंदोलन छेडण्याचा इशारा पाली ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा सुधागड तालुक्यालाही बसला. या वादळाने घरे, गोठे, फळबागा, शेती, दुकानांचे  मोठे नुकसान झाले. वादळाला तीन महिने उलटून गेले तरी अद्याप सुधागड तालुक्यातील वादळग्रस्त नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय पंचनाम्याच्या अनुषंगाने मिळालेल्या भरपाईतदेखील …

Read More »

बंदी काळात मासेमारी करणार्‍या 87 बोटींवर रायगडात कारवाई

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्याच्या हद्दीत खोल समुद्रामध्ये बंदी काळात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 87  बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या बोटींचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू झाली असून, रायगडच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी बोटींच्या मालकांना नोटीस बजावल्या आहेत. जून ते जुलै या कालावधीत मासळी व इतर सागरी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होत …

Read More »

मराठा आंदोलकांना नोटीस देण्याचे तत्काळ थांबवा

छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई ः प्रतिनिधीमराठा आंदोलकांना पोलीस प्रशासनाने फोन करून आणि नोटीसी बजावून दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे. राज्य सरकारने हे तत्काळ थांबवावे, अशा आशयाचे पत्र छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे.प्रशासनाने सहकार्य न करता …

Read More »