मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप आणि शिवसेना यांच्या युतीबाबतचा निर्णय लवकरच घोषित करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते सोमवारी (दि. 23) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचे विशेषत: कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत व कौतुक केले. पत्रकारांनी विचारलेल्या …
Read More »‘हाऊडी मोदी’ : खोपोलीच्या चित्रकाराचे पुस्तक पंतप्रधानांना भेट
खोपोली : प्रतिनिधी येथील प्रख्यात चित्रकार दीपक पाटील यांच्या स्केचेसने साकारले गेलेले अंतर्नाद हे पुस्तक भारतीय वंशाचे अमेरिकेत स्थायिक असलेले डॉ. विनोद शहा यांनी रविवारी (दि. 22) हाऊडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले. या पुस्तकाची संपूर्ण संकल्पना डॉ. शहा यांची असून, यात रामराज्य ते 2030 साली …
Read More »कामोठ्यातील पाणी बिलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. प्रशांत ठाकूर यांचा सत्कार
सोसायट्यांचे रहिवासी, बचतगटातील महिला, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे वसाहतीतील पाणी बिलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा रविवारी (दि. 22) हृद्य सत्कार करण्यात आला. या वेळी विविध सोसायट्यांचे रहिवासी, बचतगटातील महिला आणि युवा व सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. …
Read More »शेकाप कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’
खारघर : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढत आहे. अशाच प्रकारे खारघर येथील शेकापचे रघुनाथशेठ ठाकूर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. खारघर येथील भाजप कार्यालय आणि आमदार प्रशांत …
Read More »सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धेत पनवेलमधील खेळाडूंचे सुयश; तिघांची राष्ट्रीय स्तरावर निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाटकमधील निपाणी येथील केएलई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या साऊथ झोन सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धा 2019-20मध्ये पनवेल महापालिका हद्दीतील चार खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाने दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी चार पदके पटकाविली. 14 वर्षांखालील मुलींच्या 51 किलोखालील गटात …
Read More »तलवारबाजी स्पर्धेत ‘आरटीपीएस’ला पदके
खारघर : रामप्रहर वृत्त नंदूरबार फेन्सिग असोसिएशनतर्फे पाथ्री येथील के. डी. गावित एज्युकेशनल कॅम्पसमध्ये आयोजित कॅडेट महाराष्ट्र राज्य तलवारबाजी चॅम्पियनशीपमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)च्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. ‘आरटीपीएस’च्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून आपली चमकदार कामगिरी स्पर्धेत दाखविली. यामध्ये सांघिक प्रकारात …
Read More »टी-20 मालिका बरोबरीत
बंगळुरू : वृत्तसंस्था कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतावर नऊ गडी राखून मात केली. या पराभवासह भारताचे आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचे स्वप्न भंगले. तीन टी-20 सामन्यांची ही मालिका अखेरीस 1-1 अशा बरोबरीत सुटली आहे. भारताने विजयासाठी दिलेले 135 धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने सहज …
Read More »पनवेल विधानसभा मतदारसंघात आजपासून भाजपच्या बैठकांचा धडाका
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणूक जाहीर होताच भारतीय जनता पक्षाने पनवेल मतदारसंघामध्ये प्रचारात आघाडी घेतली असून, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि महापालिका प्रभागवार बैठकांचे आयोजन सोमवार (दि. 23)पासून करण्यात आले आहे. भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यानुसार सोमवारी (दि. 23) …
Read More »रायगडात पावणेतीन लाख मतदार वाढले
अलिबाग : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यामध्ये 22 लाख 65 हजार 478 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2014च्या तुलनेत जिल्ह्यात दोन लाख 89 हजार 206 मतदार वाढले आहेत, अशी महिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (दि. 22) येथे दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर …
Read More »भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. 22) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि परिषदेचे राष्ट्रीय सचिव सुरेश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. नवीन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper