अलिबाग ः प्रतिनिधी अटीतटीच्या कुस्तीत एकचाक डावावर प्रतिस्पर्ध्याला असमान दाखवत टाकादेवी स्पोर्ट्स क्लबचा मल्ल अंकुर घरतने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावली. सोलापूर जिल्ह्यातील मु. मेडद, ता. माळशिरस येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती मैदानात टाकादेवी स्पोर्ट्स क्लब, मांडवाचा पैलवान अंकुर अशोक घरत याने कोल्हापूरच्या सचिन पाटीलला पराभूत करून मानाची …
Read More »देवेंद्र फडणवीस भाजप गटनेतेपदी
मुंबई ः प्रतिनिधी भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बुधवारी (दि. 30) झालेल्या बैठकीत फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड केल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व आमदारांचे आणि नेत्यांचे आभार मानले, तसेच महायुतीचा निवडणुकीत विजय झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचेही आभार मानले. राज्यात पुन्हा …
Read More »सायकल प्रवासातून स्वच्छतेचा संदेश
दोघे करताहेत उरण ते उत्तराखंड प्रवास उरण : वार्ताहर गेल्या पाच वर्षांपासून देशात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती यासाठी काम करीत आहेत. अशाच प्रकारे दोन जण सायकलवरून उरण ते उत्तराखंड असा सुमारे अडीच हजार किमी प्रवास करून स्वच्छतेचा संदेश …
Read More »गांगुली येताच इतिहास घडणार!
मुंबई : प्रतिनिधी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष होताच भारताच्या क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. बीसीसीआयने ठेवलेल्या डे-नाइट टेस्ट मॅचच्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे 22 नोव्हेंबरपासून कोलकात्यात सुरू होणारी टेस्ट मॅच ही टीम इंडियाची पहिलीच डे-नाइट टेस्ट मॅच असेल. …
Read More »दिवाळीचा फोटो शेअर करणे इशांत शर्माला पडले महागात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटपटूंनी दिवाळी सेलिब्रेशन केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. खेळाडूंच्या फॅन्सनीही त्यांचे हे फोटो लाईक आणि शेअर केले आहेत, पण वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मात्र दिवाळीचे फोटो शेअर करून चांगलाच गोत्यात आला आहे. इशांत शर्माने इन्स्टाग्रामवर त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर …
Read More »आमदार महेश बालदी यांचा भाजपला पाठिंबा
मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार महेश बालदी यांनी भारतीय जनता पक्षाला आपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्या संदर्भातील पत्र त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिलेे. आमदार महेश बालदी यांनी आपल्या पाठिंबापत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत …
Read More »विवेक पाटलांचा लढाईआधीच पराभव
महेश बालदी यांचा उमेदवारी अर्ज वैध उरण : वार्ताहर बुडित जाणार्या कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहाराचा दुरूपयोग करून शेकापचे उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विवेक पाटील यांच्याकडून जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या उमेदवारी अर्जास हरकत घेण्यात आली होती, मात्र पाटील यांचा आक्षेप फेटाळत लावून बालदी यांचा अर्ज वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर …
Read More »पनवेल भाजपमध्ये ‘प्रवेशोत्सव’
शेकापचे वाकडी येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’ पनवेल : रामप्रहर वृत्त सक्षम नेतृत्व व विकासात अग्रेसर असलेल्या भारतीय जनता पक्षात विविध पक्षांतून दाखल होणार्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, वाकडी ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 4) भाजपत जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल …
Read More »मुग्धाताईंच्या आठवणींनी सारेच हेलावले!
शोकसभेत लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून आदरांजली अर्पण पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मुग्धा लोंढे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारी (दि. 5) सायंकाळी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी लोकप्रतिनिधी आणि पनवेलचे नागरिक …
Read More »महायुतीला महाजनादेश मिळेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 4) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरीत्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा ठाम विश्वास या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युती होईल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper