Breaking News

Ramprahar Reporters

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश

खारघर : रामप्रहर वृत्त जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)मध्ये झाली. या स्पर्धेत यजमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे …

Read More »

रिषभ पंतऐवजी वृद्धिमान साहाला संधी?

मुंबई : प्रतिनिधी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा बर्‍याच काळापासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. लवकरच त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेसाठी रिषभ पंतऐवजी साहाला संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत व्यवस्थापनाकडून मिळत आहेत. साहाला अनुभव आणि यष्टीरक्षण कौशल्यामुळे टीम इंडियात पुन्हा जागा …

Read More »

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्जतच्या मल्लांची ‘ताकद’

कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेतील कुस्तीमध्ये कर्जत तालुक्यातील मल्लांनी मोठी कामगिरी केली आहे. कुस्तीमधील चारही गटात कर्जतचे मल्ल अव्वल ठरले. कर्जतच्या सावळे येथील मल्लांनी तालुक्यात बाजी मारून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. जिल्हास्तरावरदेखील त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. 48 किलो …

Read More »

तीन षटके, शून्य धावा, तीन बळी!

भारताच्या दिप्ती शर्माची अफलातून गोलंदाजी सुरत : वृत्तसंस्था हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 11 धावांनी मात केली. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताच्या दिप्ती शर्माने भन्नाट गोलंदाजी करीत आफ्रिकेच्या फलंदाजांची पिसे काढली. दिप्तीने …

Read More »

‘ईडी’ने केलेल्या कारवाईचा सरकारशी संबंध नाही : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची आहे. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे पवारांवर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली, असे म्हणणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने हेतूपुरस्सर …

Read More »

भाजपची कामे जनतेपर्यंत पोहोचवा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्क्याने तिसर्‍यांदा विधानसभेत पाठविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पक्षाने केलेली विकासकामे त्यांच्यापर्यंत पोहोचवावीत, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते भाजपच्या बैठकीत बोलत होते. …

Read More »

चिरनेरमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन साधेपणात साजरा उरण : प्रतिनिधी, वार्ताहर ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 89वा स्मृतिदिन बुधवारी (दि. 25) शासकीय इतमामात साजरा झाला. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम यंदा साधेपणात झाला. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहात धाकू गवत्या फोफेरकर, …

Read More »

राज्य सरकार माथाडींच्या पाठीशी -मुख्यमंत्री

नवी मुंबई : प्रतिनिधी कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान महत्त्वाचे असते. यावरूनच विकासाचे मोजमाप ठरते. त्यामुळे आमचे राज्य सरकार गेली 50 वर्षे या देशामध्ये यशस्वीपणे वाटचाल करणार्‍या माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिली. ते माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीने त्यांना प्रतिष्ठेचा ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनचे चेअरमन बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधानांनी हा पुरस्कार देशवासीयांना समर्पित केला आहे. गौरवाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी …

Read More »

भारताच्या जलतरण संघाला रीलेमध्ये ‘सुवर्ण’

बंगळुरू : वृत्तसंस्था आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे यांनी 4 बाय 100 मीटर पुरुषांच्या फ्री स्टाइल रीले प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले. भारतीय संघाने 3:23.72 सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपद पटकावले. पाच सेकंदांच्या फरकामुळे रौप्यपदक जिंकणार्‍या इराणच्या संघाने 3:28.46 सेकंद अशी …

Read More »