Breaking News

Ramprahar Reporters

कळंबोलीतील पायाभूत सुविधांची दुरुस्ती

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारामुळे कळंबोली वसाहतीत पायाभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती केली जाणार असून, त्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात नवीन जलवाहिन्या टाकणे, मलनिःसारण वाहिन्यांची हायफ्लो सफाई आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. …

Read More »

राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्व घटकांना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला दिलासा देणारा अंतरिम अर्थसंकल्प बुधवारी (दि. 27) विधिमंडळात सादर केला गेला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी   विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 5449 दुष्काळी गावांमध्ये मदत पोहोचवण्यासाठी विविध तरतुदी सरकारने केल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील थकीत वीजबिल …

Read More »

पाकला उपरती;चर्चेला आम्ही तयार -इम्रान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राग आळवला आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत, युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. …

Read More »

सीमेवर युद्धाचे ढग

लष्कर, नौदल, हवाई दलही सज्ज नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान पिसाळला असून, सीमेवर दोन्ही बाजूकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हद्दीत हल्ला करणारे पाकचे लढाऊ विमान पाडण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. दरम्यान, निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य …

Read More »

भारतीय खेळाडूंचा वायुसेनेला सलाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईचे देशभरातून कौतुक होते आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनीही भारतीय हवाई दलाला सलाम केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने, आम्ही (भारतीय) चांगले वागतो म्हणून आम्हाला कमकुवत समजू नका, असा इशारा ट्विट करून दिला आहे, तसेच …

Read More »

‘सर’ अ‍ॅलेस्टर कूक

इंग्लंडच्या माजी कर्णधाराला विशेष सन्मान लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूकचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. कूकने 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि मंगळवारी त्याला ‘नाइटहुड’ देऊन सन्मानित करण्यात आले. 2007 नंतर हा बहुमान मिळवणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. कूकसह आतापर्यंत इंग्लंडच्या 11 खेळाडूंना गौरविण्यात …

Read More »

दिव्यांग खेळाडू देविदास पाटीलला ‘रौप्य’

नागोठणे : प्रतिनिधी नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 29व्या सिनियर राष्ट्रीय कॅनॉईंग अ‍ॅण्ड कयाकिंग स्पर्धेत रायगड जिल्हा संघटनेचा रसायनी येथील दिव्यांग खेळाडू देविदास पाटील याने रौप्यपदक पटकाविले. त्याने रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. देविदासची जिद्द बघून रायगडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू भरत गुरव यांनी त्याला सर्वतोपरी मार्गदर्शन करून पुढील ट्रेनिगसाठी सांगली येथे दत्ता …

Read More »

मुंबईत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन ही मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने 1 ते 4 मार्च या कालावधीत व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना या ठिकाणी ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पुरुष …

Read More »

बुमरा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सकडून कौतुक विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारताच्या जसप्रीत बुमराने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली असून, सध्याच्या घडीला तो विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने बुमराची स्तुती केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला अखेरच्या चेंडूवर पराभूत केले. कमिन्सनेच विजयी …

Read More »

ऑस्ट्रेलियाचा रिचर्डसन दुखापतीमुळे मायदेशी

बेंगळुरू : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या घरच्या मालिकेत मानहानिकारक पराभव पत्करावा लागलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारत दौर्‍यात विजयाने सुरुवात केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर भारताच्या तोंडचा घास पळवला, मात्र  त्यांचा जलदगती गोलंदाज केन रिचर्डसन याला दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागले आहे. पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना रिचर्डसनला दुखापत …

Read More »