मोहोपाडा : प्रतिनिधी – पावसाचे आगमन गेले तीन चार दिवस होत असल्यामुळे शेतकर्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. या वर्षी 7 जून लाच पावसाने आपले अस्तित्व दाखविल्याने ग्रामीण भागातील शेतकर्यांनी बैलाच्या साह्याने पेरणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकरी पेरणीची जोरदार तयारीला लागलेला असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी …
Read More »अवैध 1400 लिटर गावठी दारु हस्तगत
पनवेल : वार्ताहर – अवैध गावठी दारुची वाहतूक करणार्या इको गाडीचा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलने पाठलाग करून सदर गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये 1400 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलचे निरिक्षक एस. एस. गोगावले यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, …
Read More »निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याचा फायदा घेऊन व्यापार्यांकडून लूट
पनवेल : वार्ताहर – रायगडसह कोकणात झालेल्या निसर्ग वादळामुळे नागरिकांच्या घराचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक घराच्या भिंती पडून जिवीतहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. असे असताना रायगड जिल्ह्यातील व्यापारी पत्रे, स्क्रु, बांधकाम साहित्य चढ्या भावाने विक्री करून नागरिकांची लुट करीत आहेत, अशा …
Read More »भारताकडील परकीय चलनाच्या विक्रमी साठ्याचा अर्थ
कोरोना साथीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे अपरिहार्य आहे, मात्र जगाच्या तुलनेने भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिले की ती बरीच स्थिर आहे. सध्या आपल्याकडे असलेला परकीय चलनाचा विक्रमी साठा, त्याचीच प्रचिती देतो. अशा या स्थितीत संघटीत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसामान्य भारतीयांचा सहभाग वाढला तर त्याचे फायदे सर्वांपर्यंत पोचणार आहेत. कोरोना साथीच्या संकटामुळे भारतीय …
Read More »चित्रातून उभ्या केलेल्या रकमेची विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
चित्रकार पराग बोरसे यांची बांधिलकी कर्जत : बातमीदार – येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांनी काढलेल्या एका निसर्ग चित्राची विक्री केली असून, यातूून जमा आलेले 50 हजार रुपये त्यांनी माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात दिली आहे. लॉकडाऊन काळात मदत व्हावी म्हणून दाखवलेल्या या बांधिलकीबद्दल बोरसे यांचे माथेरान या त्यांच्या …
Read More »चक्रीवादळाने पर्यटन व्यवसायाला फटका
पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने उडविलेली दाणादाण यामुळे कोकणात होत्याचे नव्हते झाले. नेहमी पर्यटकांनी गजबजलेले रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्यांवर सध्या भयाण शांतता पसरली आहे. विशेष म्हणजे पर्यटन व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला आहे. सध्या समुद्र किनारी भागात जिकडे पहावे तिकडे मोडलेली नारळी-फोफळीची …
Read More »झूम अॅपवर नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची सभा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची त्रैमासिक सभा आणि नवीन कार्यकारणी नियुक्ती सभा मंडळाचे अध्यक्ष धनराजजी विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पनवेल येथे डिजिटल झूम अॅप ऑनलाइन सभासद, पदाधिकार्यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून घरीच झाली. शांताराम सोनार यांनी सभेचे प्रास्ताविक करत सभेचा हेतू स्पष्ट केला. तसेच …
Read More »उरण मोरा येथील एसबीआयचे एटीएम सुरू
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील उरण नगरपरिषद हददीतील मोरा येथील एसबीआयचे एटीएम मशीन निसर्ग चक्रीवादळाने गुरुवार (दि.4) पासून बंद असल्याने येथील ग्राहकांची गैरसोय होत होती. या समस्येविषयी दैनिक रामप्रहर वृत्तपत्रात रविवारी (दि. 7) रोजी बातमी छापून आली आणि बँकेचे अधिकारी कामाला लागले. बुधवारी (दि.10) एटीएम मशिन दुरुस्त करण्यात आले. …
Read More »विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही -अॅड. आशिष शेलार
मुंबई : प्रतिनिधी – 11 अकृषी विद्यापीठात यावर्षी अंतिम वर्षासाठी आठ लाख 74 हजार 890 विद्यार्थी असून यापैकी एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 म्हणजे 40% विद्यार्थी नापास करणार? म्हणजे एक पिढी उध्वस्त करणार! सर्वज्ञानी राज्य सरकार ऐका! महाराष्ट्रातील या 40% विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. यासाठी संघर्ष …
Read More »होम क्वारंटाइन व्यक्तींना ऑनलाइन सल्ला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्या नागरिकांना आता घरीच म्हणजे होम क्वारंटाइन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरने यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये होम क्वारंटाइन रुग्णांना डॉक्टरांतर्फे वीडियो कॉल अथवा फोन कॉलमार्फत वैद्यकीय सल्ला दिला जातो. कोरोनाची सौम्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper