Breaking News

Pravin Gaikar

पनवेल तालुक्यात 211 नवीन रुग्ण

11 जणांचा मृत्यू; 329 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 13) कोरोनाचे 211 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 329  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 157 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 287 रुग्ण बरे …

Read More »

मुरूडमध्ये रंगला आगळावेगळा रानभाजी महोत्सव

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती यांच्या विद्यमाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त पंचायत समितीच्या सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात नथुराम वाघमारे व सोमनाथ वाघमारे या आदिवासी बंधूंच्या सहाय्याने रानभाज्यांची आकर्षकपणे मांडणी करण्यात आली होती. यामध्ये …

Read More »

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घ्या; प्रशासनाचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी – केंद्र शासनाचे राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्यामार्फत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार मत्स्यव्यवसाय पूरक योजनांचा लाभ जिल्ह्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक तसेच इतर इच्छुक लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मत्स्यसंवर्धन निगडीत अनेक योजना आहेत. त्यात गोड्या, निमखारे पाण्यातील मत्स्यसंवर्धनाकरिता मत्स्यबीज, कोळंबी बीज …

Read More »

पेण तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी

सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली पेण : प्रतिनिधी – बारावी व दहावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी दाखले मिळविणार्‍यांची पेण तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रात गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. मार्च महिन्यापासून तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्ण कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत होत नसल्याने आणि दाखल्यांचे …

Read More »

मावळला जोडणारी नळीची पायवाट खचली

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील वदप ग्रामपंचायत हद्दीत दुर्गम भागात असलेल्या कळकराई ग्रामस्थांची मावळ आणि कर्जत तालुक्याला जोडणारी बैलगाडीची वाट पावसामुळे खचली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गावातून खाली येणे कठीण होऊन बसले आहे. कळकराई हे कर्जत तालुक्यातील पुणे जिल्हा हद्दीवर असलेले गाव असून, जेमतेम 40 घरांची येथे वस्ती आहे, मात्र …

Read More »

महाडच्या शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर हलविण्यास भाजपचा विरोध

महाड : प्रतिनिधी – महाड तालुक्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठीचे महाड येथील शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. या निर्णयाला महाड भाजपने कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. आमचा एमआयडीसीमधील कोविड सेंटरला विरोध नसून नाते, दासगाव, खाडीपट्टा, विन्हेरे विभाग आणि महाड …

Read More »

सुशांतची आत्महत्या अन् गुंतागुंत

वैश्विक महामारी कोरोनानंतर देशात सर्वांत जास्त चर्चा कशाची होत असेल तर ती म्हणजे बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची. या घटनेमागचे कारण समोर येण्याऐवजी दिवसेंदिवस यामध्ये नवनवे खुलासे होत आहेत. त्याचवेळी काही जण आपल्या अकलेचे तारे तोडत असल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे. युवा, उमदा अभिनेता सुशांत सिंह …

Read More »

पनवेल तालुक्यात 197 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पाच जणांचा मृत्यू; 185 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि.10) कोरोनाचे 197 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 154  रूग्ण …

Read More »

पनवेल तालुक्यात 208 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

पाच जणांचा मृत्यू; 172 रुग्ण कोरोनामुक्त पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 8) कोरोनाचे 208 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 156 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 121 …

Read More »

पनवेलकरांनी मानले भाजपचे आभार

तत्परतेने दखल घेतल्याने विद्युतसेवा पूर्ववत पनवेल : रामप्रहर वृत्त – दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस व वादळामुळे पनवेल परिसरातील व्ही. के. शाळेजवळ विजेच्या खांबावर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. या संदर्भात महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका रुचिता लोंढे, दर्शना भोईर नगरसेवक राजू सोनी यांनी तत्काळ समस्येची दखल घेत पालिका …

Read More »