Breaking News

Pravin Gaikar

आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; पोलिसांसह वकिलाचीही तारांबळ

पनवेल : बातमीदार – चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला 30 वर्षीय आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या आरोपीच्या संपर्कात आलेल्या तळोजा पोलीस स्टेशनमधील पोलिसांसह वकिलपत्र स्वीकारलेल्या आरोपीच्या वकिलाचीही तारांबळ उडाली आहे. संबंधित आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर संपर्कातील 15 पोलीस कर्मचारी आणि वकील यांना क्वारंटाइन व्हावे लागले आहे. 7 जून …

Read More »

मुख्यमंत्री नाही पण माजी मुख्यमंत्री आले

लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण; देवेंद्र फडणवीस यांची वादळग्रस्त मुरूडमध्ये पाहणी मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग वादळी वार्‍यामुळे मुरूड तालुक्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. असे असताना सुद्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फक्त अलिबागलाच भेट दिली. मुरूड तालुक्यात भेट न दिल्याने येथील नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु माजी मुख्यमंत्री व …

Read More »

पनवेल तालुक्यात 51 जण पॉझिटिव्ह; 57 रुग्ण बरे

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 11) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले आहे. तर 57 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी कोरोनाच्या 44 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 55 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन कोरोनाबाधित आढळले …

Read More »

कोकणचा आक्रोश

वादळग्रस्त घरे अथवा स्थावर मालमत्ता पुन्हा उभ्या करता येतात. पिकाकरिता वर्षभराची नुकसानभरपाई देऊन भागते. परंतु 40-50 वर्षे वयाचे आंबे वा माडासारखे वृक्ष जेव्हा जमीनदोस्त होतात तेव्हा सारे जीवनमानच ढासळते. पुन्हा तसे झाड उभे करायला काही वर्षे लागतील हे सरकारने लक्षात घ्यावे. पर्यटन व्यावसायिक व मच्छिमारांचाही विचार सरकारने करायला हवा आहे. …

Read More »

स्वत:ची काळजी घ्या

कोरोना विषाणूमुळे जगभरावर आलेले महामारीचे संकट अद्याप कायम आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्याकडील रुग्णांचा बरे होण्याचा दरही चांगला आहे. परंतु त्याचा अर्थ आपण बेफिकीरपणे वागू शकतो असा अजिबातच होत नाही. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढतो आहे. तेव्हा हे लक्षात ठेवून प्रत्येकाने अत्यंत काटेकोरपणे स्वत:ची काळजी घेणे …

Read More »

सुपारीची झाडे बाजूला काढण्यासाठी मशीन उपलब्ध करुन देण्याची मागणी

मुरुड : प्रतिनिधी – मुरुड तालुक्यात नांदगाव सर्वे काशीद भोईघर दांडा बरशिव व मुरुड शहर भागात वादळामुळे सर्वात जास्त सुपारीच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकपतिनिधींनी पाहणी केल्यानंतर बागायतदारांनी आता साफसफाईकडे आपले लक्ष वेधले आहे. सुपारीची पडलेली झाडे दोन भागात कापून एका बाजूला ठेवण्यात येत आहेत. परंतु यासाठी सरकारने कटर …

Read More »

कर्नाळा परिसरात वन्य प्राणी, पक्षांची थ्रीडी चित्रे

पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनमध्ये कर्नाळा अभयारण्य परिसरात वनक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांच्या संकल्पनेतून वन्य प्राण्यांसह पक्षांची थ्रीडी चित्र रेखाटण्यात आली आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणार्‍यांना अभयारण्यातून गेल्याचा भास होणार असून सेल्फी पॉइंटही बनविला आहे. अभयारण्य परिसरात अगोदर 11 मीटर रुंदीचा रस्ता होता. रुंदीकरणाने तो 30 मीटर रुंदीचा …

Read More »

मुंबई पूणे द्रूतगती मार्गावरील अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

खोपोली : प्रतिनिधी – टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो  दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालक अनिल अशोक भांडवलकर गंभीर जखमी झाला असून टेम्पोमध्ये असलेला कामगार सोपान नामदेव जाधव (46) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गाजवळ मंगळवारी रात्री घडला. टेम्पो  चालक  अनिल  त्यांच्या ताब्यातील  टेम्पोमध्ये …

Read More »

उरण येथे आरोग्यम क्लिनिकचे उद्घाटन

उरण : उरण येथील डॉ. वर्षा वसंत कुडव (बीएएमएस, मुंबई) यांनी विमला तलाव, अपना सहकारी बँकेसमोर आरोग्यम क्लिनिकचे आपल्या आई-बाबांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन केले. या वेळी डॉ. वर्षा कुडव, वसंत कुडव, वीणा कुडव, विरेंद्र म्हात्रे, प्रियंका तांडेल आदी उपस्थित होते. माझ्या आई-वडीलांनी माझ्यासाठी खूप केले आहे. त्यामुळेच मी माझ्या आरोग्यम …

Read More »

नवीन पनवेल येथे गरजूंना अन्नधान्य, रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप

सुशीला घरत यांची सामाजिक बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशीला जगदीश घरत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल प्रभाग 17 मधील 550 जणांना स्वखर्चाने जीवनावश्यक अन्न धान्य तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या आर्सेनिक अलबम 30 गोळ्यांचे मोफत वाटप केले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव …

Read More »