राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे, मात्र तरीदेखील गुटखा सर्रास विक्री केला जात आहे. नेरळ बाजारपेठ आणि परिसरात गुटख्याची पान टपर्यांवर सर्रास विक्री होत आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी पकडलेला गुटख्याचा साठा मातीत गाडला असतानादेखील नेरळ परिसरात गोडाऊन उघडून त्यात साठा करून गुटख्याची नेरळ आणि परिसरात खुलेआम …
Read More »‘नमस्ते ट्रम्प’
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती असलेले डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यावर येत आहेत. तसे पाहिले तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. मागील वर्षी ट्रम्प यांनी ‘हाऊ डी मोदी’ कार्यक्रम आयोजित करून मोदींचे स्वागत केले होते. आता मोदी ‘नमस्ते ट्रम्प’द्वारे त्याची परतफेड करीत …
Read More »भागुबाई चांगू ठाकूर महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीज
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शनिवारी (दि. 22) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश नाईक यांचे क्रिमिनल लॉ अस्पेक्टस ऑफ क्रिमिनल लिटिगेशन या …
Read More »भावी पिढीचे भविष्य घडविण्यासाठी छत्रपतींचे स्मारक उभारणे काळाची गरज -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
खोपोली : प्रतिनिधी : इतिहासाशिवाय आपण पुढे जावू शकत नसून उद्याच्या भावी पिढीचे भविष्य घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महारांच्या शौर्याचा इतिहास व पराक्रमाची साक्ष ठेवण्यासाठी छत्रपतींंचे स्मारके व जयंती साजरी करावा असे अवाहन करीत इतिहास उगाळत बसू नका असे वक्तव्य करणार्यांचा खरपूस समाचार विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आम प्रविण दरेकर यांनी …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या मंडळातर्फे ज्येेष्ठांसाठी काशी यात्रा
उरण : वार्ताहर : आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील महेश बालदी मित्र मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी काशी यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा शनिवारी (दि. 22) सुरु झाली असून शुक्रवार (दि. 28) पर्यंत प्रवास असेल. उरण विधानसभा मतदार संघातील उरण पूर्व भागातील साई, केळवणे, वशेणी, पुनाडे, सारडे, आवरे, कडापे, …
Read More »हॉटेलच्या किचन एसीसाठी वीजचोरी
चोरी केलेल्या विजेचे बिल भरण्याचे आदेश; पनवेल महावितरणचा दणका पनवेल : बातमीदार : हॉटेलच्या किचनमध्ये असलेल्या मोठ्या क्षमतेच्या फ्रीज, डीप फ्रीजरसाठी महावितरणची वीज चोरून वापरणार्या सुकापूर येथील हॉटेलचालक, बंगला आणि भाड्याने दिलेल्या घरांना वीज वापरणार्या मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून वीजमीटरची गती 70 टक्क्यांनी कमी करणार्या वीजचोरांना पनवेल महावितरण विभागाने दणका …
Read More »‘त्या’ कुटुंबीयांच्या आत्महत्येने खळबळ; तळोजा फेज वन येथील घटना
पनवेल : वार्ताहर : भाडेतत्त्वावर तळोजा फेज वन येथील सेक्टर नऊ या ठिकाणी असलेल्या शिव कॉर्नर सोसायटीत राहणार्या उपाध्याय कुटुंबीयांतील चौघांचे मृतदेह शनिवारी (दि. 22) सकाळी बेडरूममध्ये आढळून आल्याने या इमारतीसह परिसरात खळबळ उडाली आहे. या चौघांनी आत्महत्या केली की त्यांचे आधी खून करून नंतर आत्महत्येचा बनाव करण्यात आला याचा …
Read More »न्यायालयाच्या निकालानंतर दिघी पोर्टच्या विकासकामांना वेग
दिवाळीखोरीत गेलेल्या रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्टच्या हस्तांतरण प्रक्रियेला आता वेग आला आहे. सुमारे 2700 कोटी रूपयांचे कर्ज दिघी पोर्ट. लि. वर असल्याने हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे होते. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या जेएनपीटीने हे बंदर ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली होती. परंतु अचानकपणे या कंपनीने यामधून माघार घेतली असुन आता …
Read More »अपयशाचे भय नकोच!
नापास या शिक्क्याने मुलांना नैराश्य येते. त्यातील काही मुले जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात हे तर खरेच. परंतु नापास हा शिक्का त्याहूनही अधिक मोठे नुकसान घडवून आणतो असे निदर्शनास आले आहे. मुख्य म्हणजे नापास मुलाला किंवा मुलीला सरसकट नालायक किंवा कुचकामी ठरवले जाते. त्याचा परिणाम पालकांवर देखील होतोच. दुर्दैवाची एक …
Read More »शिवजयंतीनिमित्त मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त : प्रियदर्शनी सांस्कृतिक व सामाजिक विकास मंडळ आणि देवी अंबामाता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहात झाला. खांदा कॉलनी, सेक्टर 13 येथील अंबामाता मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा झाला. या उत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग ब समिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper