पनवेल : रामप्रहर वृत्त : बँकिंग सोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. बँकेचे ग्राहक व डीएसए प्रदीपराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व उपस्थितांनी दोन्ही महामानवास …
Read More »युथ फोरम सोशल असोसिएशनतर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त : सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, राजकीय, साहित्य व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत काम करणार्या व्यक्तींचा युथ फोरम सोशल असोसिएशन यांच्या वतीने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्ताने देवीचा पाडा येथील आयडियल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात हा कार्यक्रम नुकताच झाला. यूथ फोरम सोशल …
Read More »दीड लाखांच्या प्लास्टिक पिशव्या जप्त; पनवेल महानगरपालिकेची कारवाई
पनवेल ः बातमीदार : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहा. आयुक्त तेजस्विनी गलांडे यांनी टपाल नाका येथील प्रगती ट्रेर्ड्सच्या गोडाऊनवर धाड घालून 750 किलो वजनाच्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. या प्लास्टिक पिशव्यांची किंमत दीड लाख रुपये इतकी आहे. प्रगती …
Read More »ऐरोलीमध्ये शिवसेनेला खिंडार
शिवसेनेच्या जिल्हा संघटक, विभागप्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार गणेश नाईक यांनी केले पक्षात स्वागत नवी मुंबई : बातमीदार : ऐरोली विभागामध्ये शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून नवी मुंबई जिल्हा संघटक अॅड. संध्या सावंत आणि ऐरोली विभागप्रमुख कैलास सुकाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी बुधवारी (दि. 19) आमदार गणेश नाईक यांच्या …
Read More »जय संताजी तेली समाज मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी : पनवेलसह तालुक्यातील इतर ठिकाणी विखुरलेले तेली समाज बांधव एकत्र येऊन पनवेलमधील तेली नाका येथील शनी मंदिरात जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, पनवेल तेली समाज युवा विचार मंच, जिजाऊ महिला मंडळ पनवेल यांच्या वतीने स्नेहसमारंभ उत्साहात पार पडला. या वेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार …
Read More »महागड्या गाड्यांचा अपहार करणार्यास बेड्या
पनवेल ः वार्ताहर : एखाद्या इसमास गाडी विकायची असल्यास अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळवून देतो, असे सांगून सदर गाडी कमी किमतीत दुसर्या व्यक्तीस विकून त्याचे पैसे मूळ मालकाला न देता त्या पैशांचा अपहार करणार्या सराईत गुन्हेगारास तळोजा पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून 35 लाख 90 हजार रुपयांच्या 12 गाड्याही हस्तगत करण्यात …
Read More »सुकापूरच्या उपसरपंचपदी भाजपचे अशोक पाटील
पनवेल ः सुकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे अशोक पाटील यांची बहुमताने निवड झाल्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पाटील यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, दत्ताशेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, जिल्हा परिषद …
Read More »इंदुरीकर महाराजांनी ‘ते’ विधान करायला नको होते -भाजप
मुंबई : प्रतिनिधी : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उफाळून आला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून या वक्तव्यावरून वेगवेगळे मते मांडली जात आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्या वादविवाद भाजपानंही आपली भूमिका स्पष्ट केली …
Read More »उमरठच्या विकासाठी 100 कोटींची मागणी करणार -आ. प्रवीण दरेकर
महाड ः प्रतिनिधी : नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्वराज्यासाठी मोलाचे योगदान होते. त्यांचा त्याग आणि शौर्यगाथा जगामोर आणण्यासाठी उमरठ गावातील त्यांच्या स्मारकाचा पर्यटनाच्या धर्तीवर विकास होण्यासाठी आपण सरकारकडे 100 कोटींची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 17) नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथीदिनी उमरठ …
Read More »‘सीकेटी’त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
पनवेल ः प्रतिनिधी : खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस सोमवारी (दि. 17) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे व्हाइस चान्सलर ए. बी. पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सीकेटी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper