Breaking News

Pravin Gaikar

अजित डोवाल

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नाव सध्या खूपच गाजतेय. कारण ज्या ज्या वेळी संघर्षाचा प्रसंग उद्भवलाय त्या वेळी डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आतासुद्धा भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक-2 मोहिमेत डोवाल यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अजित डोवाल हे 1968च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून …

Read More »

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, असे आपण दरवर्षी मराठी भाषा दिनी अभिमानाने म्हणतो. जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा  …

Read More »

पुलवामाचे चोख प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण अधिकार दिले होते. त्या अधिकाराचा योग्य प्रकारे वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक 2 ची कारवाई करीत पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांचे अड्डेच उद्ध्वस्थ करून टाकलेले आहेत. काश्मीरमधील पुलवामा येथे सीआयएसएफच्या पथकावर आत्मघातकी हल्ला …

Read More »

दिव्यांगांच्या पीसीओ बुथचे बहु-उपयोगिता केंद्रांमध्ये रूपांतरण; सिडकोची मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा दिव्यांगांतर्फे चालवण्यात येत असलेल्या पीसीओ बुथचे रूपांतरण बहु-उपयोगिता केंद्रांमध्ये करण्यास व त्या ठिकाणी इतर वस्तू विकण्यास, पीसीओ बुथचे क्षेत्रफळ 4.8 चौमी (51.66 चौ.फूट) वरून 15.851 चौमी (200 चौ.फूट)पर्यंत वाढवण्यास, तसेच सध्याचे लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्सवर असलेले पीसीओ बुथ भाडेपट्ट्यावर देण्याच्या प्रस्तावास सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या …

Read More »

नैना, खोपटा क्षेत्रातील बांधकामधारकांनी परवान्यासाठी कागदपत्रे सादर करावीत- सिडकोचे आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ खोपटा प्रभावित क्षेत्र या प्रदेशांत सिडकोच्या परवानगीशिवाय बांधकामे करीत असलेल्या बांधकामधारकांनी लवकरात लवकर विकास परवानगी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात …

Read More »

अरुण घाग आणि उपशिक्षक प्रमोद कोळी यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्करपदी निवड

पनवेल : गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक अरुण घाग आणि उपशिक्षक प्रमोद कोळी यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्करपदी निवड झाली आहे. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोघांचे सोमवारी अभिनंदन केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. …

Read More »

एसटी बसचालक-वाहकांना सामान स्वत:सोबत घेण्याच्या सूचना

पनवेल : प्रतिनिधी पनवेल आगारातील प्रत्येक चालक आणि वाहकाला ड्युटीवर असताना गाडी बदलताना आपले  सामान स्वत:सोबत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पनवेलच्या वरिष्ठ आगारप्रमुख वानखेडे यांनी ही माहिती दिली. कर्जत-आपटा या वस्तीच्या एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिरेकी हे रेल्वे किंवा सार्वजनिक प्रवासी वाहनांत बॉम्बस्फोट …

Read More »

आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील पंचशीलनगर झोपडपट्टीमध्ये राहणारे मंगेश रामचंद्र पराड यांच्या झोपडीला 26 जानेवारी रोजी आग लागली होती. या आगीमध्ये मंगेश पराड यांची झोपडी व सर्व सामान जळून खाक झाले. त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 10 हजार रुपयांची मदत केली आहे. यासाठी प्रभाग क्र. 17च्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे …

Read More »

आदिवासी महिलेवर बलात्कार करून खून; दिघोडेतील घटना

जेएनपीटी : प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे गावाजवळ एका आदिवासी महिलेवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जवळच असणार्‍या कंठवली कातकरवाडी येथील ही महिला असून अनसूया प्रल्हाद कातकरी (32) असे तिचे नाव आहे. उरण पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. दिघोडे …

Read More »

सोनारी ग्रामपंचायतीवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा

जेएनपीटी, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महेश कडू भरघोस 246 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना 978 मते मिळाली; तर त्यांच्या प्रतिस्पर्धी  असणार्‍या महाआघाडीच्या उमेदवार सुजाता दिनेश कडू यांना 732 मते मिळाली. पूनम कडू यांच्या विजयानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष …

Read More »