Breaking News

Pravin Gaikar

परेशशेठ ठाकूर यांच्याकडून तळोजा मजकूरमध्ये पाहणी

पनवेल : महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत तळोजा मजकूर गावातील सद्गुरू वामनबाबा महाराज पुण्यतिथी सोहळा 12 मार्च रोजी आहे. या सोहळ्यानिमित्त रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील वारकरी भाविक-भक्त हजारोंच्या संख्येने येतात, पण तेथील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ते रस्ते व्यवस्थित व्हावेत म्हणून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांना तेथील परिस्थिती …

Read More »

विद्यार्थ्यांनो, यशवंत व्हा! कीर्तिवंत व्हा!!

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा मौलिक सल्ला कामोठे : रामप्रहर वृत्त यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि शालेय जीवनात यशस्वी होऊन आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा, असे प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी कामोठे येथे केले. कामोठेमधील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर …

Read More »

बार्णे शाळेत शहीद जवानांना श्रद्धांजली

कर्जत : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना कर्जत तालुक्यातील बार्णे येथील प्राथमिक शाळेत श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक किशोर म्हात्रे, पोलीस पाटील धनाजी मुने, स्वामी विवेकानंद शालेय समितीचे अध्यक्ष दशरथ मुने, शिक्षिका सोनल शिरसाठ, अस्मिता म्हात्रे, प्रणिता निकम यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Read More »

एमबीबीएस परीक्षेत श्वेता पाटीलचे यश

नागोठणे : येथील डॉ. सुनील पाटील आणि डॉ. गीता पाटील यांची ज्येष्ठ कन्या, श्वेता पाटील हिने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे. श्वेताने सोलापूरच्या अश्विनी रूरल वैद्यकीय महाविद्यालयात हे शिक्षण पूर्ण केले असून पदवीदान समारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भरूड, संस्थेचे अध्यक्ष बिपिन …

Read More »

मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना करा; ‘कोमसाप’ची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी राज्यात मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना करावी आणि बारावीपर्यंत मराठी भाषेचा विषय अनिवार्य व्हावा, यासाठी मराठी शिक्षण कायदा करावा, अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषदे (कोमसाप)ने केली आहे. या संदर्भातील एक निवदेन कोमसापच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 26) रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले. राजभाषा असूनही मराठी भाषेचे महत्त्व दिवसेंदिवस कमी …

Read More »

कर्जत-खालापूरच्या 101 रुग्णांच्या डोळ्यांना पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हाताचा स्पर्श

कर्जत : बातमीदार कर्जत आणि खालापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक रुग्णालयात नेत्र दोष असणार्‍या रुग्णांचे फॉर्म भरून घेण्यात आले होते. त्यातील 101 रुग्णांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया खुद्द पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केल्याने दोन्ही तालुक्यातील रुग्णांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र …

Read More »

रोहे आणि नेरळ येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

रोहे ः प्रतिनिधी श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकट दिनोत्सव सोमवारी (दि. 25) रोहे येथील गजानन ज्ञानदेव चौधरी यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. चौधरी परिवार गेल्या 17 वर्षापासून हा सोहळा साजरा करतात. सकाळी काकड आरती, श्री अभंग सेवा मंडळाचे हेमंत ओक, उदय ओक, प्रकाश कुंठे, बापट बंधू, नंदकुमार धारप यांचे …

Read More »

पेणकरांना नगरपालिकेचा दिलासा

चर्चेअंती अर्थसंकल्पास मंजुरी, कोणतीही करवाढ नाही पेण : प्रतिनिधी कोणतीही करवाढ नसलेल्या पेण नगर परिषदेच्या 50 कोटी 42 लाख 62 हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये शिलकी अर्थसंकल्पात अखेरची शिल्लक दोन कोटी 53 लाख 97 हजार 847 रुपये असून सन 2018-19 या …

Read More »

हेडफोनमुळे वाढतोय बहिरेपणा

शहरामधील जीवनमान हे ग्रामीण जीवनमानापेक्षा अधिक धावपळीचे आणि धकाधकीचे असते. शहरामधील प्रदूषण, आवाज, तणाव, जेवणाच्या पद्धती यांमुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यातही ध्वनिप्रदूषणामुळेही अनेकांना त्रास होतो. म्हणूनच शहरांमध्ये कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणारे अनेक जण गाड्यांच्या आणि इतर आवाज ऐकण्याऐवजी इयरफोन्स किंवा हेडफोन्स कानाला लावून गाणी ऐकत प्रवास करणे पसंत करतात, मात्र …

Read More »

बोलीभाषेचे जतन करण्याची गरज

मराठी भाषेचे संरक्षण व संवर्धनासाठी प्रादेशिक भाषांचे जतन होणे आवश्यक आहे. वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष लेख.. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून त्यामुळेच भाषेविषयी सजगता निर्माण होण्यास निश्चित …

Read More »