कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरातील नानामास्तर नगरमधील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व अभिषेक करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष रजनी …
Read More »Monthly Archives: February 2019
पनवेलमध्ये शिवजयंतीचा उदंड उत्साह
पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मंगळवारी (दि. 19) पनवेलमध्ये महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख …
Read More »महाडमध्ये गावागावातून शिवज्योतींचे आगमन
महाड : प्रतिनिधी ’जगात भारी 19 फेब्रुवारी’ अशी धुन आणि मोठ्या उत्साहात महाड तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशाच्या आणि लेझिम नृत्याच्या तालावर गावागावातून शिवज्योतींचे महाडमध्ये आगमन झाले. नगरपालिकेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोहोप्रे व इतर गावांत सामाजिक …
Read More »शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका; मान्यवरांचे अभिवादन
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मंगळवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरी भागात मिरवणुका काढण्यात आल्या. अलिबाग शहरात मावळा प्रतिष्ठानसह, विविध सामाजिक व शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन शिवप्रतिमेची मिरवणूक काढली होती. यात मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी झाले होते. अलिबाग शहरातील ब्राह्मण आळीमधील …
Read More »पनवेलमध्ये सामुदायिक कन्यादान
पनवेल : वार्ताहर सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या 83व्या जन्मोत्सवानिमित्त सामुदायिक कन्यादान उपक्रम राबविण्यात आला. या वेळी पाच जणींचे कन्यादान साईभक्तांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. हा कार्यक्रम पनवेल येथील साई दरबारमध्ये झाला. या वेळी स्वतः नारायण बाबा वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन खेमचंद …
Read More »वाशीतील केबीपी कॉलेजमध्ये वार्षिक बक्षीस वितरण सोहळा
वाशी : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन सोमवारी (दि. 18) करण्यात आले होते. हा समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या विद्यार्थ्यांना या वेळी मान्यवरांच्या …
Read More »खांदा कॉलनी, तक्क्यातही शिवरायांचा जयजयकार
पनवेल : रामप्रहर वृत्त रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खांदा कॉलनी आणि तक्का येथे मंगळवारी (दि. 19) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीदेखील वाहण्यात …
Read More »जय भवानीऽऽ, जय शिवाजी!
गव्हाण-कोपरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी (दि. 19) गव्हाण-कोपरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कोपर फाटा येथील शिवरायांच्या पुतळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त गव्हाण-कोपर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »पनवेलमध्ये अर्धवट मृतदेह आढळला
पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानक परिसरात सोमवारी (दि. 18) सायंकाळी एक अर्धवट मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी पाहणी केली. पनवेल रेल्वेस्थानकाकडे जाताना उजव्या बाजूला सिडकोचे मोठे मैदान असून, त्याठिकाणी अज्ञात व्यक्तींनी छातीपासून ते डोक्यापर्यंतचा अर्धा मृतदेह फेकून दिला …
Read More »शहीद जवानांना तळोजात श्रद्धांजली
पनवेल : वार्ताहर जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात झालेल्या शहीद जवानांना तळोजा सीइटीपी व टीआयएकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यात वीरमरण आलेले महाराष्ट्रातील बुलडाण्याचे सुपुत्र नितीन शिवाजी राठोड आणि संजय सिंग दिक्षित यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाखाची मदत करण्यात येणार असल्याचे सीइटीपी व तळोजा इंडस्ट्रीयल असोसियशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी जाहीर …
Read More »