Breaking News

Monthly Archives: February 2019

सोनारीच्या विकासाला प्राधान्य देणार : पूनम कडू

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत निवडणुकीला रंग चढू लागला असून, भाजप-शिवसेना युतीच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार पूनम महेश कडू यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. पूनम कडू यांनीही सोनारीच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली आहे. अत्यंत साध्या, सरळ स्वभावाच्या, तसेच कार्यक्षम असलेल्या पूनम कडू या महिलावर्गात लोकप्रिय …

Read More »

विकासकामांच्या पाठबळावर आमचा विजय निश्चित, भाजप युवा नेते महेश कडू यांचा विश्वास

उरण : प्रतिनिधी सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप- शिवसेना एकवटली असून, मागील सरपंच पदाच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांच्या पाठबळावर आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य महेश कडू यांनी व्यक्त केला आहे. श्री. कडू पुढे म्हणाले की, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी …

Read More »

चिर्बी, माचेला खारभूमी योजनेचे बळकटीकरण करणार

खारभूमी मंत्री दिवाकर रावते यांची ग्वाही; शेतकरी आणि कंपनी अधिकार्‍यांची बैठक पेण : प्रतिनिधी राज्यशासन शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, पेण तालुक्यातील चिर्बी, माचेला खारबंधिस्तीचे बळटीकरण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी (19 फेब्रुवारी) येथे दिली. जेएसडब्ल्यू स्टिल कंपनी …

Read More »

म्हसळा आडी बंदर येथील झोपडीला आग

आदीवासी महिला भाजली म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील आडी बंदरवाडी येथील दिलावर यांच्या  आंबा बागायतीतील झोपडीला सायंकाळी आग लागली. यावेळी जळत्या झोपडीतील कपडे काढण्यासाठी गेलेली शैला विजय हिलम (वय 22) ही आदिवासी महिला सुमारे 70 टक्के भाजली. विजय हिलम व त्याची पत्नी शैला हे आडी बंदर येथील दिलावर यांच्या आंबा …

Read More »

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा एल्गार

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने 2005 नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या  कर्मचार्‍यांसाठी जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदान  निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे. जूनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी, यासाठी लढा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या प्राथमिक विभागाच्या महाड येथे झालेल्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात घेण्यात आला आला. महाराष्ट्र …

Read More »

शेलू गावाच्या जंगलात सापडली दहा वर्षांची मुलगी

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील शेलू गावातील जंगलात मंगळवारी (19 फेब्रुवारी) सकाळी तेथील पोलीस पाटील मनोज पाटील यांना एक 10 वर्षाची मुलगी सापडली. संबंधित पोलीस पाटील यांनी सदर मुलीला नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आई मारणार म्हणून नंदिनी आलोकनाथ चव्हाण ही चौथी इयतेत असलेली मुलगी मंगळवारी सकाळी 8 वाजता आपल्या …

Read More »

म्हात्रे विद्यालयात शुभचिंतन सोहळा

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा नुकताच झाला. या कार्यक्रमास श्री. प्राचार्य गायकवाड, एन. आर. पाटील, श्री. भेंडे, एस. आर. गावंड, एस. आर. म्हात्रे, महेश म्हात्रे, श्री. जाधव, वायकोले मॅडम, शकुंतला पाटील, सांगीता म्हात्रे, शेखर म्हात्रे, वैभव गावंड, निवास गावंड, नंदलाल पाटील, …

Read More »

चिरनेरमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

चिरनेर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथील माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने नववा स्नेहमेळावा प्राथमिक केंद्र शाळेत रविवारी (दि. 17) झाला. ज्या शाळेने हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजून, त्यांना जीवनात यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे त्या शाळेचे ॠण कधीच विसरता येणार नाहीत, असे उद्गार ग्रीन लॅण्ड डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर मोकल यांनी …

Read More »

उरण येथे कॅन्डल मार्च

दहशतवादी हल्ल्याचा निषेध, शहिदांना श्रद्धांजली उरण : वार्ताहर भारिप बहुजन महासंघ उरण तालुका व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कँडल मार्च काढून निषेध करण्यात आला, तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उरण चारफाटा ते तहसीलदार कार्यालय असा कँडल मार्च काढण्यात आला होता. यामध्ये भारिप …

Read More »

कर्जतची करिश्मा बनली पॅसिफिक सुंदरी

कर्जत : बातमीदार [google-translator] मुंबई विलेपार्ले येथील सहारा स्टार इंटरनॅशनलमध्ये मिस अ‍ॅण्ड मिसेस इंडिया पॅसिफिक 2019 ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले होते. शंभरहुन अधिक मिस आणि मिसेस या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यात विविध देशांतील महिलांचाही सहभाग होता, त्यामधून 10 जणांची निवड करण्यात आली आणि यामध्ये कर्जतच्या करिश्मा सैनी या …

Read More »