महाराष्ट्राला अनेक थोर वक्त्यांची परंपरा लाभली आहे. निवडणुका आल्या की या स्टार प्रचारकांची सवय महाराष्ट्रातील जनतेला झाल्याशिवाय राहत नाही. विद्यमान स्थितीतही अनेक स्टार प्रचारक आहेत. त्यांच्याकडे भाषणाची वेगळीच कला आहे. दुर्दैवाने अनेक स्टार प्रचारक राजकीय पटलावरून कायमचे निघून गेले आहेत. त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा… लोकसभेच्या महासंग्रामाचा महाराष्ट्रातील अखेरचा अर्थात …
Read More »Monthly Archives: April 2019
मतदारराजा जागा हो..!
आपल्या लोकशाहीप्रधान देशात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे. याबरोबरच राज्यातील ‘मत’संग्राम संपुष्टात येईल. आतापर्यंत झालेली मतदानप्रक्रिया पाहता नवमतदार वाढले, पण मतदानाची टक्केवारी काही वाढली नाही. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग, प्रशासन आपल्या परीने प्रयत्न, जनजागृती करीत असले …
Read More »अल्पवयीन मुलाने चोरल्या तब्बल 20 सायकली
कर्जत : बातमीदार तालुक्यातील उक्रूळ परिसरातील एका अल्पवयीन मुलाने नेरळ, कर्जत, बदलापूर भागातून सुमारे 20 सायकली चोरून त्यातील काही सायकली उक्रूळ तर काही सायकली नेरळ परिसरात ठेवल्या होत्या. नेरळ पोलिसांनी त्याच्याकडून 18 सायकली ताब्यात घेतल्या असून, त्याच्या गुन्हा दाखल केला आहे. नेरळ राजेंद्रगुरूनगर येथील संतोष गोविंद शिंगाडे यांनी आपल्या लहान …
Read More »पिकअप टेम्पो पलटी झाल्याने सहा जण गंभीर जखमी
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव येथून मुरुडकडे परतणारा पिकअप टेम्पो अचानक पलटी झाल्याने मुरुड कोळीवाड्यातील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच जणांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथे हलवण्यात आले आहे. मुरुड कोळीवाडा येथील बेंजो पथकातील सहा वादक आपल्या सहकार्यांसोबत पिकअप टेम्पोतून मजगाव येथे एका हळदी समारंभात बेंजो वाजवण्यासाठी गेले होते. …
Read More »किंजळोली गावात दोन गटात हाणामारी
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील किंजळोली गावात किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी होण्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यामध्ये दोन्ही गटातील सातजण जखमी झाले आहेत. या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. किंजळोली गावात यापूर्वी झालेला दोन गटातील वाद मिटवण्यात आला होता. मात्र गुरुवारी पुन्हा वाद झाला …
Read More »माथेरानमध्ये महायुतीची भव्य प्रचार रॅली
माथेरान : रामप्रहर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (दि. 26) माथेरानमध्ये रॅली काढण्या आली होती. या लोकसभा निवडणूकीत खासदार बारणे यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी समस्त माथेरानच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रचार रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे सर्वधर्मीय मतदार या रॅलीमध्ये सहभागी झाले होेते. त्यामुळे महायुतीच्या श्रीरंग बारणे यांना …
Read More »सेनेच्या बालेकिल्ल्यात पवारांची ’कसोटी’
कर्जत : विजय मांडे मावळ लोकसभा मतदारसंघ म्हणजे सेनेचा अर्थात युतीचा बालेकिल्ला. 2009 मध्ये हा मतदार संघ अस्तित्वात आला आणि त्यांनतर झालेल्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे खासदार लोकसभेत गेले. मात्र पवार कुटुंबातील पार्थ यांच्या उमेदवारीमुळे यंदा या मतदार संघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असले तरी हा मतदार संघ म्हणजे …
Read More »रायगडच्या मतदारांवर ठरणार मावळचा खासदार
अलिबाग : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. रायगड जिल्ह्यातील 11 लाख 9 हजार 250 मतदार या मतदारसंघात आहेत. हेच मतदार मावळचा खासदार ठरवणार आहेत. या मतदारसंघात 21 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थपवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, …
Read More »पुणे तिथे सर्वच उणे
जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारतीय मतदान प्रक्रियेकडे लोकतंत्र मानणारे देश पाहतात. अभ्यासही केला जातो. हिंदुस्थानच्या पंतप्रधान निवडीसाठी अद्यापपर्यंत तीन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. चौथा टप्पा येत्या 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. देशात 117 ठिकाणी झालेल्या मतदानात 64 टक्के, तर राज्यात 14 ठिकाणी झालेल्या मतदानात 61.30 टक्के मतदान झाले. …
Read More »शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आणि अर्धी चड्डी!
एखादं जवळचं माणूस आपल्यापासून दूर गेलं की मनाला खूप वेदना होतात. प्रेम, युद्ध आणि राजकारणात सारं काही माफ असलं तरी जवळच्या व्यक्तीचा वियोग हा वेदनादायक असतो. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि अनेकांना बाळासाहेबांनी मोठे केले. त्यापैकी राज ठाकरे, छगन भुजबळ …
Read More »