Breaking News

Monthly Archives: May 2019

सफर वाशिष्ठी बॅकवॉटरची!

मनसोक्त संचार करणार्‍या मगरी पाहायच्यात ? केरळच्या बॅकवॉटरचा आनंद कोकणात मिळवायचा आहे? रम्य खाडी, संथ पाणी, किनार्‍यावरची टिपिकल किनारवर्ती गावं, किनार्‍याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता अनुभवायची असेल तर पर्यटकांसाठी चिपळूणमध्ये ‘वाशिष्ठी बॅकवॉटर’ हा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध …

Read More »

तेलंगणातून धडा शिकावा

तेलंगणामध्ये बारावीच्या परीक्षेच्या निकालांपाठोपाठ जे घडले ते सुन्न करणारे आहे. या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम तेलंगणा परीक्षा मंडळाने एका खासगी कंपनीकडे सोपवले आणि अवघ्या निकालांचा बट्याबोळ झाला असे बाहेर आलेल्या प्राथमिक माहितीवरून दिसते आहे. परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आधीच यापूर्वी जगभरात भारताचे नाव …

Read More »

‘सोल सेन्सेशन 2.0’ कार्यक्रम उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे काकाजीनी वाडीमध्ये आयएनआयएफडीच्या वतीने ‘सोल सेन्सेशन 2.0’ या कार्यक्रमाचे शनिवारी (दि. 4) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक डिझायनर्सनी आपल्या कला सादर केल्या. या कार्यक्रमाला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सुप्रसिद्ध सिनेकलाकार अली …

Read More »

ईव्हीएमवर आमचा भरवसा नाय, भरवसा नाय

’ईव्हीएम मशीनवर आमचा भरवसा नाय, आमचा भरवसा नाय ’ या गाण्याचे सुर शरद काकांनी बारामतीतून आळवायला सुरुवात करताच इंजिनाच्या धक धक बरोबर ते ममतादीदी पर्यन्त पोहचले प. बंगाल मधून ममतादीदीनी ही ते आळवायला सुरवात केली. काँग्रेसवाल्यांनी त्याला कोरस मध्ये साथ दिली. पण निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे लक्ष न देता ईव्हीएम मशीनवरच …

Read More »

खवल्या मांजराची तस्करी करणारे सात जण गजाआड

पाली/बेणसे ः प्रतिनिधी  सुधागड तालुक्यात अंधश्रध्दा, काळी जादू व औषधासाठी दुर्मीळ वन्यजीवांची तस्करी करणार्‍या तस्करांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी पाली वनविभागाने खवल्या मांजराची तस्करी करणार्‍या तस्करांस पकडले आहे. काही महिन्यांपूर्वी सुधागड तालुक्यात दुर्मीळ प्रजातीच्या व कोट्यवधी रुपयांच्या मांडूळाची तस्करी करणार्‍यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या, तसेच बिबट्याच्या नखांची तस्करी …

Read More »

अलिबाग विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडणार : अनंत गीते

अलिबाग ः प्रतिनिधी रायगडचे मतदार सुज्ञ आहेत. या सुज्ञ मतदारांनी माझ्या बाजूनेच कौल दिला आहे. या वेळी अलिबाग विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडेल. या मतदारसंघातही मला आघाडी मिळेल. केवळ मलाच आघाडी मिळेल असे नाही, तर आलिबाग विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमादारदेखील शिवसेनेचाच असेल, असा आत्मविश्वास रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय …

Read More »

गडचिरोलीतील माओवादी हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेंचा हात?

गडचिरोली ः वृत्तसंस्था गडचिरोलीतील कुरखेडा येथे महाराष्ट्रदिनी (1 मे) झालेल्या भ्याड माओवादी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव- भीमा हिंसाचारानंतर आता या प्रकरणातही मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 1 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा …

Read More »

काश्मीरमध्ये भाजप नेत्याची हत्या

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये संशयित दहशतवाद्यांनी भाजप नेते गुल मोहम्मद मीर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या.  देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत असताना काश्मीरमध्ये राजकीय नेत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री तीन दहशतवादी मीर यांच्या नौगाम वोरिनाममधील …

Read More »

पनवेलच्या सुपुत्राने महाराष्ट्राला लावले वेड

‘लिंबू कापला रस गळू लागला’ पनवेल : प्रतिनिधी  : पनवेलच्या सुपुत्र असलेल्या मयूर नाईकने आपल्या आवाजाच्या जादूने कमाल केली असून त्याने गायलेल्या ‘लिंबू कापला रस गळू लागला’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. विशेष म्हणजे या लग्न सिझनमध्ये 72 लाखाहून अधिक रसिकांनी युट्युबवर या गाण्याला दाद देऊन हे गाणे …

Read More »

कोप्रोली यात्रोत्सव उत्साहात साजरा

उरण : बातमीदार  : उरण तालुक्यातील कोप्रोली येथे कोप्रोली यात्रोत्सव 2019 नुकताच मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे या वर्षी श्री बापुजीदेव आणि श्री जोगेश्वरी देवीची यात्रा दि. 4 व 5 मे रोजी कोप्रोली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दहा गावांची पारंपरिक यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी अशी …

Read More »