Breaking News

Monthly Archives: June 2019

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; दोन ट्रक दुभाजकावर धडकले, चालक गंभीर

पनवेल ः बातमीदार – मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना गुरुवारी (दि. 27) रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ दोन ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता मुंबईकडून पुणे बाजूकडे एक मोठा लाईनवरचा ट्रक उजव्या …

Read More »

सुधागडात पावसाची बरसात

पाली : प्रतिनिधी सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने सुधागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सकाळी पाली, जांभुळपाड्यासह तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यंदा मान्सुनचे आगमन उशिरा झाले. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. अखेर ही प्रतिक्षा संपली असून शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. पाली व जांभुळपाडा …

Read More »

मुसळधार पावसामुळे पनवेलकर सुखावले

पनवेल ः वार्ताहर – गेल्या 15 दिवसापासून पावसाची पनवेलकर आतुरतेने वाटत पाहत होते. तो पाऊस गुरुवारी (दि. 27) सायंकाळपासून सुरूवात झाला व त्याचा जोर वाढतच गेल्याने या पावसामुळे पनवेलकर चांगलेच सुखावले आहेत. असाच पाऊस अजूनही काही तास पडत राहू दे हीच इच्छा पनवेलकर व्यक्त करीत आहेत. पावसाच्या दमदार हजेरीमुळे वातावरण …

Read More »

अंमली पदार्थविरोधात पोलिसांची मोहीम

समिती स्थापन करण्याचे शिक्षण संस्थांना आवाहन पनवेल ः बातमीदार – आपल्या देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईला अंमली पदार्थ  सेवनापासून परावृत्त करण्यासाठी प्रत्येकाने अंमली पदार्थविरोधी मोहीम ही स्वत:च्या घरापासून सुरू करावी, पालकांनी आपल्या मुलांना याबाबत माहिती द्यावी. शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थविरोधी विद्यार्थी व शिक्षकांची एकत्रित समिती स्थापन करावी, असे आवाहन नवी …

Read More »

नेरळ रेल्वेस्थानकात अनोखा धबधबा

कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्थानकात काही दिवसांपूर्वी पत्र्याची शेड नव्याने बसविण्यात आली आहे. मात्र ज्या भागात नवीन पत्रे लावण्यात आले, अगदी त्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याचे धबधबे कोसळत आहेत. नेरळ रेल्वे स्थानकातील फलाटांवरील पत्रे बदलण्यात आले आहेत. फलाट एक आणि दोन तसेच माथेरान गाडी उभ्या असलेल्या फलाटांवरदेखील नवीन पत्रे टाकण्यात …

Read More »

पनवेलमध्ये लवकरच ‘मेट्रो’

शहर ट्रेनने विमानतळाला जोडण्याचे विकास आराखड्यात नियोजन टपाल नाका ते रेल्वेस्थानकदरम्यानही धावणार पनवेल ः बातमीदार – पनवेल महापालिकने 2045 सालापर्यंतचा केलेल्या प्रस्तावित नियोजन आराखड्यात ‘मेट्रो’चाही समावेश केला असून प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पनवेल शहर मेट्रोने जोडण्यात येणार आहे. यासाठीचे विशेष काम सध्या नियोजन विभागात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियोजनानुसार शहरातील …

Read More »

खोपोलीत मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी

खालापुरात बळीराजा सुखावला खोपोली : प्रतिनिधी खालापुर व खोपोलीत गुरुवारी  सायंकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर शुक्रवारीही कायम राहिल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र या पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने खोपोली नगरपालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. ‘गटारे दाखवा‘ असे आवाहन नागरिकांनी शुक्रवारी नगरपालिकेला केले. दोन दिवसांपासून …

Read More »

पर्यटकांनी आततायीपणा टाळल्यास समुद्रकिनारे सुरक्षित!

पर्यटन व्यवसायामुळे रोजगाराच्या संधी वाढत असून कोकण किनारपट्टी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरू पाहत आहे. अशात बीचवर धम्माल करावीशी न वाटली तरच नवल, परंतु नवख्या ठिकाणी समुद्राचा अंदाज न घेता तरुणाई पोहण्यासाठी खूपच अधीर होते. भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास समुद्रात उडी घेणे जीवावर बेतू शकते. किंबहुना प्राणाशी खेळ करीत आहोत …

Read More »

मराठ्यांना अखेर न्याय!

मराठा समाजासाठीचे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध ठरविणारा ऐतिहासिक निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळवून देण्याचा शब्द भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पाळला आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागवणे, त्याआधारे मराठा आरक्षणाचा कायदा करणे ही प्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्याने …

Read More »

भारताला पाठिंबा देणार की इंग्लंडला? नासीर हुसैनचा पाक क्रिकेट रसिकांना सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मजबूत दावेदार असलेला इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. या संघाला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे रविवारी होणार्‍या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, असा सवाल इंग्लंड क्रिकेट संघांचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना केला …

Read More »