पनवेल ः भाजप ओबीसी सेलचे रायगड जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर आणि कामोठे युवा मोर्चा चिटणीस आदित्य भगत यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, अॅड. आशा भगत, रवी जोशी, सुषमा पाटील, विद्यालयाचे प्रिंसिपल …
Read More »Monthly Archives: June 2019
‘स्माईल प्लस’ने आणले मनोरुग्णांच्या चेहर्यावर हास्य
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील एका गोठ्यात काम करणार्या आठ जणांची सुटका पुण्याच्या स्माईल प्लस फाऊंडेशनने पोलिसांच्या मदतीने केली. आठपैकी चार जण मनोरुग्ण असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेणार्यांविरोधात पोलीस काय कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे. पोलिसांनी संबंधितांना न्यायालयात हजर केले असता चार …
Read More »आंबेनळी घाटात कोसळला साखरेचा ट्रक
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये शुक्रवारी (दि.28) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचा ट्रक दरीमध्ये कोसळला. काही वर्षांपूर्वी याच परिसरामध्ये असेच दोन साखरेचे ट्रक कोसळल्याची घटना झाली होती. या घटनांची ही पुनरावृत्ती मानली जात आहे. सांगली कुंडळगाव येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याचा पाटील यांचा ट्रक (एमएच 50-2526) …
Read More »खोपोलीत पावसाची फटकेबाजी
खोपोली : प्रतिनिधी गुरुवारपासून पडणार्या धुव्वादार पावसाने खोपोलीसह खालापूरला झोडपले पावसाच्या या फटकेबाजीने स्थानिक प्रशासन मात्र क्लीन बोल्ड झालेले पहावयास मिळाले. नॉनस्टॉप पडणार्या पावसाने शहराच्या डीसीनगर, शिळफाटा, चिन्मयनगर, खालची खोपेाली, कृष्णानगरसह अनेक भागात पाणीच पाणी झाले. भानवज काजुवाडी टेकडीजवळ असलेल्या कमला रेसीडेन्सी आवारात दरड कोसळली जीवीतहानी झाली नाही, पण परिसरात …
Read More »सिडको वसाहतींमध्ये यांत्रिक झाडू?
स्वयंचलित यंत्राद्वारे रस्ते चकाचक करण्याचे नियोजन पनवेल ः बातमीदार- सिडकोने उभारलेल्या वसाहतींमधील प्रशस्त रस्त्यांची स्वच्छता स्वयंचलित यंत्राद्वारे करण्याचे पनवेल महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी पालिका आयुक्तांनी नवी मुंबई, पुणे व इतर पालिकांमध्ये होणार्या रस्ते स्वच्छतेचा आढावा घेतला असून दोन यंत्रे घेण्याचा विचार करीत आहेत. या यंत्रांमुळे तासाला 10 किलो मीटरचा रस्ता …
Read More »पर्यावरणप्रेमी योगेश पगडे यांना कासाडी नदीच्या स्वच्छतेसाठी होडी भेट
रसायनी ः वार्ताहर – पर्यावरणप्रेमी योगेश पगडे हा स्वयंप्रेरणेने कासाडी नदीचे पात्र स्वत: मेहनत करून वर्षभर स्वच्छ करीत असतो. स्वतःजवळ होडी व आवश्यक साधनसामग्री नसताना केवळ पर्यावरण संवर्धनासाठी तो हे काम करतो. त्याच्या कार्याची दखल तळोजा पर्यावरण विभागाचे सुनिल भोईर यांनी घेऊन एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे होडीची मागणी केली. …
Read More »कर्जतमध्ये दरड कोसळण्याची भीती
नगर परिषदेकडून 135 घरांना नोटीस कर्जत : प्रतिनिधी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन, खबरदारी म्हणून नगर परिषद प्रशासनाने शहरातील 135 घरांना नोटीसी बजावल्या आहेत व तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगर परिषद हद्दीतील मुद्रे बुद्रुक, गुंडगे आणि भिसेगाव या ठिकाणी टेकडीखाली वस्ती, घरे आहेत. पावसाळ्याच्या …
Read More »पनवेल बार असोसिएशनकडून चव्हाण यांना श्रद्धांजली
पनवेल ः रामप्रहर वृत्त – ज्येष्ठ विधीतज्ज्ञ स्व. ई. ए. चव्हाण यांचे नुकतेच 73व्या वर्षी निधन झाले. पनवेल बार असोसिएशनच्या वतीने येथील बार रुममध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधिश रावसाहेब, भााकरे, पाठक, मुजावर, स्वामी तसेच बार असोसिएशानचे अध्यक्ष मनोज भुजबळ व अन्य वकील उपस्थित होते. यावेळी ई. ए. …
Read More »नागोठण्यात पावसाचे दमदार आगमन
नागोठणे : प्रतिनिधी अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या पावसाचे अखेरीस गुरुवारी सायंकाळपासून दमदारपणे आगमन झाले आहे. या पावसाने बळीराजा सुखावला असून सोमवारपासून या भागात भात लावणीच्या कामाला सुरुवात होईल, असे शेतकर्यांकडून सांगण्यात आले. नागोठण्यात गुरुवारी सायंकाळी सुरुवात केल्यानंतर रात्री नऊनंतर पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडण्यास प्रारंभ झाल्याने तलाव …
Read More »चिमुकलीवर बलात्कारप्रकरणी नराधमास 10 वर्षांचा कारावास
उरण ः वार्ताहर – उरणमधील बौद्धवाडी येथील चारवर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयाने आरोपी रोहन राजेंद्र कासारे (20) यास दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी राजेंद्र कासारे यांनी याच ठिकाणी रहाणार्या चारवर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper