Breaking News

Monthly Archives: July 2019

सायबर गुन्ह्यांच्या तपासाला येणार वेग

नवी मुंबईत सायबर सुरक्षा प्रकल्पाचे मुख्यालय नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होणार्‍या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयासाठी नवी मुंबईतील महापे औद्योगिक विकास महामंडळाच्या मिलेनियम बिझनेस पार्कमधील जागा आता ताब्यात मिळाली. या ठिकाणी ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे सुसज्ज व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त मुख्यालय उभारण्यात येणार …

Read More »

‘नमन’ लोककलेला राजाश्रयाची गरज

कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यात सिंधदुर्गातील दशावतार असेल किंवा रत्नागिरी-रायगडमधील नमन, जाखडी. आजही कोकणातील मंडळींनी या लोककला जपल्या आहेत, पण नमन लोककलेची साधी नोंदही शासकीय दरबारी नाही. नमन कलाकारांची ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा’ अशी वाईट स्थिती आहे. त्यामुळे या लोककलेला राजाश्रयाची खर्‍या अर्थाने गरज आहे. मुंबईतील …

Read More »

मराठीची हेळसांड थांबेल

ज्यांची मातृभाषा मराठी खेरीज अन्य एखादी भाषा आहे, अशा विद्यार्थ्यांना मराठी या विषयात कमी गुण मिळतात, त्याचा परिणाम त्यांच्या एकूण गुणांवर होतो व आजच्या टोकाच्या स्पर्धेच्या दिवसांमध्ये मराठी भाषेमुळे आपला पाल्य मागे पडतो आहे हे बिगरमराठी समाजातील पालकांच्या पचनी पडत नाही. त्यावर तोडगा म्हणून लहानपणापासून आपल्या पाल्याला तो राहात असलेल्या …

Read More »

नेरळमध्ये जम्बो पक्षप्रवेश

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 439 कार्यकर्ते भाजपत कर्जत ः बातमीदार केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत भाजपच्या विचारांचे सरकार आले पाहिजे, हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असून आता नेरळ गावात पुन्हा सुवर्णकाळ येईल, असा आशावाद रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला, तर नेरळ गावासाठी नळपाणी योजना तत्काळ मंजूर केली जाईल आणि कचर्‍याचा प्रश्नदेखील घनकचरा प्रकल्प …

Read More »

जय हो!

’चांद्रयान-2’ झेपावलं ; भारताची ऐतिहासिक कामगिरी श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था जगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेले आणि अवघ्या जगाचे लक्ष लागलेले ’चांद्रयान-2’ सोमवारी (दि. 22) अखेर अंतराळात झेपावले. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ’चांद्रयान-2’चे प्रक्षेपण करण्यात आले. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ञांसह देशवासीयांनी एकच जल्लोष …

Read More »

श्रीमंती नाही, तर समाजसेवा महत्त्वाची : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यामुळे श्रीमंती महत्त्वाची नाही, तर समाजसेवा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथे केले. सिडको अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले असून या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भातील आढावा …

Read More »

पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग

कोकणात साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात जातात मंडळी, पण पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग असतो. मी तर मनाने कायमच कोकणात असते पावसाळ्यात आणि हे सर्व अनुभवत असते. ह्या अनुभूतीत तुम्हालाही सामील करून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच. पावसाळ्याचं आणि कोकणाचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. कोकण तसं तर वर्षभर सुंदरच दिसतं पण …

Read More »

अभिमानास्पद झेप!

या अवघ्या विश्वाच्या पसार्‍यात खोलवर दडलेल्या गुपितांचा शोध अन्य प्रगत देशांच्या अंतराळ संस्थांप्रमाणेच आपली इस्रोही घेत आहे. अंतराळ मोहिमांतून भारतच नव्हे तर अवघ्या मानवतेच्या भवितव्याच्या दृष्टीने अस्सल, व्यवहार्य उपाययोजनांचा शोध घेण्याचे ध्येय इस्रोने बाळगले आहे. चंद्राच्या अस्तित्वाचा संपूर्णपणे धांडोळा घेणे हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. अवघ्या देशभरातीलच नव्हे तर …

Read More »

अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने वृक्षारोपण

नागोठणे : प्रतिनिधी – सहकार खात्याच्या रोहे येथील दुय्यम निबंधकांच्या  आदेशानुसार नागोठणे येथील अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने केएमजी विभागात वृक्षारोपण  मोहीम राबवण्यात आली. जि. प. सदस्य नरेंद्र जैन, संस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर, भाई टके, ग्रा. पं. सदस्य अतुल काळे, अखलाक पानसरे, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टके, किशोर …

Read More »

अलिबाग तालुक्यातील सराई येथील डोंगरावर वृक्ष लागवड

रेवदंडा : प्रतिनिधी – मुंबई-सायन येथील गुरूनानक महाविद्यालयाचे एनएनएस युनिट आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील सराई येथील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.  गुरूनानक कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी श्रमदानातून 5550 वृक्ष लागवडीचा तसेच वृक्ष संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. अलिबागचे वनअधिकारी विकास तरसे, सामाजिक कार्यकर्त्या लतिका दातार, गुरूनानक महाविद्यालयाचे राष्ट्रीय …

Read More »