Breaking News

Monthly Archives: July 2019

कृत्रिम पावसाच्या हालचालींना वेग

औरंगाबाद : प्रतिनिधी  शासनाने राज्यात क्लाऊड सिडिंगद्वारा पर्जन्यवृद्धीसाठी प्रयोग करण्याचे निश्चित केले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ‘सी बॅण्ड डॉप्लर रडार’ विभागीय आयुक्तालयाच्या पाचव्या मजल्यावर बसविण्यात येणार आहे. रडार बसविण्यासाठी लागणारा लोखंडी अँगलचा सांगाडा सोमवारी आयुक्तालयात दाखल झाला. क्रेनच्या साह्याने दीड टन वजनाचे …

Read More »

भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन साजरा

उरण ः वार्ताहर भारतीय मजदूर संघाचा 64वा वर्धापन दिन मंगळवारी (दि. 23) जेएनपीटी टाऊनशिप येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, कामगार नेते सुधीर घरत, जेएनपीटी विश्वस्त रवींद्र पाटील, जनार्दन बंडा, डी. एच. पाटील, बी. के. ठाकूर, मंगेश ठाकूर, जे. के. भोईर प्रमुख अतिथी …

Read More »

सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये पर्यावरण सप्ताह उत्साहात

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील जोसेफ हायस्कूलमध्ये पर्यावरण सप्ताह साजरा केला गेला. पर्यावरणीय समस्या, तसेच उज्ज्वल शालेय भविष्यासाठी आपल्या पर्यावरणाचे संरक्षण व जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळेत मजा इंटरएक्टिव्ह शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांचे शाळेच्या परिसरात आणि शेजारच्या भागामध्ये वृक्षारोपणाचे अभियान आयोजित केले गेले होते. या उत्सवाचाच एक भाग म्हणजे …

Read More »

जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये गुरुपौर्णिमा ; वामनराव पै यांचे हजारो अनुयायी उपस्थित

कर्जत : बातमीदार तालुक्यातील भिवपुरी टाटा कॅम्प परिसरात चार वर्षांपूर्वी सद्गुरू वामनराव पै यांनी आपल्या जीवनविद्या मिशनचे ज्ञानपीठ उभे केले. या ठिकाणी सलग आठवडाभर गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. जीवनविद्या मिशनमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या या कृतज्ञता महोत्सवास सद्गुरूंचे हजारो अनुयायी भेट देत आहेत. कर्जतच्या वैजनाथ येथे असलेल्या जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये सद्गुरू वामनराव …

Read More »

महाराष्ट्र होणार चूल-धूरमुक्त राज्य शासनाकडून मिळणार गॅसजोडण्या

मुंबई ः प्रतिनिधी चूलमुक्त-धूरमुक्त महाराष्ट्र या घोषणेंतर्गत राज्यातील बिगरगॅस जोडणीधारकांना राज्य शासनाकडून गॅसजोडण्या वितरित करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 23) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-2 अंतर्गत लाभ न मिळू शकलेल्या नागरिकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात …

Read More »

नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शालोपयोगी साहित्याचे वाटप

नागोठणे : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थीच शिकत असल्याने आमची संघटना त्यांना दरवर्षी शालोपयोगी साहित्याचे वाटप करीत असते. या विद्यार्थ्यांच्या अनेक गरजा असून, त्या भागविण्यासाठी येथील बँका तसेच सेवाभावी संघटना, पतसंस्था, नोंदणीकृत मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवसिंग परदेशी यांनी केले. नागोठणे ज्येष्ठ नागरिक …

Read More »

माथेरानमध्ये श्रमदानातून रस्त्याला बांध; पर्यावरण संवेदनशील नागरिक संघाचा पुढाकार

कर्जत : बातमीदार माथेरानला मुसळधार पडणार्‍या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पडलेल्या चरांमुळे पर्यटकांसह नागरिकांना चालणे कठीण झाले होते. याबाबत वारंवार तक्रारी करूनसुद्धा नगरपालिका उदासीन असल्यामुळे येथील पर्यावरण संवेदनशील नागरिक संघाने श्रमदान करून रस्त्याच्या कडेला बांध घातला. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा रस्त्यातून न होता तो गटारामधून होणार आहे. माथेरानमध्ये आल्यानंतर पर्यटक एको …

Read More »

म्हसळा तहसील कार्यालय धोकादायक; स्ट्रक्चरल ऑडिट विषय वार्‍यावर

म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील प्रशासकीय व बहुतांश शासकीय कार्यालये असणारी म्हसळा तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. तब्बल 80 वर्षांच्या या इमारतीकडे जिल्हा प्रशासन व बांधकाम विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. इमारतीचे बांधकाम नबाबकालीन म्हणजे 1935 ते 1938 या कालावधीतील आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे अद्याप स्ट्रक्चरल ऑडिट का …

Read More »

कर्जतमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळला; पालिकेतर्फे फवारणीला सुरुवात

कर्जत : बातमीदार पावसाने दडी मारल्याने साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत शहरातील गुरूनगर भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने नगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून शहरात विशेष फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने त्या डेंग्यूसदृश रुग्णाची माहिती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिली. त्यानंतर …

Read More »

जेएनपीटी फुटबॉल क्लब ठरला भावी आमदार चषकाचा मानकरी

उरण : वार्ताहर येथील मुनस्टार फुटबॉल क्लब आयोजित भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जेएनपीटी फुटबॉल क्लबने पटकाविले आहे. आरडीएफसी जसखार संघ उपविजेता ठरला. उरणच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात ही स्पर्धा रंगली. बेस्ट प्लेअर स्वप्नील म्हात्रे, बेस्ट स्ट्रायकर बापू, बेस्ट डिफेंडर आनंद आणि बेस्ट गोलकीपर म्हणून मुन्ना यांची निवड करण्यात आली. …

Read More »