Breaking News

Monthly Archives: July 2019

द्युती चंदचे ऐतिहासिक ‘सुवर्ण’

इटलीतील युनिव्हर्सिटी स्पर्धेत बाजी रोम : वृत्तसंस्था भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. इटलीतील नेपल्स शहरात सुरू असलेल्या 30व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. द्युती 100 मीटर अंतर 11.32 सेकंदात पार करीत अव्वल ठरली. यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले …

Read More »

चटकदार मक्यांना उरणमध्ये मागणी

उरण : वार्ताहर पावसाळा सुरू झाल्याने ठिकठिकाणी धबधबे, डॅम ओसंडून वाहू लागले आहेत. पर्यटकांची वाढणारी गर्दी व पावसाळ्याच्या दिवसात मक्यांना असणारी मागणी लक्षात घेता ठिकठिकाणी भाजलेल्या, उकडलेल्या मक्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात पांढर्‍या मक्यांचा हंगाम सुरू असतो. त्यामुळे पावसाळ्यात या मक्यांचा आस्वाद लहान मुले व वयोवृद्धांपर्यंत …

Read More »

दुसर्या सेमीफायनलमध्ये आज ऑस्ट्रेलिया-इंग्लंड भिडणार

बर्मिंगहम : वृत्तसंस्था विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. 11) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीची दुसरी लढत होणार आहे. हा सामना एजबस्टनच्या मैदानावर खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा विश्वचषकावर नाव कोरले; तर दोन वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. आता आठव्यांदा ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत पोहोचला …

Read More »

रिपाइं डेमोक्रेटीकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निलीमा पवार

पनवेल शहराध्यक्षपदी सुरेखा कोळी पनवेल : वार्ताहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात युवा राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निलीमा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पनवेल शहराध्यक्षपदी सुरेखा कोळी यांची नियुक्ती …

Read More »

आवरे व कडापे येथे वह्यावाटप

कळंबोली : प्रतिनिधी उरण पूर्व भागातील आवरे येथील स्व. छबीबाई गणपत गावंड सामाजिक संस्थेतर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. या वेळी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार, फाईलचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही करण्यात आला.  या वेळी रा.जि.प शाळा कडापे या ठिकाणी आवरे गावातील नवनिर्वाचित सदस्य संतोष पाटील, माजी …

Read More »

वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पनवेल : प्रतिनिधी महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशिला घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता नवीन पनवेलमध्ये ‘गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार सोहळा …

Read More »

पाच जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार तालुक्यातील एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय पीडित महिला नवबौद्ध असून पनवेल तालुक्यातील एका गावात राहत आहे. 2006 मध्ये तिचे लग्न  झाले आहे. अंतरजातीय विवाह केल्यामुळे पीडित महिलेला तिची सासू, दीर, …

Read More »

खारघरमधील समस्यांबाबत सिडको अधिकार्यांबरोबर बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमध्ये नाला फुटण्याच्या घडलेल्या घटनेबाबत मंगळवारी (दि. 9) दुपारी सिडको भवन येथील तिसर्‍या माळ्यावरील मुख्य अभियंत्याच्या कार्यालयात सिडकोचे मुख्य अभियंता श्री. वरखेडकर व अधीक्षक अभियंता श्री. गिरी, तसेच कार्यकारी अभियंता श्री. अनुसे, श्री. बनकर यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे, …

Read More »

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कार्यान्वित करुन देशातील शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असून शासनाने शेतकरी हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सर्वांर्थाने शेतकर्‍यांच्या आर्थिक परिवर्तनास …

Read More »

कायदा व जनजागृतीची गरज

आंतरजातीय प्रेमसंबंधांना आपल्याकडे असलेला विरोध ‘सैराट’ या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटातून उत्तम रीतीने मांडला गेला होता. एकीकडे तरुणाईने या चित्रपटाला डोक्यावर घेतले तर हा चित्रपट आपल्या लेकीबाळींच्या डोक्यात भलते खूळ घालतो आहे, अशी टीकाही विशिष्ट वर्गाकडून झाली होती. हाच चित्रपट पुढे हिंदी व दाक्षिणात्य भाषांमध्येही निघाला व तितकाच लोकप्रिय झाला, …

Read More »