पनवेलमध्ये उपनगरीय रेल्वे 1996 मध्ये सुरू झाली. पनवेल शहराचा विकास होत असताना रेल्वेमुळे झपाट्याने आजुबाजूच्या परिसराचे नागरीकरण होत आहे. आज या स्थानकातून वर्षभरात जवळपास 50 कोटी प्रवासी प्रवास करीत असल्याने लवकरच या स्थानकाचा समावेश ‘अ 1’ श्रेणीत होणार आहे. पनवेल स्टेशनमध्ये प्रवाशांना पुरेशा मूलभूत सुविधांपासून तर वंचित ठेवण्यात आले आहेच …
Read More »Monthly Archives: July 2019
यंत्रणेत सुधाराची गरज
एकीकडे रेल्वे, बस आदी सार्वजनिक सेवा कोलमडलेल्या असतानाच रिक्षा, टॅक्सीवाले ग्राहकांना नाडतात. कुठे जायचे, कुठे जायचे नाही, यावरून प्रवाशांशी अरेरावीची भाषा करतात. रेल्वे, रस्त्यांची अवस्था यात गेल्या अनेक वर्षांत फारशी सुधारणा नाही. अर्थात हळूहळू परिस्थिती पालटते आहे. येत्या काही वर्षांत मेट्रोचे जाळे शहरभरात पसरेल. उपनगरे व आसपासचा परिसरही अधिक चांगल्या …
Read More »‘मिशन ऑलिम्पिक गोल्ड 2024’चा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि दिपांकर्स बॅडमिंटन अॅकॅडमी यांच्या वतीने आयोजित मिशन ऑलिम्पिक गोल्ड 2024 या अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि. 30) करण्यात आला. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात होणार 15 हजार रोपांची लागवड
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या वन विभागातर्फे 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने मनपा क्षेत्रात 15 हजार रोपांची लागवड करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ सोमवारी (दि. 1) पिसार्वे येथे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख …
Read More »कोसळधार कायम
रायगडातील जनजीवन विस्कळीत; अतिवृष्टीचा इशारा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सलग चार दिवस कोसळणार्या पावसाचा जोर सोमवारी (दि. 30) पाचव्या दिवशीही कायम होता. संततधारेमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. दरम्यान, कोकणात येत्या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा फटका अलिबाग तालुक्याला बसला. तालुक्यातील श्रीगावमध्ये …
Read More »थोर महापुरुषांच्या वास्तू उपेक्षित का?
रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर, तसेच स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या नाते गावातील त्यांच्या जन्मस्थळाची अतिशय दुरवस्था झाली आहे. सी. डी. देशमुख यांचा जन्म ज्या घरामध्ये झाला त्या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येते, अशीच मागणी नरवीर मुरारबाजी देशपांडे या स्वराज्याच्या सरदाराच्या …
Read More »मोहीम जलसंवर्धनाची
देशाच्या कुठल्याही भागात शहरीकरण करताना आता हरित समतोल केंद्रस्थानी ठेवण्याचे भान बाळगायला हवे आहे. विहिरी, कुंडे आणि तळी जपण्याच्या पारंपरिक पद्धतींकडे पुन्हा एकदा वळावे लागणार आहे. जलसंवर्धनाला जनआंदोलनाचे रूप द्यावे लागेल, असे आवाहन खुद्द मोदीजींनीच केले. याहून अधिक चांगली सुरुवात त्यास लाभली नसती. बदलत्या हवामानाने आपले रंग दाखवायला केव्हाचीच सुरुवात …
Read More »पनवेल ः शहरामध्ये ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट अॅण्ड जनरल कामगार युनियनचे मुख्य कार्यालय सुरू झाले आहे. नव्याने सुरू झालेल्या या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण, माजी नगरसेविका नीता …
Read More »पनवेल : रायगड जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे सोमवारी भोकरपाडा येथील गणेश आगीवले व सहकार्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »पनवेल ः राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मोहिमेंतर्गत दुंद्रे येथे वन विभागाच्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, सरपंच चौधरी, उपसरपंच रमेश पाटील, वन विभागाचे सोनवणे, देवकाते, खाने आदी उपस्थित होते. यावेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper