Breaking News

Monthly Archives: October 2019

इमारतीच्या पार्किंगमधील वाहनांना लावली आग

पुणे : प्रतिनिधी पुणे शहरात मागील काही महिन्यापासून चार चाकी आणि दुचाकी वाहनाच्या गाडीच्या काचा फोडणे, वाहने जाळून टाकण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आज पुन्हा पर्वती पायथा येथील एका इमारतीच्या पार्किंगमधील 11 वाहनांना एकाने आग लावल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा, सानेगुरुजी …

Read More »

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे सोमवारी पनवेलकरांनी मुग्धाताई लोंढे यांच्या अचानक झालेल्या एक्झिटने पुन्हा एकदा अनुभवले असे म्हणायला हरकत नाही. सोमवारची सकाळ पनवेलकर सगळे आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करायचा म्हणून उत्साहात होते. भगवे फेटे बांधून आलेल्या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. …

Read More »

धम्मचक्रप्रवर्तन दिनासाठी आंतरराष्ट्रीय विद्वान

नागपूर : प्रतिनिधी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागवंशीयांच्या भूमीत लाखो वंचितांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. त्या धम्मक्रांतीचा 63वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी (दि. 8) सायंकाळी 6 वाजता दीक्षाभूमीवर साजरा होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई …

Read More »

भारताची ‘विजया’दशमी, पहिल्या कसोटीत आफ्रिकेवर दणदणीत विजय

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत मात करीत मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी नऊ बळींची आवश्यकता होती. लय सापडलेल्या संघाने दोन सत्रांमध्येच विजय साकारला. दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी (5/35) आणि रवींद्र जडेजा (4/87) यांच्या …

Read More »

प्रेमीयुगुलाची आत्महत्या

नवी मुंबई : प्रतिनिधी घणसोलीतील सिम्फ्लेक्स वसाहतीत राहाणार्‍या एका तरुणाने राहत्या घरात आपल्या प्रेयसीसोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दत्तात्रय वरे (24) आणि साक्षी गोळे (19, रा. कोपरखैरणे) अशी या दोघांची नावे असून, त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  दत्तात्रय वरे हा माथाडी कामगार म्हणून काम …

Read More »

सांगली आणि नाशिकला परतीच्या पावसाने झोडपले

नाशिक, सांगली : प्रतिनिधी नाशिक, सांगलीसह राज्यातील इतर भागाला परतीच्या पावसाने झोडपले आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला, तर नाशिकमध्ये रविवारी (दि. 6) ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्ये कालिका देवीच्या यात्रेनिमित्त जमलेले भाविक आणि तेथील विक्रेत्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. रविवार असल्याने हजारो भाविक …

Read More »

प्लास्टिकमुक्त वसुंधरा अभियानाला झोकात सुरुवात

भारत विकास परिषदेचा एक अभिनव उपक्रम आमदार प्रशांत ठाकूर, महापौरांकडून कौतुक खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेने पर्यावरण संरक्षणाबद्दल जनजागरण करण्यासाठी एक अभियान हाती घेतले आहे. 2 ऑक्टोबर रोजी या प्लास्टिकमुक्त वसुंधरा मोहिमेचा आरंभ झाला. पनवेल, …

Read More »

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनमध्ये पोलीस संचलन

श्रीवर्धन : प्रतिनिधी विधानसभा निवडणूक नि:पक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने यंत्रणेला आचारसंहितेचे अतिशय काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी (दि. 5) संध्याकाळी श्रीवर्धन पोलीस ठाण्यातर्फे शहरात संचलन करण्यात आले.  विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीवर्धन शहरातील एसटी स्टॅण्ड, …

Read More »

रविशेठ पाटील यांचा आज नागोठणे विभागात प्रचाराचा शुभारंभ

पेण : प्रतिनिधी  नागोठणे येथील जोगेश्वरी मातेचे सोमवारी (दि. 7) सकाळी 10 वाजता दर्शन घेतल्यानंतर शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप- शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या नागोठणे विभागातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. माजी आमदार अनिलभाऊ तटकरे, जिल्हा परिषद सदस्य किशोरशेठ जैन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, रोहा तालुका अध्यक्ष समीर शेडगे, सोपान जांबेकर, …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची स्थापना अलिबाग : जिमाका विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची (मीडिया सर्टीफिकेशन अ‍ॅण्ड मॉनिटरिंग कमिटी चउचउ) स्थापना करण्यात आली आहे, तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणिकरण व …

Read More »