नवी मुंबई : प्रतिनिधी पालिकेच्या सफाई कर्मचार्यांना ‘स्मार्ट वॉच’ प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे वेळेवर पगार मिळालेला नाही, तर काहींचे वेतन कापण्यात आलेले आहे. या विरोधात गुरुवारी मुख्यालयासमोर कर्मचार्यांनी ठिय्या दिला आणि पालिका अधिकार्यांना मुख्यालयाच्या आवारातून बाहेर वा बाहेरून आत येण्यास मज्जाव केला. नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयासमोर प्रवेशद्वार बंद आंदोलनामुळे अनेक अधिकारी …
Read More »Monthly Archives: November 2019
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहा -वपोनी काईंगडे
मोहोपाडा : वार्ताहर शिक्षण व खेळासाठी वेळ व महत्त्व द्या, असे आवाहन खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी केले. वावंढळवाडी येथील हनुमान मंदिरात काकडा आरती समाप्तीच्या दीपोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, घरच्या मोठ्या माणसांनी सतत टीव्ही सुरू ठेवणे व मुलांच्या हातात मोबाईल …
Read More »जेएनपीटी येथे दक्षता जागृती आठवडा
उरण : वार्ताहर जेएनपीटीमध्ये 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जागृती आठवडा साजरा करण्यात आला. या वेळी निबंध लेखन, पोस्टर, घोषणा, व्यंगचित्र अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 17 ऑक्टोबर रोजी पोर्ट ग्राहकांसाठी एक चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चा सत्रासाठी शिपिंग एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी दोन कार्यशाळा …
Read More »मोहोपाडा शिशु बालमंदिरात बालदिन साजरा
मोहोपाडा : वार्ताहर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोहोपाडा येथील महिला उद्योग मंडळ संचलित शिशुविकास बालमंदिर येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी बालदिनानिमित्त शाळेमध्ये जाऊन मुलांशी खुल्या मनाने संवाद साधला. त्यांना वाहतूक नियमांचे पालन करणे, स्वतःची …
Read More »सात घरफोड्या करणारा चोरटा जेरबंद
30 तोळे सोन्यासह चोरीची साधनेही जप्त कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2017पासून घरफोड्या करणार्या एकास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गेल्या दोन वर्षांतील घरफोड्यांचे एकूण सात गुन्हे उघड झाले आहेत. या घरफोड्या करून चोरलेले तब्बल 30 तोळे सोनेदेखील नेरळ पोलिसांनी जप्त केले आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत …
Read More »मासेमारी करणार्या दोन गटांत भरसमुद्रात हाणामारी
अलिबाग : प्रतिनिधी एलईडीद्वारे मासेमारी करणारे आणि बुल नेट मासेमारी करणार्या आक्षी आणि बोडणीमधील मच्छीमारांच्या दोन गटांमध्ये समुद्रात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांतील आठ जण जखमी झाले. जखमींवर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरूड तालुक्यातील कोर्लई समुद्रात ही घटना घडली. एलईडीमार्फत मासेमारी करणे हे कायद्याने …
Read More »निडी येथे रेल्वे फाटक सुरक्षा जनजागृती अभियान
रोहे ः प्रतिनिधी येथील रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने निडी रेल्वे फाटक येथे निरीक्षक सतीश विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे फाटक सुरक्षा जनजागृती अभियान रबविण्यात आले. रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर ते लगेचच उघडावे, असे प्रवासी गेटमेनला सांगतात. फाटक उघडले नाही तर गेटमेन व प्रवाशांत बाचाबाची होते. वास्तविक रेल्वेकडून सूचना आल्यानंतरच फाटक बंद …
Read More »घारापुरीवरील पुरातत्त्व विभागाच्या तिकीट कार्यालयाचे उद्घाटन
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील जगविख्यात असलेल्या घारापुरी बेटावरील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या तिकीट कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले. घारापुरी येथे भारतीय पुरातत्त्व विभाग आकारत असलेल्या पर्यटक कराच्या कार्यालयाचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले आहे. नव्याने नुतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या वेळी भारतीय पुरातत्त्व विभाग व महाराष्ट्र …
Read More »दाखणे पूल बनलाय धोकादायक
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील अनेक गावांना जोडणार्या दाखणे गावाजवळील पुलाची पडझड सुरू असून, तो कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. या पुलावरून विद्यार्थी व ग्रामस्थांची ये-जा असते, मात्र हा पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा पूल तत्काळ नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. …
Read More »तिहेरी हत्याकांडातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दहिवली गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपी संतोष शिंदे याच्या पोलीस कोठडीत माणगाव न्यायालयाने एका दिवसाची वाढ केली आहे. कौटुंबिक भांडणातून संतोष शिंदे याने 7 नोव्हेंबर रोजी सकाळी आपल्या पवन (वय 5) व संचित (वय 2) या दोन लहान मुलांसह पत्नी सुहानी (वय 30) हिची गळा दाबून …
Read More »