पनवेल : बातमीदार शैक्षणिक वर्ष 2019-2020मध्ये झालेल्या तलवारबाजी, खो-खो, कबड्डी, बॉक्सिंग, डॉजबॉल, तायक्वांडो, बॅडमिंटन अशा विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये इंदूबाई आ. वाजेकर शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. निमिशा धीरज थवई या विद्यार्थिनीने तलवारबाजी या खेळात सांघिक सुवर्णपदक व वैयक्तिक कांस्यपदक पटकावून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी ती पात्र झाली आहे. …
Read More »Monthly Archives: November 2019
सात्त्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये पराभव
फुजहोऊ (चीन) : वृत्तसंस्था भारताच्या सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतील उपांत्य सामन्यात इंडोनेशियाची अग्रमानांकित जोडी मार्कस गिदोन आणि केव्हिन सुकामुल्जो यांनी पराभव केला. सात्त्विक-चिराग या बिगरमानांकित जोडीचा संघर्ष अपुरा पडल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. फुजहोऊ येथील ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरवर रंगलेल्या उपांत्य …
Read More »शेफाली वर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम
ग्रोस आयलेट : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारी 15 वर्षीय शेफाली वर्मा ही भारताची सर्वांत युवा खेळाडू ठरली आहे. या तडाखेबंद खेळीसह तिने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा 30 वर्षे जुना विक्रमही मोडला. शेफालीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात 49 चेंडूंमध्ये 73 धावांची तुफानी खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विंडीजवर …
Read More »‘सूर्य’कुमार तळपला; मुंबईची हरियाणावर मात
मुंबई : प्रतिनिधी कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या (38 चेंडूंत नाबाद 81 धावा) बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत हरियाणाचा आठ गडी आणि 26 चेंडू राखून धुव्वा उडवला. वानखेडे स्टेडियमवर हरियाणाचे सलामीवीर हर्षल पटेल (33) आणि शिवम चौहान (28) यांनी 66 धावांची भागीदारी रचून दमदार सुरुवात केली. …
Read More »तेजस्विनीची ऑलिम्पिकवारी पक्की
दोहा (कतार) : वृत्तसंस्था महाराष्ट्राची अव्वल नेमबाज तेजस्विनी सावंत हिने ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले आहे. 14व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीला महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पदकापर्यंत झेप घेता आली नसली तरी तिने पुढील वर्षी रंगणार्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आणखी एक स्थान निश्चित केले. अंतिम फेरीत मजल मारणार्या …
Read More »‘त्या’ प्रेमीयुगुलावर खुनाचा गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर आपल्या पतीचा खून करून प्रेमीसह दोन वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन पनवेल येथे लपून राहण्यासाठी आलेल्या केरळ राज्यातील प्रेमीयुगुलाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोघांपैकी महिलेची प्रकृती थोड्याफार प्रमाणात सुधारत आहे, तर तिचा प्रेमी अद्यापही धोक्याच्या क्षेत्रात असल्याची माहिती समजते. …
Read More »अवकाळी पावसाने मच्छर वाढू नये म्हणून मनपा कर्मचारी कार्यरत
नवी मुंबई : प्रतिनिधी नोव्हेंबर महिना सुरू झाला, तरी अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी सचण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे नैसर्गिकरीत्या मच्छरांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आरोग्य विभागाच्या नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी डास उत्पत्ती ठिकाणे शोधून मच्छरांची पैदास होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहेत, …
Read More »रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वेग; उपमहापौर विक्रांत पाटील यांचे प्रयत्न
पनवेल : वार्ताहर विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पनवेल महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांची डागडुजी, तसेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने व प्रत्यक्ष उभे राहून प्रभागातील महाराणा प्रताप रोड (परदेशी आळी) येथील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेगाने सुरुवात केली. येथील रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर दुसरा लेअर (डीबीएम) मारण्याचे …
Read More »बेलेझा मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केलेल्या ‘बेलेझा मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019’ स्पर्धेत मिस गटामध्ये प्रथम क्रमांक वृषाली थोरात, द्वितीय क्रमांक मधू जाजू आणि तृतीय क्रमांक निक्की रंग्रस यांनी; तर मिसेस गटामध्ये प्रथम क्रमांक भाविका वचनी, द्वितीय क्रमांक संपूर्णा सरकार आणि तृतीय …
Read More »पर्यटकांची पावले आगरकोट किल्ल्याकडे
रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा आगरकोट किल्ला, ऐतिहासिक काळातील पोर्तुगीजांचा अभेद्य बालेकिल्ला, आगरकोट सभोवातलची समुद्री तटबंदी आणि डोमिनिकन चर्च, फ्रान्सिस्कन चर्च, चौकोनी बुरूज आणि सातखणी बुरूज पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. आगरकोट किल्ल्याच्या वावव्येकडील बुरूजाजवळील लहान दरवाजाच्या आग्नेय 45.72 मीटरवर तटबंदीच्या पश्चिमेकडील भिंतींत पडलेल्या भगदाडासमोर 1534च्या सुमारास बांधलेल्या फ्रान्सिस्कन इमातीच्या मध्यभागी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper