उरण : वार्ताहर पाऊस लांबल्यामुळे इतर पिकांसोबत भाजी पिकांचे मळेही उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरता कोसळला आहे, तर उरणमधील शहरी व ग्रामीण भागातील भाजीचे भाव चांगलेच कडाडले असून येत्या काही दिवसांत भाजीचीच कमतरता भासणार असून, भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आवकाळी परतीच्या …
Read More »Monthly Archives: November 2019
सुधागडात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात
सुधागड ः प्रतिनिधी मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र समजला जाणारा ईद-ए-मिलादुन्नबी संपूर्ण देशासह सुधागड-पालीत रविवारी (दि. 10) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पालीत हिंदू-मुस्लिम बांधवांत सद्भावना आणि मैत्रीपूर्ण संबंध असून एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन गुण्यागोविंदाने सण साजरा करण्याची परंपरा कायम राखत ईद-ए-मिलादुन्नबी साजरा करण्यात आला. ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त पाली-सुधागड येथील खालचा …
Read More »भाताची शेती पाण्यात
भाताचे कोठार असलेल्या जिल्ह्यात भाताची शेती हे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे ठरलेले काम, मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आणि शेती नामशेष होऊ लागली. आज रायगड जिल्हा भाताचे कोठार राहिला नाही, त्यास जिल्ह्यात झालेले औद्योगिकीकरण आणि मजुरांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. त्यातही आधुनिक प्रकारची शेती करताना आपली ओळख अजूनही …
Read More »बोहरी समाजाकडून ईदनिमित्त जुलूस
कर्जत ः बातमीदार मोहंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त आणि ईद-ए-मिलादनिमित्त नेरळ गावात बोहरी समाजाच्या वतीने जुलूस मिरवणूक काढण्यात आली. रामजन्मभूमी बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली जुलूस मिरवणूक अत्यंत शांतपणे काढण्यात आली. नेरळमधील बोहरी समाजाने शनिवारी (दि. 9)ईद-ए-मिलाद साजरी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या रामजन्मभूमी बाबरी मशीदप्रकरणी होणार्या निर्णयामुळे रद्द करण्यात …
Read More »आदर्श विवेकी निकाल
अयोध्येच्या निकालानंतर अवघ्या देशानेच ज्या तर्हेच्या संयतपणाचे आणि सौहार्दाचे दर्शन घडवले आहे ते जगभरासाठी आदर्श ठरावे असेच आहे. हे सौहार्द येणार्या काळातही असेच टिकावे. या निकालावरील प्रतिक्रियांमध्ये दिसून आलेली प्रगल्भता व सुसंस्कृतपणा हेच अस्सल भारतीयत्व आहे. संपूर्ण देशासाठी मोठा धार्मिक, राजकीय आणि भावनिक मुद्दा बनलेला, गेले जवळपास शतकभर चाललेला अयोध्येतील …
Read More »अयोध्या निकालानंतर कर्जतमध्ये आनंदोत्सव
कपालेश्वर मंदिरात गीतरामायण कर्जत ः बातमीदार शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील विवादित जागा राममंदिरासाठी देण्याचा निकाल दिला आहे. कोर्टाच्या या अयोध्या निकालानंतर श्रीरामचंद्रांना वंदन म्हणून कर्जतमधील कपालेश्वर मंदिरात आरती आणि गीतरामायणाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद तसेच भाजपचे कार्यकर्ते यांनी कपालेश्वर मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास गर्दी केली …
Read More »निवडणुकीनंतरही भाजपमध्ये इनकमिंग; वाकडीतील शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीनंतरही भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यार्यांचा ओघ कायम असून, पनवेल तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्यांनी शनिवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल …
Read More »वारकर्यांच्या मिनीबसला आंबेनळी घाटात अपघात; 19 जण जखमी
पोलादपूर : प्रतिनिधी आंबेनळी घाटात शनिवारी (दि. 9) सकाळी एका वळण उतारावर वारकर्यांची मिनीबस आंब्याच्या झाडावर धडकली. या अपघातात पंढरपूर येथून परणारे 19 प्रवासी जखमी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या दिवाण खवटी येथील वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे गेले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते परतत असताना त्यांची मिनीबस …
Read More »बहुप्रतिक्षित अयोध्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल
संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला, तर सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येमधील बहुचर्चित जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (दि. 9) ऐतिहासिक निकाल दिला. त्यानुसार अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे, तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्यात येणार आहे. याबाबत …
Read More »गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थी दिन
गव्हाण : प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन राज्यात विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्येही गुरुवारी (दि. 7) विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper