Breaking News

Monthly Archives: December 2019

सावळे येथे विविध योजनांचा शुभारंभ व विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल ः रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायत ग्रामनिधी अंतर्गत विविध योजनांचा शुभारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी (दि. 13) झाला. या कार्यक्रमास उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सावळे ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी अंतर्गत स्वर्गीय शंकर कानू केदारी …

Read More »

बारवई यात्रा उत्साहात

मोहोपाडा ः प्रतिनिधी कार्तिकी एकादशीनंतर येणार्‍या मोक्षदा एकादशीला पूर्वीपासून होणारी बारवई पोयंजे येथील डोंगरमाथ्यावर असणार्‍या विठ्ठल रखुमाई मंदिरात जिल्ह्यातील 84 गावांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी यात्रेतील पाळणे, थाटलेली दुकाने आदींसह आनंद लुटण्यासाठी लहानग्यांसह तरुणाईची मोठी गर्दी दिसून आली. बारवई गावची दीड दिवसाची यात्रा ही सर्वांना परिचित असून …

Read More »

कोस्टल रोड चौकात गतिरोधक बसवा

पोलीस निरीक्षक माणिक नलावडेंची मागणी उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील पूर्व विभागाला जोडणार्‍या खोपटापूल-भेंडखळ महामार्गावरील कोस्टल रोड चौकातील चारही बाजूंच्या ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसवावा, अशा मागणीचे पत्र उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. खोपटापूल-भेंडखळ महामार्गावरील कोस्टल रोड चौकात मागील …

Read More »

वक्तृत्व स्पर्धेत पूनम सिरसाट प्रथम

उरण ः वार्ताहर गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने नावडे येथे आयोजित केलेल्या रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत येथील छत्रपती विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी पूनम सिरसाट (इ. 10वी अ) हिने माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आम्ही कर्मवीरांचे वारसदार, या विषयावर पूनम शिरसाट हिने केलेल्या …

Read More »

द्रोणागिरी हायस्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण

आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती उरण ः वार्ताहर विद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मंगळवारी (दि. 10) झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार महेश बालदी यांची उपस्थिती लाभली. तसेच उरण नगरपरिषद नगरसेवक कौशिक शहा, आयओसीएलचे प्रबंधक आर्चित चक्रवर्ती, आयओसीएलचे सेल्स मॅनेजर जी. के. राव, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन …

Read More »

‘त्या’ तरुणाच्या आत्महत्येबाबत पालकांकडून संशय

पनवेल ः बातमीदार उलवे सेक्टर 20 भागातील फ्लॅटमध्ये 5 डिसेंबर रोजी नेरूळमध्ये राहणार्‍या अभिदीप दीपक काळे (28) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, मात्र अभिदीपने आत्महत्या केली नसून त्याच्यासोबत कामाला असलेल्या पूजा नामक तरुणीने त्याची अन्य सहकार्‍यांच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप अभिदीपच्या पालकांनी केला आहे. अभिदीपच्या …

Read More »

पनवेल ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळा

पनवेल ः जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने पनवेल ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, जितेंद्र वाघमारे, देवद ग्रामपंचायत सदस्य अश्विनी ठोकळ-वाघमारे …

Read More »

अवैध पिस्तूल बाळगणारा गजाआड

नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेची कारवाई पनवेल, कळंबोली ः वार्ताहर अवैध अग्निशस्त्र बाळगणार्‍या एका इसमास एक देशी बनावटी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, नवी मुंबईच्या पथकाने गजाआड केले आहे. नवी मुंबई येथील मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेत कार्यरत असणारे पोलीस नाईक नवनाथ कोळेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून …

Read More »

‘इप्सित’ राज्य नाट्य स्पर्धेच्या फायनलमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त 59व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळद्वारा इप्सित नाट्यसंघाच्या गोदो वन्स अगेन या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले असून, प्राथमिक पारितोषिक वाशीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानव विकास संस्थेच्या शीमा या नाटकास मिळाले आहे. या दोन्ही नाटकांची …

Read More »

तरुणीचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 13) घडली. त्यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने संरक्षक जाळीमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे. प्रियंका गुप्ता असे या तरुणीचे नाव असून, ती उल्हासनगर येथील असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून ही तरुणी …

Read More »