Breaking News

Yearly Archives: 2019

हत्येचा प्रयत्न करणार्या आरोपीला अटक

पनवेल : बातमीदार विहीघर येथे एकाच बांधकाम साईटवर काम करणार्‍या 27 वर्षीय इसमाच्या हत्येचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी मध्य प्रदेश येथून अटक केली आहे. सत्येंद्र रामधर चौधरी (25, अहिरगाव, मध्य प्रदेश) असे या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील विहीघर येथे मरी आई …

Read More »

वाहनविक्रीत मोठ्या प्रमाणात घट

डेप्युटी आरटीओ विभागाच्या उत्पन्नावर परिणाम पनवेल : बातमीदार आर्थिक मंदीचा फटका सर्वप्रथम वाहन उद्योगाला बसला आहे. परिणामी वाहन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने राज्याच्या परिवहन विभागाच्या उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे. नवी मुंबई डेप्युटी आरटीओ कार्यालयात नोंदणी होणार्‍या वाहनांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 30 टक्के कपात झाल्याने त्याचा नवी मुंबई आरटीओच्या महसूल …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे लॉन टेनिस स्पर्धेत सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त रवीन हॉटेल दी पॅलेस ऑफ दी वाइंडसद्वारा आयोजित एआयटीए सुपर सीरिज 2019ची फ्युचर स्टार्स जुनिअर टेनिस टूर्नामेंट नुकतीच चिपळूण येथे झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)ने सुयश प्राप्त केले आहे. ‘आरटीपीएस’ची विद्यार्थिनी आनंदी भुतडा (इयत्ता सहावी) हिने …

Read More »

नवीन पनवेलमध्ये रंगली बॅडमिंटन स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड शटलर्स बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीच्या वतीने इन हाऊस बॅडमिंटन टुर्नामेंट 2019चे आयोजन नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय येथे शुक्रवारी (दि. 15) करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी रायगड बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष …

Read More »

भारताचा बांगलादेशवर डावाने विजय

इंदूर : वृत्तसंस्था बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने एक डाव 130 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांवर संपुष्टात आणला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंदूर येथील होळकर मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला. फलंदाजी …

Read More »

खंडाळा घाटाची वाट बिकट

सांग कसो दिसतो खंडाळ्याचो घाट, असे वर्णन कवींनी खंडाळा बोरघाटाचे केले आहे. सुंदर, देखणा नेत्रांना सुखावणारा खंडाळा घाट सध्या अपघातांच्या मालिकांनी पुन्हा चर्चेत आला आहे. हे अपघात निव्वळ मानवी चुका व यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच घडल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. युती शासनाने 2001मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार केला. त्याअगोदर मुंबई-पुणे …

Read More »

अहिराणीचा सामाजिक अनुबंध

अगोदर माणूस, माणसानंतर समाज आणि मग भाषा. भाषा आणि बोली हा फरक आता यापुढे करायचा नाही. जी बोली आपण बोलतो ती भाषा. मग ही भाषा अख्ख्या जगाची असो नाहीतर एखाद्या गाव-पाड्यापुरती मर्यादित असो. बोली म्हणजे भाषाच असते. लोक एकमेकांसोबत देवाणघेवाण करताना जे काही बोलतात ती भाषा. कोणत्याच भाषेत कोणताच घटक …

Read More »

फत्तेशिकस्त

कथा किचकट असल्याने थोडी विस्ताराने सांगतो म्हणजे हे संपूर्ण परीक्षण वाचल्यावर तुम्हाला चित्रपट समजायला सोपा जाईल. राजगडावर जिजामाता तर पन्हाळगडावर शिवाजीराजे आहेत. राजगडावर ताबा मिळवण्याचा शाहिस्तेखानाचा प्रयत्न जिजाऊ राजगडावरून युद्ध करून अयशस्वी करतात. लाल किल्ला आणि पुणे सध्या शाहिस्तेखानच्या (अनुप सोनी, सावधान इंडियावाला) ताब्यात आहे. नामदार खान (समीर धर्माधिकारी) हा …

Read More »

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सिडको अनुकूल

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहतीतील अल्प उत्पादन गटातील घरांची अवस्था बिकट आहे. स्लॅब कोसळण्याचा घटना वाढतच  चालल्या आहेत. याकडे प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी लक्ष वेधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. त्याची दखल घेत सिडकोने पुनर्विकासासाठी अनुकूलता दर्शवली आहे.  कळंबोली, नवीन पनवेल आणि …

Read More »

‘रायगडभूषण’ निवडीसाठी तज्ज्ञ समिती नेमणार

अलिबाग : प्रतिनिधी खिरापतीसारख्या देण्यात येणार्‍या रायगडभूषण पुरस्काराची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणे, निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पाहिल्या मंगळवारी पेन्शनर आदालत भरविणे, असे दोन महत्त्वाचे निर्णय शुक्रवारी (दि. 15) झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सभेत एकमताने घेण्यात आले. नियोजन भवन येथे ही सभा झाली. रायगडभूषण पुरस्कार एकाच व्यक्तीला दोनवेळा …

Read More »