Breaking News

Yearly Archives: 2019

बाईक न दिल्याने विद्यार्थ्याने शाळेत पेटवून घेतले

पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदार, शाळेत जायला वडिलांनी मोटरसायकल न दिल्याने एका अकरावीच्या विद्यार्थ्याने कळंबोली येथील सुधागड हायस्कूलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 15) घडली. शिवम दीपक यादव (17) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो गंभीररीत्या भाजला आहे. त्याला ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकर्यांना तत्काळ मदतनिधी द्यावा

देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 15) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीची मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी या भेटीदरम्यान फडणवीस यांनी केली. त्यावर राज्यपाल …

Read More »

माणगावमध्ये कंपनीत स्फोट : 18 कर्मचारी भाजले; पाच जण गंभीर

माणगाव : माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात क्रिप्टझो कंपनीत शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी स्फोट होऊन लागलेल्या आगीत 18 कर्मचारी भाजले आहेत. जखमींना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. क्रिप्टझो कंपनी फायर ब्रिगेडसाठी आग विझवण्याची सिस्टीम बनविण्याचे काम …

Read More »

‘स्मार्ट वॉच’मुळे कर्मचार्‍यांचे नुकसान

नवी मुंबई : प्रतिनिधी पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना ‘स्मार्ट वॉच’ प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे वेळेवर पगार मिळालेला नाही, तर काहींचे वेतन कापण्यात आलेले आहे. या विरोधात गुरुवारी मुख्यालयासमोर कर्मचार्‍यांनी ठिय्या दिला आणि पालिका अधिकार्‍यांना मुख्यालयाच्या आवारातून बाहेर वा बाहेरून आत येण्यास मज्जाव केला. नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयासमोर प्रवेशद्वार बंद आंदोलनामुळे अनेक अधिकारी …

Read More »

शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहा -वपोनी काईंगडे

मोहोपाडा : वार्ताहर शिक्षण व खेळासाठी वेळ व महत्त्व द्या, असे आवाहन खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी केले. वावंढळवाडी येथील हनुमान मंदिरात काकडा आरती समाप्तीच्या दीपोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, घरच्या मोठ्या माणसांनी सतत टीव्ही सुरू ठेवणे व मुलांच्या हातात मोबाईल …

Read More »

जेएनपीटी येथे दक्षता जागृती आठवडा

उरण : वार्ताहर जेएनपीटीमध्ये 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जागृती आठवडा साजरा करण्यात आला. या वेळी निबंध लेखन, पोस्टर, घोषणा, व्यंगचित्र अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 17 ऑक्टोबर रोजी पोर्ट ग्राहकांसाठी एक चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चा सत्रासाठी शिपिंग एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी दोन कार्यशाळा  …

Read More »

मोहोपाडा शिशु बालमंदिरात बालदिन साजरा

मोहोपाडा : वार्ताहर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोहोपाडा येथील महिला उद्योग मंडळ संचलित शिशुविकास बालमंदिर येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी बालदिनानिमित्त शाळेमध्ये जाऊन मुलांशी खुल्या मनाने संवाद साधला. त्यांना वाहतूक नियमांचे पालन करणे, स्वतःची …

Read More »

सात घरफोड्या करणारा चोरटा जेरबंद

30 तोळे सोन्यासह चोरीची साधनेही जप्त कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2017पासून घरफोड्या करणार्‍या एकास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गेल्या दोन वर्षांतील घरफोड्यांचे एकूण सात गुन्हे उघड झाले आहेत. या घरफोड्या करून चोरलेले तब्बल 30 तोळे सोनेदेखील नेरळ पोलिसांनी जप्त केले आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत …

Read More »

मासेमारी करणार्या दोन गटांत भरसमुद्रात हाणामारी

अलिबाग : प्रतिनिधी एलईडीद्वारे मासेमारी करणारे आणि बुल नेट मासेमारी करणार्‍या आक्षी आणि बोडणीमधील मच्छीमारांच्या दोन गटांमध्ये समुद्रात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांतील आठ जण जखमी झाले. जखमींवर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरूड तालुक्यातील कोर्लई समुद्रात ही घटना घडली.  एलईडीमार्फत मासेमारी करणे हे कायद्याने …

Read More »

निडी येथे रेल्वे फाटक सुरक्षा जनजागृती अभियान

रोहे ः प्रतिनिधी येथील रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने निडी रेल्वे फाटक येथे निरीक्षक सतीश विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे फाटक सुरक्षा जनजागृती अभियान रबविण्यात आले. रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर ते लगेचच उघडावे, असे प्रवासी गेटमेनला सांगतात. फाटक उघडले नाही तर गेटमेन व प्रवाशांत बाचाबाची होते. वास्तविक रेल्वेकडून सूचना आल्यानंतरच फाटक बंद …

Read More »