Breaking News

Yearly Archives: 2019

व्हीके हायस्कूलचा शतक महोत्सवी सोहळा

पनवेल : वार्ताहर कोकण एज्युकेशन सोसायटीचे विठोबा खंडाप्पा हायस्कूलचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष. व्हीके नावाने प्रचलित या शाळेच्या शतक महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो माजी विद्यार्थी एकत्र येण्यासाठी गेले अनेक महिने नियोजन करत आहेत. कित्येक वर्षांनी आपल्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता माजी विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे. 28, 29 डिसेंबर 2019 रोजी शतक …

Read More »

मॅकडोनल्डसमोरील महामार्गावर ट्रॅव्हल्सचा गराडा

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील कळंबोली येथे असलेल्या मॅकडोनल्डच्या समोरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांचा गराडा पडलेला असून यामुळे येथून वाहन चालविताना मोठे जिकिरीचे बनले आहे. यातूनच एखाद्या दिवशी मोठा अपघात घडून नाहक प्रवासी या गाड्यांखाली चिरडले जाण्याची शक्यता असताना सुद्धा वाहतूक शाखा याबाबत पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याबाबत प्रवासी वर्गाकडून …

Read More »

पनवेल : येथील पत्रकार वसीम पटेल यांच्या कहकशा या दिवाळी अंकाचे प्रकाशन पनवेल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष इक्बाल काजी यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेवक मुकीत काजी, इक्बाल नावरेकर, गुफरान मुतव्वली, हमीद पटेल, हमीद धुरू, मुदस्सिर पटेल, हनिफ कच्छी, सुफियान पटेल, अविश मस्ते, अलिम पटेल, असीम पटेल आदी उपस्थित होते.

Read More »

उरण : हिंदू लोहार समाज महासंघ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष आण्णासाहेब जोशी, रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर मणेर व उरण तालुका लोहार समाज अध्यक्ष राहुल कोशे व कार्यकारिणी सदस्य यांनी नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांची नुकतीच  सदिच्छा भेट घेतली. या वेळी उरण तालुका लोहार समाज उपाध्यक्ष कृष्णा व्यापारी, सहसंघटक संतोष जाधव, सदस्य …

Read More »

कामोठे : येथील युवा कार्यकर्ते सुशांत एकनाथ काटकर यांना वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी कामोठे शहर अध्यक्ष आरोग्य समिती सभापती डॉ. अरुणकुमार भगत, नावडे युवा मोर्चा अध्यक्ष जितेंद्र काटकर, सूर्यकांत काटकर, प्रशांत काटकर, रोशन सरकाले, मिलिंद झुरे आदी उपस्थित होते.

Read More »

पालिका अतिक्रमण विभाग पथकाची धडक कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाने आज पनवेल परिसरात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण शुल्क वसूल केले आहे. खांदा वसाहत परिसरात दीपावलीच्या सुटीमुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व अवैध विक्रेते वाढले होते. याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण …

Read More »

मोसारे येथे शैक्षणिक, क्रीडा साहित्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील नानोशी ग्रामपंचायतमधील मोसारे गावात पनवेल टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीने खर्‍या अर्थाने गरजू व गरीब शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल टेनिस समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील (रोहिंजण), उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे (ओवळे), कुंडेवहाळ येथील प्रख्यात आणि दानशूर व्यक्तिमत्त्व असणारे …

Read More »

भ्रष्टाचाराविरोधात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पथनाट्य

उरण : प्रतिनिधी देशातील शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली असल्याने त्याचा मनस्ताप जनतेला वारंवार सोसावा लागत आहे. या भ्रष्टाचाराचा बंदोबस्त कसा करावा या अनुषंगाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींचे उरणच्या तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यासमोर भ्रष्टाचारविषयक जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. आज शासकीय यंत्रणेत जनतेला लहानशा कामासाठी लाच …

Read More »

साजन भानवालचे कांस्य हुकले जागतिक युवा कुस्ती स्पर्धा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था तीन पदकांचा मानकरी ठरलेल्या साजन भानवाल (77 किलो) याला ग्रीको-रोमन प्रकारात कांस्यपदकाने हुलकावणी दिली. बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी भारताच्या रवीने (97 किलो) रिपिचेज फेरीत स्थान मिळवले आहे. तुर्कीच्या सेरकान अयोकुन याच्यासमोर भानवालचा निभाव लागला नाही. त्यामुळे कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत …

Read More »

चेन स्नॅचिंगवर नियंत्रण आणण्याची मागणी, खारघर पोलिसांना महिलांनी दिले निवेदन

खारघर : प्रतिनिधी खारघर शहरात नजीकच्या काळात चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्वच सेक्टरमध्ये वाढले आहेत. संबंधित प्रकाराने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याने पोलिसांनी यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याची मागणी शुक्रवारी (दि. 1) खारघर भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी केली. भाजपच्या महिला मोर्चाच्या चिटणीस बिना गोगरी यांनी …

Read More »