नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटपटूंनी दिवाळी सेलिब्रेशन केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. खेळाडूंच्या फॅन्सनीही त्यांचे हे फोटो लाईक आणि शेअर केले आहेत, पण वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मात्र दिवाळीचे फोटो शेअर करून चांगलाच गोत्यात आला आहे. इशांत शर्माने इन्स्टाग्रामवर त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर …
Read More »Yearly Archives: 2019
खालापुरातील विप्रास गोराडिया कारखाना तडकाफडकी बंद
250 कामगारांवर बेकारीची कुर्हाड खोपोली ़: प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीत असणारी विप्रास गोराडिया पोलाद उत्पादन करणारी कंपनी दिवाळी सणाच्या तोंडावरच तडकाफडकी बंद करण्यात आली. त्यामुळे सुमारे 250 कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. विप्रास गोराडिया कारखाना गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहे. या कारखान्याने 2004 पासून वीजबिल भरले नाही. त्यामुळे …
Read More »जंजिरा किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत
मुरूड : प्रतिनिधी सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मुरूड तालुका प्रवासी संघटनेच्या प्रयत्नाने किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक मुरूडला येतात. चारही बाजूने समुद्र व खारट पाणी असतानादेखील या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव असल्याने …
Read More »खारभूमी कार्यालयावर संजय जांभळे यांची धडक
अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे संताप व्यक्त; कारवाईची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील आमटेम येथील खारबंदिस्तीच्या कामाची बिले शेतकर्यांना अजून का अदा केली नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जांभळे यांनी बुधवारी (दि. 30) पेणमधील खारभूमी कार्यालयावर धडक दिली, मात्र तेथे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे …
Read More »उरण : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल भाजप रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण तालुका उपाध्यक्ष पंडित घरत व कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Read More »पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दिवाळीनिमित्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »विळे-भागाड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी
नागरिकांची मागणी माणगाव : प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडी, रोहा तालुक्यातील धाटाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहे. त्याच धर्तीवर माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. नव्याने निर्माण होणार्या विळे-भागाड औद्योगिक क्षेत्राला सुरक्षा देण्याच्या दृष्टीने तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »हुतात्मा हिराजी पाटील यांच्या सुनेचे आत्मचरित्र काळजाला भिडणारे -सिंधूताई सपकाळ
कर्जत : बातमीदार हुतात्मा हिराजी पाटील यांनी 28व्या वर्षी देशासाठी शहीद होऊन केलेले काम न विसारण्याजोगे आहे. हा इतिहास जिवंत करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी जो प्रयत्न केला आहे, तो काळजाचा ठोका चुकविणारा आहे. त्यामुळे त्यांना आपला सलाम आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी काढले. हुतात्मा हिराजी पाटील आणि जानकीबाई …
Read More »ओला दुष्काळ जाहीर करावा
सुधागड तालुका मराठा समाज संस्थेची मागणी पाली : प्रतिनिधी परतीच्या पावसाने हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सुधागड तालुका मराठा समाज संस्थेने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या वतीने बुधवारी (दि. 30) पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना …
Read More »कर्जमंजुरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक
पनवेल : बातमीदार बिल्डिंग बांधकामाकरिता 100 कोटींचे कर्ज मंजुर करून देतो, असे सांगून पुणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 31 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यातील दोन आरोपींवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश नानकचंद आग्रवाल यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून त्यांची पुणे येथे आग्रवाल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper