Breaking News

Yearly Archives: 2019

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

मुंबई ः प्रतिनिधी :  अंधेरीत एका 60 वर्षीय महिलेला आक्षेपार्ह फोटोच्या सहाय्याने ब्लॅकमेल करून 12 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरून फिर्यादी असलेल्या वृद्ध महिलेची एका तरुणाशी ओळख झाली होती. या प्रकरणी दुबईत राहणार्‍या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी परिसरात …

Read More »

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष; तीन पोलीस निलंबित

पुणे ः प्रतिनिधी : अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करणे ग्रामीण पोलीस दलातील तिघा पोलीस हवालदारांना चांगलेच भोवले आहे़. त्यांच्या हद्दीत अवैध धंदे चालू असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना निलंबित केले आहे़. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमिरुद्दीन रफीरद्दीन चमनशेख, लोणीकंद पोलीस ठाण्याचे हवालदार डी़. सी़. बेंद्रे …

Read More »

विकासकामांच्या आधारावर जनतेचे आशीर्वाद मागणार -नितीन गडकरी

नागपूर ः प्रतिनिधी : मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही. सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. नाना पटोलेंनी पक्ष सोडला असला तरी त्यांच्यावर आशीर्वाद कायम राहतील, तसेच निवडणुकीसाठी पटोलेंना शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. नागपुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाला …

Read More »

राजकीय पक्षांचे झेंडे सोलापुरात दाखल

सोलापूर ः प्रतिनिधी :  लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांत हालचालींनी वेग घेतला. अनेकांकडून प्रचारासाठीची मैदाने निश्चित होत आहेत. याबरोबरच वातावरण पक्षांच्या झेंड्यांनी ढवळून निघेल यासाठी प्रयत्न करताहेत. प्रचाराचा रंग गडद करणारे देशातील विविध पक्षांचे झेंडे सध्या चीनमधून सोलापुरात दाखल झाले आहेत. प्रचार कार्यक्रम सुरू होताच या झेंड्यांची मागणी …

Read More »

आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिल्याप्रमाणे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात प्रवेशाच्या सर्व ठिकाणी चेक पोस्टवर विशेषतः दारूची वाहतूक, मोठ्या प्रमाणावर पैसे नेण्यात येत आहेत का यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क  व पोलीस यंत्रणेलादेखील अवैध दारूचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यास …

Read More »

राजिपच्या अधिकार्यांनी आत्मपरीक्षण करावे

रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकरी निखीलकुमार ओस्वाल यांना  झालेल्या मारहाणीमुळे रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी हादरले आहेत. त्यांनी या प्रकरणाचा धसकाच घेतला आहे. या प्रकरणामुळे रायगड जिल्हा परिषदेची अब्रू गेली आहे. या मारहाणीचा निषेधच केला पाहिजे, परंतु ही घटना का घडली याचे आत्मपरीक्षण अधिकार्‍यांनीदेखील करावे. रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण …

Read More »

मतदारराजासाठी…

लोकशाहीच्या उत्सवात मतदारराजाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, पण बर्‍याच निवडणुकांमध्ये मतदारांची नकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. हे टाळणे सर्वस्वी मतदारांच्या हातात आहे. मतदान करा, ते टाळू नका. कारण आपल्या एका मताने देशाचे भविष्य घडणार आहे याची जाणीव सुज्ञ मतदारांनी ठेवणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने देशातील राजकीय वातावरण …

Read More »

लोकशाहीचा उत्सव साजरा करा

मतदानाचा हक्क बजावण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. मतदानासाठी आता महिनाभरापेक्षा कमी काळ उरला आहे. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मतदारांना, विशेषतः तरुणाईला ब्लॉगद्वारे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला होणार आहे. या …

Read More »

पोलादपूरमध्ये वृद्ध बैलाचे उत्तरकार्य

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक मतदानासाठी मतदारांना सुविधा, तसेच एकूणच प्रक्रिया निर्भय, मुक्त, पारदर्शी होण्यासाठी निवडणूक आयोग डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सी व्हिजिल हे नवे मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले असून, आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. सी …

Read More »

आम्ही दुसर्याच्या पोरांचेही लाड करतो

मुंबई : प्रतिनिधी ‘मी माझ्या पोरांसोबत इतरांच्या पोरांचेही लाड करतो. इतरांची पोरं नुसती धुणीभांडी करण्यासाठी असतात असं आम्ही समजत नाही,’ असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हाणला आहे. नगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय …

Read More »