Breaking News

Yearly Archives: 2019

वाटेवरचे काटे

लोकांची कामे करताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे हात-पाय लकवा मारल्यागत थंड पडत असत. परंतु देवेंदजींनी ते चित्र पालटून महाराष्ट्राचा कारभार रूळावर आणला. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार्‍या काळात ओल्या दुष्काळाला कसे तोंड देणार, नाणारच्या बहुचर्चित प्रकल्पाचे काय करणार, आरे वनातील मेट्रोप्रकल्पाच्या कामाचा बट्याबोळ होणार का, बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे योगदान देणार …

Read More »

नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांनी तब्बल महिनाभरानंतर बुधवारी (दि. 27) आमदारकीची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 288पैकी उपस्थित 285 सदस्यांना (दुपारी 1 वाजेपर्यंत) सदस्यत्वाची शपथ दिली. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवारी विधानभवनात झाले. सकाळीच कामकाज सुरू झाले. नव्या विधानसभेतील 288पैकी 285 आमदारांना विधानसभेचे हंगामी …

Read More »

वाकण-पाली, खोपोली रस्त्यावरील अतिअवजड वाहनांची वाहतूक आता मुंबई-गोवा राष्ट्रीयमार्गे

अलिबाग : जिमाका जिल्ह्यात झालेल्या अतिपर्जन्यवृष्टीमुळे व पुलावरून येणार्‍या-जाणार्‍या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच जांभूळपाडा व बागूलपाडा पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरील 20 मे. टनापर्यंतची अवजड वाहतूक सुरू ठेवून त्यावरील सर्व प्रकारची अतिअवजड वाहतूक बंद करण्यात येत आहे. सहा महिन्यांकरिता …

Read More »

…म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला : अमित शहा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील राजकीय लढाईनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मत व्यक्त केले आहे. ’अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते असल्याने भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता,’ असे शहा यांनी सांगितले. निवडणूक निकालानंतर राज्यात तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा मंगळवारी शेवट झाला. भाजपला साथ देऊन …

Read More »

नूतन शाळा इमारतीचे कामोठ्यात भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी शाळा सुरू होणार आहे. या शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) करण्यात आले. या सोहळ्यास विद्यालयाचे चेअरमन स्वामी म्हात्रे, व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, माजी चेअरमन …

Read More »

आमदारांच्या हॉटेल्सची बिले शेतकरी भरणार का?

महाआघाडीच्या नेत्यांना अभिनेत्याचा सवाल मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात बहुमताचा आकडा टिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपले आमदार सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले. तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते, मात्र आता सत्तास्थापनेनंतर आमदारांच्या हॉटेल्सची बिले शेतकरी भरणार का, असा सवाल अभिनेता सुमीत राघवन याने केला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट …

Read More »

सचिन तेंडुलकरची खारघरमध्ये उपस्थिती

हृदय शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना प्रमाणपत्र वितरण पनवेल : प्रतिनिधी सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन पेडिअट्रिक कार्डिएक स्कील्सच्या खारघर येथील युनिटतर्फे मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या 100 मुलांना गिफ्ट ऑफ लाइफचे प्रमाणपत्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) देण्यात आले. संस्थेच्या पहिल्या …

Read More »

पोलादपूर तालुक्यातील आरोग्यव्यवस्था आजारी

पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी, परसुले, पळचिल आणि पोलादपूर या ’प’च्या बाराखडीत पोलादपूर तालुक्याची आरोग्यव्यवस्था असून या चारही गावांतील आरोग्यव्यवस्थेचे बारा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी अथवा अधीक्षक पूर्ण वेळ पद देण्याची ग्वाही आरोग्य उपसंचालिका रावखंडे यांनी दिल्यानंतर आरोग्य उपसंचालिका श्रीमती राठोड यांनीही दिलेली ग्वाही हवेत विरली. …

Read More »

निभाव कसा लागावा?

ओल्या दुष्काळाने हवालदिल झालेले महाराष्ट्रातील शेतकरी आता पुढे कसे होणार या चिंतेत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस पक्षाचे नेते आणि त्यांचे ओलिस आमदार पंचतारांकित हॉटेलांत बिर्याणीवर ताव मारत होते. याहून अधिक मोठा अपमान बळीराजाच्या वाट्याला कधी आला नसावा. एकटा भारतीय जनता पक्ष वगळता इतर सर्व पक्षांना सत्ता स्थापनेसाठी पंचतारांकित …

Read More »

धावत्या ट्रेनमधून गर्भवती पत्नीला ढकलले; सुदैवाने प्राण बचावले

मुंबई : प्रतिनिधी रेल्वे प्रवासात वादावादी झाल्यानंतर संतापाच्या भरात पतीने गर्भवती पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलून दिले. मुंबईतील दहिसर-मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही धक्कादायक घटना घडली. सागर धोडी (25) असे आरोपीचे नाव आहे. सागर आणि त्याची पत्नी राणी ट्रेनने नालासोपार्‍याला जात असताना त्यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. रागाच्या भरात सागरने राणीला ट्रेनमधून …

Read More »