Breaking News

Monthly Archives: January 2020

भाजप जिल्हा संघटन चिटणीसपदी सतीश धारप, तर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी प्रीतम पाटील

अलिबाग : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा संघटन  सरचिटणीसपदी ज्येष्ठ नेते सतीश धारप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली. दक्षिण रायगड संघटनात्मकदृष्ट्या …

Read More »

खगोल मंडळातर्फे आकाशदर्शन कार्यक्रम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खगोल मंडळातर्फे नवी मुंबई महानगरपालिका संचालित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रबाले येथे आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि. 27) जानेवारी 2020 रोजी झालेल्या या कार्यक्रमात 320 विद्यार्थी आणि 30 शिक्षकांनी घेतला. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी हे कष्टकरी समाजातील होते, हे नमूद करण्यासारखे आहे. …

Read More »

इंटरस्कूल-क्लब क्रिकेट स्पर्धेत एस.ए. अ‍ॅकॅडमी मुंबई संघ विजेता

खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पक्ष खारघर शहर मंडळ पुरस्कृत जयहिंन्द क्रिडा मंडळ खारघरच्या वतीने 14 वर्षाखालील इंटरस्कूल-क्लब सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 24 ते 26 जानेवारी 2020 या कालावधीत रामशेठ ठाकूर पब्लीक स्कूल खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. स्पर्धेत …

Read More »

माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा, व सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रियदर्शनी महिला मंडळ आणि अष्टविनायक पीएल 5 ओनर्स असोसिएशनच्या माघी श्रीगणेश जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यानिमीत्त सत्यनारायणाची महापूजा, श्रीगणेश जन्मोत्सव, हळदी-कुंकू समारंभ, श्रींची पालखी आदी धार्मिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा …

Read More »

बंदच्या हाकेला पनवेलमध्ये अत्यल्प प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजन क्रांती मोर्चा, शेकाप आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी बुधवारी (दि. 28) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या हाक ला पनवेलमध्ये अत्यल्प प्रतिसाद भेटला. या बंद दरम्यान पनवेल मधील ज्वेलर्स, किराणा तसेच विविध दुकांनाचा व्यवहार सुरळीतपणे …

Read More »

वामणे रेल्वेस्थानकात सहा प्रवासी जखमी

महाड ़़: प्रतिनिधी कोकण रेल्वेच्या वामणे स्थानकात सोमवारी (दि. 27) रात्री गाडीतून उतरणारे सहा प्रवासी खाली पडले आणि काही सेकंदात गाडी सुरू झाली, मात्र हे पडलेले प्रवासी एकमेकांना आधार देत बाहेर आल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र या धडपडीत यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जुना फलाट काढून टाकल्याने आणि …

Read More »

नागोठण्यातून लाखो रुपयांचा गुटखा हस्तगत

नागोठणे : प्रतिनिधी पेण येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास नागोठणे शहरातील एका इमारतीच्या गोदामावर धाड टाकून पान मसाल्याच्या गोणींसह विविध प्रकारची रसायने ताब्यात घेतली. या मालाची किंमत 10 लाख 27 हजार 580 रुपये इतकी असून इमारतीच्या मालकासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Read More »

खालापुरात संशयास्पद कार

अपघातानंतर तिघे जण फरार खोपोली : प्रतिनिधी खालापुरात आठवडाभरापूर्वी अपघात झालेली कार संशयास्पद अवस्थेत पडून आहे. अपघातानंतर कारमधील तीन जणांनी जखमी अवस्थेत पळ काढल्याने या कारचे गूढ वाढले आहे. खालापूर शहरातून द्रुतगती मार्गाला जोडरस्ता असून आठवड्यापूर्वी पहाटेच्या वेळेस सुसाट वेगाने जाणारी कार जोगावडे वाड्यानजीक वळणावर रस्ता सोडून शेतात पलटी झाली. …

Read More »

भूसुरुंग स्फोटाने घरांच्या भिंतींना भेगा

पोलादपूरच्या कशेडी घाटामध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणात धमाके पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात कशेडी घाटामधील चोळई आणि धामणदिवी गावांच्या सीमेवर डोंगर फोडण्यासाठी करण्यात आलेल्या भूसुरुंगाने परिसरात हादरे बसून अनेक घरांना तडे गेले. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.कशेडी घाटात मंगळवारी (दि. 28) दुपारी चार वाजल्यापासून एल अँड टी या ठेकेदार …

Read More »

कुलाबा किल्ल्यात माघी गणेशोत्सव उत्साहात

अलिबाग ़: प्रतिनिधी येथील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणेश मंदिरात मंगळवारी (दि. 28) खास माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे काकड आरतीने या उत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी ओहोटीची वेळ साधत भाविकांनी गणेश पंचायतनाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने किल्ल्यात ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. संपूर्ण किल्ल्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माघी गणेशोत्सवानिमित्त …

Read More »