Breaking News

Monthly Archives: January 2020

चिरनेरच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी

माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा उरण : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. 28) चिरनेर येथील महागणपती मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगेचा ओघ वाढला होता. अगदी सायंकाळी व रात्री उशिरापर्यंतसुद्धा भाविकांच्या गर्दीने मंदिराचा सभामंडप गजबजून गेला होता. पेशवेकालीन गणपती आणि नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रचिती असलेल्या चिरनेर महागणपती मंदिरात …

Read More »

भिंगारवाडी (ता. पनवेल) : भाजप युवा मोर्चा पळस्पे जि. प. विभागीय अध्यक्ष व माजी सरपंच योगेश लहाने यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे उद्घाटन त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, जि. …

Read More »

लोकनेता चषकाचा तुर्भे संघ मानकरी

नवी मुंबई : प्रतिनिधी जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने कुकशेत येथे आयोजित लोकनेता चषक क्रिकेट स्पर्धा कुमार इलेव्हन, तुर्भे या संघाने जिंकली. सानपाड्याचा राजेश स्मृती संघ उपविजेता ठरला. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक सुरज पाटील यांनी केले होते. स्पर्धेचे उद्घाटन महापौर …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धा उत्साहात

पनवेल : वार्ताहर येथील महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांसाठीच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धा खारघर येथे आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेस प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास महापालिकेचे उपायुक्त  संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे, हावरे …

Read More »

रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक

सिडनी : अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आपला अनुभव पणाला लावत फेडररने 28 वर्षीय टेनिस सँडग्रेनची झुंज 6-3, 2-6, 2-6, 7-6 (10-8), 6-3च्या फरकाने मोडून काढली. साडेतीन तास सुरू असलेल्या सामन्यात फेडररला विजयासाठी संघर्ष करावा लागला, पण अखेरीस त्याने ही किमया साधून …

Read More »

19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा : उरण, अलिबागची विजयी सलामी

अलिबाग : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे सुरू असलेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या रायगड जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत उरण व अलिबाग संघांनी विजयी सलामी दिली. उरण स्पोर्ट्स असोसिएशन आणि यू. व्ही. पनवेल यांच्यात झालेल्या सामन्यात उरणने 118 धावांनी विजय मिळवला, तर अलिबागने उरणच्या धीरज क्रिकेट क्लबचा पराभव केला. उरण अणि …

Read More »

पेणच्या कुस्ती आखाड्यात पुण्याचा संदीप काळे विजेता

पेण : प्रतिनिधी पेण तालुका कुस्तीगीर विकास संघातर्फे सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनी आयोजित कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात पुण्यातील हनुमान आखाड्याचा संदीप काळे याने पुण्याचाच भरत लोकरे याला चीतपट केले. यासह संदीपने मानाची गदा व रोख 15 हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने व बांधकाम व्यावसायिक सचिन …

Read More »

किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; मुंबई उपनगर, ठाणे विजेते

अहमदनगर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या 31व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगरने सलग दुसर्‍यांदा किशोरी, तर ठाण्याने प्रथमच किशोर गटाचे जेतेपद पटकाविले. अहमदनगर येथील रेसिडेन्शियल हायस्कूलच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगली. किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई …

Read More »

अंकिता मयेकर यांना पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक

अलिबाग : प्रतिनिधी रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या भंडारी श्री पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी सुवर्णपदक पटकावले. 52 किलो वजनी गटात 255 किलो वजन उचलून त्यांनी ही कामगिरी केली. मागील वर्षी शासनाने अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू म्हणून मयेकर यांना वर्ग 2 म्हणून सेवेत घेतले. सध्या त्या …

Read More »

ठाकरे सरकारविरोधात 9000 ग्रामपंचायतींचा एल्गार!

मुंबई ः सरपंचांची निवड थेट जनतेतून करायची की नाही, या मुद्द्यावरून राज्यातील ग्रामपंचायती व राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. राज्यात सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने सरपंचांची निवड थेट जनतेतून न करता सदस्यांमधून करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे चिडलेल्या हजारो ग्रामपंचायतींनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. सरपंचाची निवड ही जनतेतूनच …

Read More »