Breaking News

Monthly Archives: January 2020

सरस्वती तंत्रनिकेतनमध्ये महिला प्रशिक्षण कार्यक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील सरस्वती इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे होते, तर प्रमुख पाहुणे साक्षी सागवेकर व महेंद्र राजे हे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे यांनी स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल आपले मत मांडले. प्रशिक्षक म्हणून सीआरपीएफचे जवान महेंद्र …

Read More »

वासुदेव बळवंत फडके विद्यालयात प्रजासत्ताक दिन जल्लोषात

पनवेल ः प्रतिनिधी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल येथे 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे शाळा सामिती अध्यक्ष  विजय भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ध्वजपथक, लेझीम पथक, तायक्वांडोची प्रात्यक्षिके सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. माध्यमिक, प्राथमिक तसेच पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही …

Read More »

कळंबोली हायवेवरील शौचालयाची दुर्दशा

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस महामार्ग सुरू होतो त्या ठिकाणी खूप गर्दी असते. येथे जमणार्‍या प्रवाशांसाठी शौचालय बांधून ठेवण्यात आले आहे, परंतु त्याची देखरेख व्यवस्थित होत नसल्याने त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. अनेक वेळा तेथे पाणी नसते, तर दरवाजेसुद्धा कुजलेल्या अवस्थेत आहेत व नेहमीच दुर्गंधी येत असते. …

Read More »

मोहोपाड्यातील आनंदा दळवी यांना पुरस्कार

मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे-मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्मचारी आनंदा लक्ष्मण दळवी यांना अमरदीप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आनंदा दळवी यांना हा पुरस्कार आर्मी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमात विंग कमांडर राजेंद्र महानुभव (सेवानिवृत्त भारतीय एअर फोर्स), सिने …

Read More »

नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक

पनवेल : वार्ताहर नेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने उरण परिसरातील 23 बेरोजगार तरुणांकडून 52 लाख 70 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याशिवाय या भामट्याने टेम्पो व चारचाकी वाहन भाड्याने लावण्याचे आमिष दाखवूनसुद्धा अनेक वाहनमालकांना लाखोंचा गंडा घातला आहे. संतोष अनंत पेढवी असे या भामट्याचे नाव …

Read More »

नायजेरियन दाम्पत्यावर गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार भारतात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नायजेरियातून भारतात आणलेल्या एका 21 वर्षीय तरुणीला नायजेरियन दाम्पत्याने शरीरविक्रय व्यवसायात ढकलल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित नायजेरियन तरुणीने पाच महिन्यांनंतर स्वत:ची सुटका करून घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी नायजेरियन दाम्पत्यासह तिघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा …

Read More »

शिक्षण, आरोग्य समितीवर घारेंची बोळवण

कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनलेले सुधाकर घारे यांना नाराजीनंतरही अर्थ आणि बांधकाम खाते न देता त्यांची शिक्षण आणि आरोग्य समितीवर बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे आता ते काय पवित्रा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे विश्वासू समजले जाणारे सुधाकर घारे यांची अपेक्षेप्रमाणे …

Read More »

पाकला 10 दिवसांत धूळ चारू : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला नाव न घेता इशारा दिला. भारताकडून तीन-तीन युद्ध हरलो आहोत हे शेजारी देशाला चांगलेच ठाऊक आहे. भारतीय लष्कराला वाटले तर आठवडा किंवा 10 दिवसांत त्यांना हरवू शकते, असे ते म्हणाले.या वेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस, …

Read More »

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली शर्जील इमामला अटक

पाटणा : वृत्तसंस्थादिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (सीएए) शाहीन बाग येथे आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जीलचा मुख्य सहभाग असून, प्रक्षोभक भाषणांसाठी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्ली पोलिसांची पाच पथके शर्जीलच्या मागावर होती. दिल्लीसह पाटणा …

Read More »

गणेश जयंतीचा रायगडात उदंड उत्साह

ठिकठिकाणची मंदिरे भाविकांनी फुलली; सार्वजनिक, घरगुती स्वरूपातही पूजन अलिबाग : प्रतिनिधीगणेश जयंती अर्थात माघी गणेशोत्सव रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 28) उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील प्रमुख गणपती मंदिरे यानिमित्ताने भाविकांनी फुलून गेली होती. त्याचप्रमाणे सार्वजनिक, तसेच घरगुती स्वरूपातही हा उत्सव साजरा झाला.  माघ महिन्यात येणारी गणेश जयंती म्हणजे 14 विद्या …

Read More »