Breaking News

Monthly Archives: February 2020

पोलीस ठाण्यांतर्गत विविध सेलची स्थापना; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगेंची माहिती

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील कायदा- सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी व नागरिकांसह महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्यांतर्गत विविध सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारदाराला आपली तक्रार देणे अधिक सोयीस्कर राहणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी …

Read More »

जासईच्या तरुणाचा ऑस्ट्रेलियात डंका; सर्वेश घरतला आर्किटेक्चरमधील सर्वोच्च पदवी

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जासई गावातील सर्वेश किशोर घरत या आगरी तरुणाने ऑस्ट्रेलियात आर्किटेक्चरमधील सर्वोच्च पदवी मिळवत देशाबरोबर उरण तालुका व जासई गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. जेएनपीटीमधील अग्रगण्य असलेल्या न्हावाशेवा बंदर कामगार संघटनेचे (अंतर्गत) संस्थापक अध्यक्ष व वरिष्ठ सल्लागार किशोर हरिश्चंद्र घरत …

Read More »

पनवेल : इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर तसेच डॉ. जयश्री पाटील, डॉ. साधना गांधी, कल्पना नागावकर आदी महिला उपस्थित होत्या.

Read More »

चिंचवली (ता. पनवेल) : भाजप नेते विकास भगत यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त गुरुवारी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, दुंदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश पाटील यांसह पदाधिकारी, …

Read More »

विचुंबे येथे काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ : अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील पुष्पनारायण सोसायटीमध्ये काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. हे काम जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्या शेष फंडाच्या निधीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 14) करण्यात आले. या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेेंद्र पाटील, …

Read More »

आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तशिव प्रबळ सामाजिक विकाससंस्था आणि कर्तेश्वर क्रिकेट संघ व जय हनुमान क्रिकेट संघातर्फे आमदार प्रशांत ठाकूर चषक 2020 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पनवेल तालुक्यातील भिंगार येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचेउद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 13) झाले.उद्घाटन सोहळ्यास आयोजक माजी सरपंच सुभाष पाटील, …

Read More »

भारताचा पहिला डाव गडगडला

न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात फलंदाज ढेपाळले हॅमिल्टन : वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्धच्या तीनदिवसीय सराव सामन्यात  भारताचा पहिला डाव गडगडला. भारतीय संघावर पहिल्याच दिवशी 263 धावांमध्ये गारद होण्याची वेळ आली. चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही, तर दोन फलंदाजांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.येत्या 21 फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात …

Read More »

विवेक पाटलांच्या अटकेची जोरदार मागणी

कर्नाळा बँकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात चीड आणि संताप पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कारभारात 63 बोगस कर्ज प्रकरणे करून त्यातील 512.50 कोटी रुपये लंपास करणारे व सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणारे शेकाप नेते,  कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करा, अटक करा, अशी जोरदार मागणी …

Read More »

विवेक पाटलांसह कर्नाळा बँकेचे लेखापरीक्षकही अडचणीत 

हताश खातेदार, ठेवीदार मात्र पैसे मिळण्याच्या प्रतक्षेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची …

Read More »

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील; मुंबई अध्यक्षपदी लोढा कायम

मुंबई : प्रतिनिधीभाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड झाली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावांचीही भाजपच्या गोटात चर्चा होती, मात्र पक्षनेतृत्वाने चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती …

Read More »