पनवेल : वार्ताहर सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर कामाशिवाय वाहने रस्त्यावर येवू नयेत यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी नियमावली करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ई-पास शिवाय दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही. दुचाकी वाहनांवर फक्त चालक असणार आहे डबल …
Read More »Monthly Archives: April 2020
भाजप नेते किरण माळी यांच्याकडून गोरगरिब कुटूंबांना जीवनावश्यक वस्तू
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात जांभिवली ग्रामपंचायत, कराडे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील गरजू गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी भाजपाचे केळवणे जिल्हा परिषद विभागाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच किरण माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी सरपंच आंबो कोडींलकर यांच्या स्मरणार्थ मौजे जांभिवली, चांवढोली, कराडे खुर्द, कासप आदी गावातील …
Read More »श्रीवर्धनमध्ये उसळली नागरिकांची गर्दी
पूर्णत: लॉकडाऊनपूर्वी लोकांची खरेदीसाठी झुंबड श्रीवर्धन : प्रतिनिधी औषधाची दुकाने व दवाखाने याव्यतिरिक्त भाजीपाला व सर्व व्यवहार बंद राहील असे अनेक मेसेज श्रीवर्धनमध्ये व्हॉट्सअॅप वरती फिरत होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी काही नागरिकांनी खरेदीसाठी श्रीवर्धन बाजारपेठेत एकच गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोना आपल्यापासून फक्त तीन किलोमीटर लांब आलेला आहे. याचे कोणतेही …
Read More »समर्थ नेतृत्व
अफाट लोकसंख्येच्या भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर भयावह परिस्थिती ओढवेल अशी भीती जगभरातच अनेकांना वाटत होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटाच्या काळात असे काही झपाट्याने आणि खंबीरपणे निर्णय घेतले आहेत की अनेकविध स्तरांवर त्यांचे कौतुक होत आहे. भारतातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रगाढ विश्वास आहे हे तर …
Read More »पनवेल तालुका पोलिसांकडून निराधार ज्येष्ठ नागरिकांना मदत
पनवेल : बातमीदार तालुक्यातील मौजे साई, पाले बुद्रुक, कोळवाडी, वावंजे, भिंगारवाडी व रिटघर येथील निराधार तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक सामुग्रीचे वाटप शनिवारी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांच्यासह त्या त्या बिट मधील पोलीस कर्मचार्यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. या वेळी रिटघर येथील …
Read More »परीक्षेसाठी राजस्थानला गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नीट 2020 परीक्षेसाठी राजस्थानमधील कोटा येथे गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी सुखरूप पोहचण्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्रातील जवळपास एक हजार विद्यार्थी नीट 2020 परीक्षेची …
Read More »पोलिसांना सेफ्टी गॉगल्स
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाण्याची हद्द मोठी असून जवळपास 81 गावासह मुंबई-पुणे महामार्ग, एक्सप्रेस महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गाचा काही भाग त्यांच्या अखत्यारीत येतो. या ठिकाणी दिवस-रात्र कर्तव्य बजावित असणार्या 50 अधिकारी व कर्मचार्यांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी पुढाकार घेवून व्हिनस कंपनीच्या सेफ्टी …
Read More »पनवेलमध्ये काही नागरिकांकडून केले जातेय नियमांचे उल्लंघन!
पनवेल : बातमीदार पनवेल परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले आहेत. असे असले तरी देखील मोठ्या प्रमाणात काही नागरिकांची वर्दळ बाजारात व रस्त्यांवर दिसू लागली आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतींनी स्वतःहून पुढाकार घेत ग्रामपंचायत हद्दीत लॉकडाऊन पुकारले आहे. पनवेल महापालिका हद्द व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या जवळपास 40 वर गेलेली …
Read More »आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांनासुद्धा धान्य द्या -तहसीलदार
पनवेल : बातमीदार पनवेल परिसरात आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांना सुद्धा धान्य देण्याच्या सूचना तहसीलदार अमित सानप यांनी सर्व रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. धान्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण …
Read More »उरण पालिका हद्दीत स्वच्छतेला प्राधान्य
उरण : रामप्रहर वृत्त उरण शहर कोरोनाच्या विळख्यात अडकू नये म्हणून शहराला स्वच्छ ठेवण्याचे काम उरण नगरपालिकेचे सफाई कर्मचारी करीत असल्याने त्यांचेही मोलाचे सहकार्य असल्याची चर्चा उरण शहरवासीयांत सुरू आहे. कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात आमजनतेला याची भीती वाटत नाही. आजच्या घडीला उरणमध्ये 4 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper