पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील विशेषत्वाने पनवेल तालुक्यातील रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना राज्य शासनाच्या माध्यमातून अन्नधान्याची तातडीने मदत मिळावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनाही देण्यात आले. या वेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश …
Read More »Monthly Archives: April 2020
रसायनीत अल्पवयीन मुलगी गर्भवती; आरोपी अटकेत
मोहोपाडा : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला सात महिन्यापांसून धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना तळवली दांडवाडी येथे घडली आहे. पीडिता गभर्वती राहिल्याने हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी वाडीतीलच आरोपी रोहिदास राम वाघे-पवार (वय 21) याच्याविरोधात रसायनी पोलिसांनी पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खालापूर तालुक्यात तळवली दांडवाडी …
Read More »कर्जतमध्ये मॉर्निंग वॉकवाल्यांना कवायतीची शिक्षा
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार संचारबंदी असतानाही बुधवारी (दि. 22) मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 45 जणांना कर्जत पोलिसांनी पकडले. त्यांची ही पहिलीच वेळ असल्याने समज देऊन आणि कवायती, योगासने करवून घेत त्यांना सोडून देण्यात आले. दोन दिवसांपूर्वी नेरळ पोलिसांनी 33 जणांना मॉर्निंग वॉकसाठी निघाल्यानंतर पकडले होते. कर्जत शहरातील लोक हे प्रामुख्याने कर्जत-मुरबाड, …
Read More »कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईहून तीन बोटी घारापुरी बेटावर अचानक दाखल
उरण : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या वाढत्या प्रकोपामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईहून दोन दिवसांपूर्वी तीन बोटी घारापुरी बेटाजवळ समुद्रात आल्या आहेत. त्यामुळे बेटावर राहणार्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजधानी मुंबई कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. मुंबईतील बहुतांश ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट …
Read More »नेरळमध्ये 51 जणांना केले होम क्वारंटाइन
कर्जत : बातमीदार नेरळ येथील कोरोनाग्रस्त तरुणाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या 51 जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाइन केले आहे. ठाणे येथील रुग्णालयात दाखल असलेल्या या तरुणाच्या राहत्या घरापासून आजूबाजूला असलेल्या 360 कुटुंबांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या सहा पथकांनी पूर्ण केले. नेरळ येथे राहणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण लागू …
Read More »मोहोपाड्यात दोन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वासांबे (मोहोपाडा), वावेघर आणि चांभार्ली ग्रामपंचायतींनी 24 व 25 एप्रिल रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. या काळात मेडिकल वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. वाहतूकही बंद असेल. त्यामुळे कुणीही घरातून बाहेर पडू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन …
Read More »श्रीवर्धनमध्ये 24 एप्रिल ते 3 मेपर्यंत पूर्णत: लॉकडाऊन; व्हॉट्सअॅपद्वारे घरपोच मिळणार सेवा
श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले असून सात हजारांपेक्षा जास्त नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. दुसरीकडे शेकडो चाकरमानी परतले आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन शहरातील बाजारपेठ 24 एप्रिल ते 3 मेपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला असून यातून मेडिकल सुविधा वगळण्यात आली आहे. या …
Read More »नवी मुंबईत 19 कर्मचार्यांना कोरोनाची लागण
नवी मुंबई : बातमीदार महापे मिलेनियम पार्कमधील एका आयटी कंपनीत काम करणार्या 40 पैकी 19 कर्मचार्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तर उर्वरित कर्मचार्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. महापे येथील एका डेटाबेस कंपनीतील 40 कर्मचार्यांचे रूटीन चेकअप करण्यात आले होते. त्यामध्ये 19 कामगारांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सर्व कोरोनाग्रस्तांचे …
Read More »खालापुरात विलगीकरण कक्षातून एक जण पळाला; गुन्हा दाखल
खोपोली : प्रतिनिधी विलगीकरण कक्षातून पळाल्याने एका व्यक्तीविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश नामदेव सर्जे (वय 30, रा. शांतीनगर, खोपोली) असे त्याचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेत होम क्वारंटाइन केले आहे. रमेश सर्जे हा 16 एप्रिल रोजी उरण, नवी मुंबई परिसरातून खालापूर तालुक्यात आला होता. …
Read More »कामोठ्यातील गर्भवती महिलेला कोरोना
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील कामोठे येथील एका गर्भवती महिलेचा कोरोना रिपोर्ट बुधवारी (दि. 22) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 40, तालुक्यातील 46, तर रायगड जिल्ह्यातील 58 झाली आहे. कामोठे येथील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली गर्भवती महिला 20 एप्रिलपासून मुलुंड (मुंबई) येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिला …
Read More »