जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश अलिबाग : प्रतिनिधी – पावसाळ्यापूर्वी करावयाच्या अत्यावश्यक कामांच्या देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत नालेसफाई, रस्ते, पूल दुरुस्ती, रस्त्यांच्या साईडपट्टींचा भराव करणे, शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, विहिरींची दुरुस्ती, …
Read More »Monthly Archives: April 2020
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 14) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती जगभरातील आंबेडकरी अनुयायांनी आपापल्या घरात साजरी केली. बौद्ध समाज युवा संघ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शासकीय, पोलीस, आरोग्य, सफाई व इतर सर्व निगडित कर्मचार्यांना जयंतीनिमित्त बिस्कीट पुडे, पाणी बॉटल्सचे वाटप करण्यात आले. या वेळी बौद्ध …
Read More »उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांचा विलगीकरण कक्ष
जेएसडब्ल्यू कंपनीचा पुढाकार पेण ः प्रतिनिधी – पनवेलमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे हाकेवर असलेल्या पेणमध्ये खबरदारी घेण्यात येत आहे, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पेणमध्ये गोरगरीब जनतेसाठी सर्व सुविधा पुरविणारे एकही रुग्णालय नसल्याची खंत होती. त्यासाठी पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने पुढाकार घेऊन पेणमधील उपजिल्हा रुग्णालय कोरोनाचा सामना करण्यासाठी सोयीसुविधांनी सज्ज केले …
Read More »पनवेल मनपाच्या कंत्राटी, कायम कर्मचार्यांना विमा कवच द्यावे
नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपा क्षेत्रातील कंत्राटी व कायम कर्मचार्यांना विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोना …
Read More »वांद्रे येथील मजुरांच्या उद्रेकाला राज्य सरकारच जबाबदार -फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी – आम्हाला गावी जाऊ द्या, अशी मागणी करत परराज्यातील शेकडो मजुरांनी मंगळवारी वांद्रे स्टेशनवर धडक दिल्याने सर्वच यंत्रणा हादरल्या आहेत. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर हा उद्रेक झाल्याने त्यावर आणखीच चिंता व्यक्त होत आहे. यावरून आता राजकारणही तापू लागले असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »लॉकडाऊनचा मार्गच योग्य
भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या विकसनशील देशासाठी हा निर्णय सोपा नव्हता. आर्थिक दृष्टीने पाहिले तर आपण खूप मोठी किंमत मोजली आहे, परंतु देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे मोदींनी स्पष्ट केले. गेले काही दिवस ते सातत्याने देशभरातील मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊनच आपण निवडलेला लॉकडाऊनचा मार्ग योग्यच होता, …
Read More »गरजूंना नाष्ट्याचे वाटप
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदतीचा हात म्हणून श्री साई नारायण बाबा मंदिर, पनवेल रेल्वे स्टेशनच्या वतीने दररोज परिसरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या उपाययोजनांद्वारे मदत केली जाते. या मंदिर परिसरात असलेल्या झोपडपट्टीमधील नागरिकांना दररोज सकाळी चांगले दूध व नाष्टा मिळावा यासाठी मंंदिराच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत कोणत्याही प्रकारची गर्दी …
Read More »नागरिक करताहेत वारंवार एकच गुन्हा
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा फैलाव थोपवत स्टेज तीनमध्ये जाणे टाळायचे असेल तर सोशल डिस्टसिंग राखणे अत्यावश्यक आहे. प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने वारंवार या गोष्टीचा कंठशोष करण्यात येत आहे. असे असले तरीसुद्धा स्वतःला शिकले-सवरलेले म्हटलेल्या वर्गाकडून जर सोशल डिस्टसिंगचा भंग होणार असेल तर या लढाईला काहीही अर्थ राहणार नाही. …
Read More »गरजूंना सॅनिटायझर, मास्क, हॅण्डवॉश
पनवेल : बातमीदार तळोजा येथील 102 बटालियन द्रुत कार्यबल यांच्याकडून गरजूंना कोरोना विषाणूच्या बचावासाठी हॅन्ड सॅनिटायझर, मास्क, हँडवॉश, हॅन्डग्लोज आणि फिनायल यांचे वाटप सोमवारी करण्यात आले. या वेळी 102 बटालियनचे कमांडंट राजेश कुमार, उप कमांडंट मोहम्मद रजी, पनवेलचे तहसीलदार अमित सानप आणि मंडळ अधिकारी श्रीकांत मोरे उपस्थित होते. या वेळी …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
उरण : वार्ताहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 जयंती निमित्त उरण येथील बौधवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच या वेळी बुद्धपूजा घेण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी यांच्यासह उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper