Breaking News

Monthly Archives: April 2020

श्रीवर्धन तालुक्यात विजेचा लपंडाव

श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होणे नित्याचेच झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असून, संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीयेत. अशा वेळी महावितरणने वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवणे आवश्यक आहे, मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित का होतो याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. …

Read More »

सरसगड किल्ल्यावरील वणवा धाडसाने विझविला

पालीतील दोन तरुणांचा पराक्रम पाली : प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील डोंगर रानावनात, जंगलभागात सातत्याने वणवे लागण्याच्या घटना समोर येतात. यामध्ये वनसंपदा व जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होते. अशाच प्रकारे सरसगड किल्ल्यावर वणवा लागला होता. हा वणवा अधिक पसरला असता तर कदाचित मानवी वस्तीजवळ पोहोचला असता तसेच वृक्षराजी आणि पशू-पक्ष्यांचीदेखील हानी झाली …

Read More »

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई

17 गावे आणि 59 वाड्यांना टँकरची प्रतीक्षा कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग असून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तालुका पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करून तालुक्यातील 17 गावे आणि 59 वाड्या टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत, मात्र या कृती समितीचे काम कोरोनामुळे …

Read More »

सपोआ. विनोद चव्हाण यांचा तपासास नकार

कर्नाळा बँकेतील करोडोंच्या गैरव्यवहारांचा तपास आता वपोनि. विजय वाघमारेंकडे पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेत झालेल्या करोडोंच्या गैरव्यवहाराची चौकशी आता सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद बाबू चव्हाण यांच्याऐवजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. वाघमारे हे नवी मुंबईच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक …

Read More »

समतोल धोरण बनवा!

लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्र्यांना निर्देश नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना दीर्घकाळासाठी आपल्यात राहणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरू असेल अशा प्रकारचे समतोल ठेवणारे धोरण बनवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 27) विविध …

Read More »

डॉक्टर आपल्या दारी!

वाहन कंपनीकडून घरोघरी केली जातेय रुग्णांची तपासणी अलिबाग : प्रतिनिधीराज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. दररोज वाढणार्‍या रूग्णसंख्येमुळे हॉस्पिटल, डॉक्टर आणि प्रशासनावरील ताण वाढत आहे. या समस्येच्या अनुषंगाने पुणे येथील वाहन कंपनी फोर्स मोटर्सने भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या समवेत महाराष्ट्रात डॉक्टर आपल्या दारी उपक्रमामार्फत फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून …

Read More »

नवीन पनवेलमधील पोलिसाला कोरोनाची लागण

पनवेल : नवीन पनवेलमधील एका पोलीस कर्मचार्‍याचा  कोरोना रिपोर्ट सोमवारी (दि. 27) पॉझिटीव्ह आला. पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्‍या कर्मचार्‍यांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्याबाबत उचित निर्णय घेऊन पनवेलकरांना संसर्गापासून वाचवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या नव्या रुग्णामुळे पनवेल महापालिका …

Read More »

उरणमधील बाळाची कोरोनावर मात

उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील जासई येथील 18 महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरविले आहे. प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली होती. हे बाळ आजारी असल्याने त्याला 12 एप्रिल रोजी जासई येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले. …

Read More »

रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई

33 गावे आणि 148 वाड्यांना टँकरद्वारे जलपुरवठा   अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संकट नसले तरी पाणीटंचाईची समस्या मात्र जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील पेण, रोहा, महाड, पोलादपूर या चार तालुक्यांतील एकूण 33 गावे आणि 148 वाड्यांना  जिल्हा प्रशासनाकडून टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पेण तालुक्यातील 10 गावे आणि 74 …

Read More »

सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांचा निकाल व भूखंडांची वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या नवी मुंबईतील खारघर येथील 810 घरांसाठी दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी …

Read More »