Breaking News

Monthly Archives: May 2020

खोपोलीत कचर्‍यात आढळल्या दोन हजारांच्या बनावट नोटा

खालापूर : प्रतिनिधीखोपोलीत विणानागर परिसरात सोमवारी (दि. 25) सकाळी रस्त्यावर पडलेल्या कचर्‍याच्या पिशवीत दोन हजारांच्या बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी पाचारण केल्यावर हा खुलासा झाला. खोपोली शहरातील विणानगर परिसरात मॉर्निंग वॉकला जाताना व्हीडीएम स्कूलच्या जवळ कचर्‍याच्या पिशवीत दोन हजारांच्या नोटा नागरिकांना दिसल्या. ही बाब खोपोली पोलिसांच्या लक्षात आणून देताच ठाणे अंमलदार …

Read More »

मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना; उपचारासाठी रवाना

मुंबई, नांदेड : प्रतिनिधीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना नांदेड येथून मुंबईला विमानाने हलविण्यासाठी मागितलेली परवानगी प्रशासनाने न दिल्याने ते अ‍ॅम्ब्युलन्सने रवाना झालेे.चव्हाण हे दोन दिवसांपूर्वीच नांदेडला गेले. त्यांनी मुंबईत दोनदा कोरोनाच्या चाचण्या करून घेतल्या. त्या निगेटीव्ह आल्या …

Read More »

वाढता वाढता वाढे..!

देशभरात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजगभरात थैमान घालणार्‍या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सोमवारी (दि. 25) संपलेल्या 24 तासांमध्ये देशभरात सहा हजार 977 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. …

Read More »

रायगडातील कोरोनाबाधितांची संख्या आठशेपार

पनवेल तालुक्याने ओलांडला पाचशेचा आकडा; 33 नवे रुग्ण, दोन महिलांचा मृत्यू पनवेल : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी (दि. 25) नवे 44 रुग्ण आढळून आले. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 22, पनवेल ग्रामीणमधील 11, तळा तीन, माणगाव, खालापूर व कर्जत प्रत्येकी दोन, तर सुधागड व अलिबाग तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. …

Read More »

उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून होणार सुटका!

नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील उमरोली येथील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात छोट्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. आता तेथील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, यंदाच्या पावसाळ्यापासून उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

‘राज्य सरकार अपयशी; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे उद्भलेली मुंबईसह राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झाले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आहे. राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि. 25) राज्यपालांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. …

Read More »

कोरोनाचे संमिश्र चित्र

जगभरात अनेक देशांमध्ये सध्या काही महिन्यांच्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर दोन टोकाची परिस्थिती दिसते आहे. एकीकडे नित्य नव्याने वाढत चाललेले केसेसचे आकडे तर दुसरीकडे अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी व्यवहार खुले केले जाण्याच्या उपाययोजना, या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लोक सुयोग्य खबरदारी घेऊन वागत आहेत तर काही ठिकाणी बेपर्वाईने गर्दीही केली जाताना दिसते …

Read More »

माणगावमध्ये रमजान ईद साधेपणाने साजरी; घरातूनच अदा केली नमाज

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोना महामारीच्या संकटात या वर्षी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद सोमवारी (दि. 25) साधेपणाने साजरी केली. मौलाना आणि अन्य तीन जणांनीच तालुक्यातील मशिदीत, तर इतर सर्व मुस्लिम बांधवांनी घरातूनच रमजान ईदची नमाज अदा केली. माणगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अनेक हिंदू बांधवांनी सोशल मीडिया व दूरध्वनीवरून रमजान …

Read More »

महामार्गाच्या कामालाही लॉकडाऊनचा अडथळा

महाड ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे विविध कारणास्तव सातत्याने ठप्प होत असून यावर्षीदेखील लॉकडाऊनचा या कामात अडथळा निर्माण झाला. परिणामी ऐन पावसाळ्यात हा मार्ग दरडी आणि रस्त्यावर येणार्‍या पावसामुळे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे पळस्पे ते इंदापूर चौपदरीकरणाचे काम मागील सात ते आठ …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून नागोठणे शहराची पाहणी

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या वतीने रोहे तालुक्यासाठी निरीक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. नागोठणे शहरासाठी नायब तहसीलदार नीलम ढोरमकर-सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे अरुण गणतांडेल, नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, …

Read More »