Breaking News

Monthly Archives: May 2020

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे चार उमेदवार जाहीर

मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र विधान परिषदेच्या 21 मे रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील अशा नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे. पक्षीय बलाबलानुसार नवव्या …

Read More »

धक्कादायक! पनवेल तालुक्यात कोरोनाचे चार बळी

पनवेल : कोरोनाचा कहर वाढतच असून, पनवेल तालुक्यात चार जणांचा या महामारीने मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे कामोठ्यात दोन व खांदा कॉलनीत एक असे तीन बळी गेले असून, आठ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ग्रामीण भागात कोप्रोली येथील एका महिलेचा मृत्यू झाला असून, उसर्ली खुर्द, करंजाडे, उलवे नोड …

Read More »

कोरोनासोबत जगायला शिकूया

एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असताना, नागरिकांनी कोरोनासोबत जगायचे कसे हे शिकले पाहिजे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाची बाधा टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून ज्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत त्यांचा आपल्या वर्तनात पूर्णत: समावेश करून घेतल्यास कोरोनासोबत जगण्याचे आव्हान आपण पेलू शकू. जगभरातील परिस्थितीशी तुलना करता, भारतातील कोरोना …

Read More »

पायी गावी निघालेल्या मजुरांची केली व्यवस्था

रमजान काळात मुस्लिम तरुणांकडून पुण्यकर्म कर्जत : बातमीदार – कोरोनाच्या महामारीत लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी कामानिमित्त असलेले लोक अडकून पडले आहेत. त्यातील काही जणांनी चालत परतीचा मार्ग धरला आहे. कर्जत तालुक्यातील कळंब येथे असेच उत्तर प्रदेश येथे निघालेले नागरिक पोहोचले तेव्हा कळंब येथील मुस्लिम तरुणांनी त्यांची राहण्याची सोय करून …

Read More »

पेणमध्ये मजुरांची आरोग्य तपासणी

पेण : प्रतिनिधी – दोन दिवसांपूर्वी वडखळ येथील जेएसडब्ल्यू वसाहतीमधील परप्रांतीय कामगारांनी अचानक आंदोलनात्मक भूमिका घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी या परप्रांतीय मजुरांना गावी जाण्याबाबत आदेश दिल्याने या कामगारांची आरोग्य तपासणी पेण नगर परिषद मैदानात करण्यात आली.  पहिल्या टप्प्यात ओडिशा येथील परप्रांतीय कामगारांसाठी 16 बस असून टप्याटप्याने इतर …

Read More »

सुधीर नाझरेंच्या छायाचित्राला ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धेत मेडल

मुरूड : प्रतिनिधी – येथील वृत्तपत्र छायाचित्रकार सुधीर नाझरे यांच्या छायाचित्राला ग्रँड इंटरनॅशनल सर्कीट 2020 या स्पर्धेत आयजीसीचा हॉनॉर्बल मेन्शन मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे. याबद्दल नाझरे यांचे अभिनंदन होत आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 22 देशांचे 400 छायाचित्रकार सहभागी झाले होते, तर त्यांच्या 2200 छायाचित्रांचा समावेश होता. यात सुधीर नाझरे …

Read More »

दिवीलमध्ये दाम्पत्याला पूर्ववैमनस्यातून मारहाण

15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल पोलादपूर : प्रतिनिधी – पोलादपूर तालुक्यातील दिवील गावात जुन्या वादातून पती, पत्नी आणि पतीच्या पुतण्याला जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 15 जणांविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी प्रियंका प्रकाश देवे आणि तिचा पती प्रकाश बाबू देवे तसेच पुतण्या हे बुधवारी …

Read More »

व्हिटॅमिन सी मिळवा आणि तंदुरुस्त राहा!

आहारात आपण वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करीत असतो. सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत असल्याने आपण घरच्या घरी चांगला आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती चांगली बनवू शकतो. शरिराला पोषण मिळण्यासाठी आणि आजारांशी लढण्यासाठी व्हिटॅमिन्सची गरज असते. आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन ‘सी’चे फायदे आणि व्हिटॅमीन सी कशातून मिळते याबाबत माहिती देणार आहोत. कोरोनाचा ताण आणि वैयक्तीक …

Read More »

दोन रिक्षांची धडक; एक जखमी

बदलापूरच्या वाहनात आढळल्या दारुच्या बाटल्या कर्जत : बातमीदार – कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ पेट्रोल पंप येथे गुरुवारी (दि. 7) दोन रिक्षांमध्ये अपघात झाला. या अपघातात कर्जत नांगुर्ले येथील रिक्षाचालक जखमी झाला असून, रिक्षाला धडक देणार्‍या दुसर्‍या रिक्षात दारूच्या 16 बाटल्या आढळल्या. यावरून संबंधित रिक्षाचालकाला पोलिसांनी पकडून नेले आहे. कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ …

Read More »

कर्जतमधील गर्भवतीचा नवजात बालकासह मृत्यू

नातेवाइकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप कर्जत : बातमीदार – बाळंतपणासाठी दाखल केलेल्या कर्जत तालुक्यातील कुंडलज येथील गर्भवती महिलेचा बाळंतपणादरम्यान बालकासह मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत मृतांच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी आरोग्य यंत्रणेवर संशय व्यक्त केला असून, डॉक्टरांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. कुंडलज येथील गर्भवती महिला प्रिता जसपाल सिंग …

Read More »