खोपोली : बातमीदार कोरोना विषाणू लढाईत आता सर्वसामान्य नागरिकाला देखील कोरोना योद्धा बनण्याची संधी रायगड पोलीस दलातर्फे देण्यात आली असून त्यासाठी पात्रता निकषात बसल्यास कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावता येणार आहे. लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात रायगड ऑरेंज झोनमध्ये असला तरी पोलीस दल मात्र कोणत्याही प्रकारची बेफिकिरी बाळगण्याच्या मनस्थितीत नाही. पहिल्या दोन …
Read More »Monthly Archives: May 2020
रस्त्यांवरील गर्दीने महाडकर धास्तावले; कलम 144चा फज्जा; सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर
महाड : प्रतिनिधी गेली दिड महिनाभरापासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू केली आहे. टप्प्यावर याचा कालावधी वाढत असला तरी गेल्या काही दिवसांपासून महाडमध्ये कलम 144 लागू आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवर वाढती गर्दीपाहून महाड शहरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. प्रशासन मात्र ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिक …
Read More »स्व. जनार्दन भगत : सच्चा समाजसेवक
स्व. जनार्दन आत्माराम भगतसाहेब म्हणजे माझे आबा. त्यांच्या 32व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे. माझे आबा म्हणजे सुसंस्कारांचा खजिना, मायेचा जिवंत झरा, दीन-दुबळ्यांचे आधारस्तंभ, गोरगरिबांचे कनवाळू. जेव्हा माझे आबा काळाच्या पडद्याआड गेले तेव्हापासून वियोगाची स्पंदने आजही आठवतात. आज त्यांनी मोठी संपती जरी मागे ठेवली नसली तरी …
Read More »खारघर : दिव्यांग असलेले सय्यद अब्दुल सुभान हे लॉकडाऊन काळात त्यांचा सलून व्यवसाय बंद असतानादेखील आपल्याकडे असलेल्या शिवणकलेचा सदुपयोग करीत स्वखर्चाने स्वतः शिवलेले मास्क शहरातील गोरगरिबांना निःशुल्क वाटप करीत आहेत. तसेच पोलीस बांधवांना पाण्याचे वाटप करीत आहेत. सय्यदभाई नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेतात, असे नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सांगितले.
Read More »नेरळमधील वाइन शॉप बंदच
तळीरामांची नाराजी कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात वाइन शॉप आणि बीअर शॉपी उघडण्यास रायगड जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली आहे, मात्र नेरळ गावातील एकमेव वाइन शॉप हे कोरोनाबाधित क्षेत्रात असल्याने उघडले नाही. परिणामी वाइन शॉपसमोर सलग तीन दिवस रांगा लावणार्यांचा हिरमोड झाला असून बाधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी असलेल्या बीअर शॉपी मात्र …
Read More »आजपासून फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांची प्रगणना
मुरूड ः प्रतिनिधी फणसाड अभयारण्यात यंदा वन्यजीवांची प्रगणना ही जुजबी स्वरूपात होणार आहे. दरवर्षी प्राण्यांची प्रगणना करण्यासाठी पनवेल अथवा मुंबई येथील एनजीओ आमच्या मदतीसाठी येतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व भागात संचारबंदी असल्यामुळे फणसाड अभयारण्यात असणार्या उपलब्ध कर्मचारी वृंदाकडून सध्या वन्यजीवांची प्रगणना करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची प्रगणना जुजबी स्वरूपात …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा
पेण ः प्रतिनिधी पेणमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार असल्याच्या अफवेमुळे एकच गोंधळ उडून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत, तसेच शेकडो गाड्याही मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करीत आहेत. पेण तालुक्यात अद्याप कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही तालुक्यात कोरोनाबाबतची काळजी घेण्यात येत आहे. अलिबाग किंवा दुसर्या तालुक्यातून कोरोना संसर्ग झालेला रुग्ण पेण तालुक्यात …
Read More »विनाकारण फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई
श्रीवर्धन पोलिसांकडून हजारोंचा दंड वसूल श्रीवर्धन ः प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासकीय यंत्रणेला आव्हानात्मक ठरत आहे. श्रीवर्धन शहराच्या लगत असलेल्या भोस्ते गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस, तहसील कार्यालय व श्रीवर्धन नगर परिषद प्रशासन सतर्क झाले आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यांतर्गत नाकाबंदीत 32 मोठ्या वाहनांवर कारवाई करून …
Read More »पोलीस हवालदार सुधीर मोरे महासंचालक पदकाने सन्मानित
खालापूर ः प्रतिनिधी दरवर्षी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडून पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात येते. यावर्षी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुधीर मोरे यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. सुधीर मोरे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. 29 जानेवारी 1999पासून ते …
Read More »रोह्यात बाहेरील नागरिकांचा लोंढा
ग्राम प्रशासन सतर्क रोहे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आल्यापासून रोहा तालुक्यात बाहेर ठिकाणाहून 12,070 नागरिक आले आहेत. यामध्ये परदेशातून 30, परराज्यातून 182, तर राज्यभरातून 11,858 नागरिक आले आहेत. मागील दोन दिवसांत 155 नागरिक रोह्यात आले आहेत. या लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील बहुतांश लोकांचे होम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper