लॉकडाऊनमध्ये व्यावसायिकांसाठी वेळेची नियमावली कर्जत ः बातमीदार एमएमआरडीए रिजनमधील नगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन व्यवसायाला मोकळीक देण्यात आली आहे, मात्र त्यात सरसकट व्यवहार सुरू ठेवणे कर्जत शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.त्यामुळे कर्जत नगर परिषदेने पुढाकार घेऊन सर्वांना वेळ ठरवून देण्यात आली असून त्या-त्या दिवशी ती ती दुकाने …
Read More »Monthly Archives: May 2020
गोरगरिबांना अन्नधान्य वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन जारी केले आहे. या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, गोरगरिबांना हाताला काम नाही आणि काम नसल्यामुळे हातात पैसे नाही. त्यामुळे आय फ्लेक्स टेक्नॉलॉजीसचे डायरेक्टर रणजित मच्छिंद्र नरुटे यांच्या माध्यमातून पनवेल या ठिकाणी गोरगरीबांना अन्न धान्य वाटप केले. …
Read More »रानसई हद्दीतील वाड्यांची पाण्याच्या समस्येतून मुक्तता करा; आदिवासी बांधवांकडून मागणी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या आजूबाजूला असणार्या रानसई या ग्रामपंचायत हद्दीतील सहा वाड्यांच्या एक हजार आदिवासी बांधवाना वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्याची कायमची पाणी टंचाईच्या समस्येतून मुक्तता करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे. रानसई ग्रामपंचायत हद्दीतमध्ये सहा आदिवासी वाड्या आहेत. त्या पैकी …
Read More »संगणकीय नेत्रविकार
आरोग्य प्रहर माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गामध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील …
Read More »एमजीएम रुग्णालयाला एक हात मदतीचा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे रक्तदान
कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णामुळे रक्ताची कमतरता भासत असल्याने त्यांना तातडीने रक्त पुरवठा करता यावा म्हणून उपजिल्हा रुग्णालय पनवेल व एमजीएम कामोठे रुग्णालयानी रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळानी पुढे …
Read More »उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयासमोर लांबच लांब रांग
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पारप्रांतीय मजुरांना गावा कडची ओढ लागली असून त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी वैद्यकीय दाखल्यांची जरुरी असते. वैद्यकीय दाखल्यासाठी सोमवार (दि. 4) पासून उरण येथील पालवी हॉस्पिटल व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय समोर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. पालवी हॉस्पिटलचे डॉ. सुरेश पाटील यांनी दररोज सुमारे 200 ते …
Read More »होम क्वारंटाइन नागरिक रस्त्यावर
ग्रामस्थ भयभीत; प्रशासनाकडून कारवाईची मागणी श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणत शासनाने मुंबई येथे अडकून पडलेल्या चाकरमान्यांना आपल्या गावी कोकणात जाण्याची मुभा दिली खरी, पण ती आता गावातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण मुंबईहून श्रीवर्धन तालुक्यात आलेल्या चाकरमान्यांना होम क्वारंटाइन करून त्यांच्या घरी …
Read More »परराज्यांतील नागरिकांना 2200पेक्षा जास्त दाखले वितरित; आजिवली प्राथमिक आरोग्य केंद्राची कामगिरी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या आठवड्यात नियमित रुग्ण तपासणी बरोबरच परराज्यातील नागरिकांनी आपल्या मूळ गावाला परत जाण्यासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. तालुक्यातील आजीवली प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन दिवसात 2200 पेक्षा जास्त परराज्यातील नागरिकांना मूळ गावाला परत जाण्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय …
Read More »ओंकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनकडून महापौर सहाय्यता निधीत मदत
पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत खांदा कॉलनीतील ओंकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने 10 हजार रुपयांची मदत बुधवारी (दि. 6) जमा केली. कोरोनाशी लढण्यासाठी आज सर्वच थरातून उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण मानवजातीवर आलेले हे संकट पाहून समाजातील छोटे छोटे घटक देखील आपापल्या परीने मदत करत आहेत. जिथे सोसायट्यांना …
Read More »घारापुरी, पीरवाडी किनार्यावरील पर्यटन व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका
उरण : प्रतिनिधी लॉकडाऊन संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे उरण तालुक्यातील घारापुरी, पीरवाडी आदी पर्यटक आधारित व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे मागील 45 दिवसांपासून बंद पडलेल्या व्यवसायामुळे शेकडो लघु उद्योग व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे तिसर्यांदा लॉकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मागील 45 दिवसांपासून सुरू असलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper