सिडकोने योग्य ती दक्षता घेण्याची मागणी कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीत अनेक भूखंड मोकळेच आहेत. सदर भूखंडांच्या विकासाकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भूखंडांवर गवताचे जंगल वाढले आहे. आता पावसाळ्यात या भूखंडांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना होऊ लागला आहे. याबाबत …
Read More »Monthly Archives: June 2020
शिक्षकांकडून उरणमध्ये अन्नधान्य, चटईचे वाटप
उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील गरजू बांधवाना मदतीचा हात म्हणून अन्नधान्याबरोबर, चादर, चटईचे वाटप आणि विविध झाडांचे वृक्षारोपण केलेे. एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महान काम शिक्षकांनी हाती घेतल्याने सीमा शुल्क विभागाचे अधिकारी महेंद्र भोईर, रमेश रहाटेसह अनेक जेष्ठ नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या संकटात राज्यातील जनता आपले …
Read More »अपंगत्वावर मात करीत भाजी विक्री
ट्रॅव्हल्सवाल्याने शोधला उदरनिर्वाहासाठी पर्याय कळंबोली : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संसर्गामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील ट्रॅव्हल्स व्यवसाय करणारी दुकाने बंद आहेत. परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत ट्रॅव्हल्स दुकानदार सापडले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ट्रॅव्हल्सच्या बुकिंगवर कामाला असणार्या हितेश पंड्या याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याकरिता भाजी विक्रीचा व्यवसाय निवडला आहे. अपंगत्वावर मात करीत …
Read More »नवी मुंबईत रुग्णवाढीचा वेग चिंताजनक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत दिघा नोड वगळता कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जूनच्या आरंभीस हा फैलाव वेगाने झाला आहे. यात सर्वाधिक बाधित हे कोपरखैरणे आणि तुर्भे परिसरांत आहेत. दोन्ही विभागांतील आकडा एक हजारच्या आसपास पोहोचला आहे. सध्या कोपरखैरणे, नेरुळ आणि घणसोलीत रुग्णांचा आकडा अधिक आहे. या …
Read More »हुतात्मा कोतवाल व्यायाम मंडळाच्या इमारत पुनर्बांधणी कामाला अखेर सुरुवात
कर्जत : बातमीदार कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंडळाच्या कार्यकारी समितीने मागील वर्षी इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र वर्षभर इमारत बांधण्यावरून न्यायालयीन लढाई सुरू होती. ती आता थांबली असून, व्यायामशाळा इमारतीच्या पुनर्बांधणी कामाला सुरुवात झाली आहे. हुतात्मा कोतवाल व्यायामशाळेच्या पुनर्बांधणीच्या प्रस्ताव दीड वर्ष वादाच्या भोवर्यात सापडला होता. याबाबत …
Read More »पेण नगर परिषदेकडून निर्जंतुकीकरण मोहीम
पेण : प्रतिनिधी पेण शहरात चार दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर नगर परिषदेकडून शहर निर्जंतुकीकरण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, गुरुवारी (दि. 25) सकाळपासून शहराच्या विविध भागांमध्ये मशिनच्या सहाय्याने व माणसे लावून निर्जंतुकीकरणाला सुरुवात झालेली आहे. या निर्जंतुक फवारणीमध्ये मिलीथिऑन, फ्लायगॉन, निमटेक्स, सोडिअम हायपोक्लोराईड, लिंबाडा या कीटकनाशकांचा उपयोग केला …
Read More »बेणसेत रुग्ण वाढले
नागोठणे : प्रतिनिधी पेण तालुक्यातील बेणसे या गावात राहणार्या एका व्यक्तीचे पाच-सहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या पत्नी, बहीण, मुलगा तसेच घरकाम करणारी बाई आणि दुकानात काम करणारा कामगार अशा एकूण पाच जणांना कोरोनाची लागण लागली असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. या …
Read More »रोजगार नाही, व्यवसाय नाही; मग शालेय फी कशी भरायची? पालकांचा सवाल
रोहे : प्रतिनिधी बहुतांशी खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. शालेय वर्षाला सुरुवात झाली म्हणजे फी भरावीच लागणार. शासनाने फीसाठी सक्ती करू नये, असे शैक्षणिक संस्थांना सूचना दिली असली तरी नंतर मात्र एकत्रित फी भरावी लागणार आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. त्यातच …
Read More »देशात कोरोनाचा नवा उच्चांक
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गुरुवारी (दि. 25) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 16 हजार 922 नवे रुग्ण आढळले आहेत. एका दिवसांतील हा सर्वाधिक आकडा आहे, तर 418 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाख 73 हजार 105 इतकी झाली आहे.देशात कोरोनाचे एक लाख …
Read More »रायगडातील बागायतदार हवालदिल
चक्रीवादळग्रस्त अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील फळबागांना बसला असून, 22 हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. यात आंबा, नारळ, सुपारी, काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, मात्र पिकती झाडे उन्मळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. गंभीर म्हणजे या बागायतदारांना अजूनही …
Read More »