Breaking News

Monthly Archives: June 2020

कोकणातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची उच्चस्तरीय समिती

अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, त्यापैकी नारळशेतीच्या नुकसानीचा अभ्यास करून केंद्र सरकारला तातडीने अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात …

Read More »

पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांना पदक

पनवेल : रामप्रहर वृत्त – देशातील नक्षलग्रस्त आणि जोखिमच्या भागात 2015 ते 2018 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील झिंगापूर या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात प्रभारी अधिकारी म्हणून खडतर सेवा पार पाडल्याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असणारे डँशिंग पोलीस उपनिरीक्षक रोहित पंडितराव बंडगर यांना केंद्र …

Read More »

नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे -संजय पाटील

पनवेल : वार्ताहर  – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये वाढला आहे. लॉकडाऊन उठविल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी न करता प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळून वागल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये होणार नाही या दृष्टीने सर्वांनी नियम पाळावे व कामोठ्यातून कोरोनाला पळवून लावावे असे आवाहन कामोठे वसाहतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील …

Read More »

पेरणीच्या हंगामाला सुरुवात

मोहोपाडा : प्रतिनिधी – पावसाचे आगमन गेले तीन चार दिवस होत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. या वर्षी 7 जून लाच पावसाने आपले अस्तित्व दाखविल्याने ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी बैलाच्या साह्याने पेरणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकरी पेरणीची जोरदार तयारीला लागलेला असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी …

Read More »

अवैध 1400 लिटर गावठी दारु हस्तगत

पनवेल : वार्ताहर – अवैध गावठी दारुची वाहतूक करणार्‍या इको गाडीचा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलने पाठलाग करून सदर गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये 1400 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलचे निरिक्षक एस. एस. गोगावले यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याचा फायदा घेऊन व्यापार्यांकडून लूट

पनवेल : वार्ताहर – रायगडसह कोकणात झालेल्या निसर्ग वादळामुळे नागरिकांच्या घराचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक घराच्या भिंती पडून जिवीतहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. असे असताना रायगड जिल्ह्यातील व्यापारी पत्रे, स्क्रु, बांधकाम साहित्य चढ्या भावाने विक्री करून नागरिकांची लुट करीत आहेत, अशा …

Read More »

भारताकडील परकीय चलनाच्या विक्रमी साठ्याचा अर्थ

कोरोना साथीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे अपरिहार्य आहे, मात्र जगाच्या तुलनेने भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिले की ती बरीच स्थिर आहे. सध्या आपल्याकडे असलेला परकीय चलनाचा विक्रमी साठा, त्याचीच प्रचिती देतो. अशा या स्थितीत संघटीत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसामान्य भारतीयांचा सहभाग वाढला तर त्याचे फायदे सर्वांपर्यंत पोचणार आहेत. कोरोना साथीच्या संकटामुळे भारतीय …

Read More »

आधी गोंधळ थांबवा

लोकांना धीर आणि आधार दोन्ही देण्याची गरज असताना हे तीन चाकी सरकार उलट त्यांना अधिकच गोंधळवून टाकते आहे. मार्चअखेरीपासून कामधंदा बाजूला ठेवून घरी बसलेली जनता आता अधिक काळ तग धरू शकणार नाही. गरीबच काय, कित्येक व्यावसायिकांनाही कोरोना-काळात आपला पूर्वीचा धंदा चालू शकणार नसेल तर पोटापाण्यासाठी अन्य पर्याय चोखाळायलाच हवेत असे …

Read More »

उद्ध्वस्त कोकणवासीयांना राज्य सरकारने पाठबळ द्यावे; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भूमिका

माणगाव : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासीयांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ती लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी नुकसानग्रस्तांना संकटकाळात सर्वतोपरी पाठबळ देणे आवश्यक असल्याची स्पष्ट भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (दि. 12) येथे मांडली. कोरोना या वैश्विक संकटाने त्रस्त असलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यावासीय नैसर्गिक …

Read More »

रायगडातील 16 पोलीस ठाण्यांना ‘निसर्ग’चा तडाखा

छताचे पत्रे उडाले; आठ दिवस वीजपुरवठा खंडित अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड पोलीस दलाला देखील बसला आहे. जिल्हयातील 16 पोलीस ठाण्यांचे नुकसान झाले आहे. 11 पोलीस चौक्या आणि सात चेकपोस्टची मोडतोड झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जिल्हयातील 10 पोलीस ठाणी गुरूवारपर्यंत (दि. 11) म्हणजे तब्बल आठ दिवस अंधारात …

Read More »